Jump to content

गॅलापागोस बेटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा लेख गॅलापागोस द्वीपसमूहाबद्दल आहे. इतर अर्थांसाठी पहा गॅलापागोस-निःसंदिग्धीकरण.

गालापागोस द्वीपसमूहाचे प्रशांत महासागरातील स्थान

गालापागोस द्वीपसमूह (स्पॅनिश: Archipiélago de Colón) हा पॅसिफिक महासागरामधील विषुववृत्ताच्या आसपासच्या १३ मोठी द्वीपे, ६ छोटी द्वीपे व १०७ दगड व कातळांचा बनलेला एक द्वीपसमूह आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामधून तयार झालेला हा द्वीपसमूह दक्षिण अमेरिकेच्या इक्वेडोर देशाच्या पश्चिमेस ९२६ किमी अंतरावर स्थित असून तो एक्वेडोरचा एक प्रांत आहे. ह्यातले सगळ्यात जुने द्वीप अंदाजे ५० लाख ते १ कोटी वर्षांपूर्वी तयार झालेली आहेत. अजुनही या ज्वालामुखींचे उद्रेक होत आहेत. शेवटचा उद्रेक इ.स. १९९८ मध्ये झाला.

या बेटांवर असलेली जैविक विविधता वेगळी राहीली गेली कारण याचा कोणत्याही मुख्य खंडांशी संबंध आला नाही. (संदर्भ?) त्यामुळे येथे असलेले सजीववनस्पती वेगळ्या रितीने उत्क्रांत होत गेल्या असे दिसून आले. (संदर्भ?) या बेटा वरील जैविक विविधता पाहून चार्ल्स डार्विन ने उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला. त्याचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत या बेटांवरील स्थानिक जीवसृष्टी पाहून सुचला. या बेटावर आता सहली आयोजित केल्या जातात. पुर्वी आलेल्या स्पॅनीश लोकांनी इथल्या अनेक महत्त्वाच्या जीवांच्या कत्तली केल्या जसे की येथील मोठ्या पाठीची कासवे व छोटे पेंग्विन पक्षी. मात्र आता हे एक अभयारण्य व जागतिक कीर्ती असलेले पर्यटन विषयक ठिकाण आहे.

येथील जैविक वैविध्यामुळे गालापागोसला १९७८ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत समाविष्ट करण्यात आले.

गालापागोस द्वीपसमूह

दालन[संपादन]

बाह्त दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: