पेट्रा
पेट्रा (अरबी: البترا, प्राचीन ग्रीक: Πέτρα) हे पश्चिम आशियाच्या जॉर्डन देशातील एक प्राचीन शहर आहे. हे शहर प्रामुख्याने डोंगर कोरून बनवण्यात आले असून त्याची निर्मिती इ.स. पूर्व ३१२ मध्ये करण्यात आली असावी असा अंदाज आहे. पेट्रा जॉर्डनमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ, युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान व जगातील सात नव्या आश्चर्यांपैकी एक आहे.
पेट्रा जॉर्डनच्या दक्षिण भागात अकाबाचे आखात व मृत समुद्र ह्यांदरम्यान असलेल्या सपाट खोऱ्यामध्ये स्थित आहे व १८१२ सालापर्यंत ते उर्वरित जगासाठी बव्हंशी अज्ञात होते जेव्हा एका स्विस शोधकाने त्याचा शोध लावला.
गुणक: 30°19′43″N 35°26′31″E / 30.32861°N 35.44194°E
- पेट्रा
-
-
-
-
-
-
-
-