Jump to content

जगातील सात नवी आश्चर्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जगातील सात नवी आश्चर्ये

जगातील सात नवी आश्चर्ये (२००१ - २००७) हा २००१ साली सुरू झालेला व जगातील सात नवी आश्चर्ये शोधून काढण्यासाठी बनवलेला एक उपक्रम आहे असे सांगितले गेले. लोकांनी त्यांच्या मते आश्चर्यांत नोंद व्हावी अशा २०० इमारतीं व वास्तूंची नावे न्यू७वंडर्स नावाच्या झुरिच शहरामधील एका संस्थेकडे पाठवली. त्या संस्थेने घेतलेल्या या लोकप्रियता कौलामधील विजेत्या वास्तूंची घोषणा ७ जुलै २००७ रोजी लिस्बन येथे करण्यात आली.[] ह्या कौलादरम्यान इंटरनेट व फोनद्वारे १० कोटी लोकांनी मते टाकल्याचा न्यू७वंडर्सने दावा केला. परंतु हा कौल शास्त्रशुद्ध पद्धतीने न घेतल्यामुळे एकाच व्यक्तीला अनेक वेळा मते देणे सहज शक्य होते. ह्यामुळे ह्या कौलाच्या अचूकतेवर शंका व्यक्त केली गेली आहे.

विजेते

[संपादन]
सात नव्या आश्चर्यांची स्थाने
आश्चर्य स्थान चित्र
ताज महाल
Taj mahal
आग्रा, भारतTaj Mahal
चिचेन इत्सा
Chi'ch'èen Ìitsha'
युकातान, मेक्सिकोEl Castillo being climbed by tourists
क्रिस्तो रेदेंतोर
O Cristo Redentor
रियो दि जानेरो, ब्राझिलChrist the Redeemer in Rio de Janeiro
कलोसियम
Colosseo
रोम, इटलीThe Colosseum at dusk: exterior view of the best-preserved section
चीनची भिंत

Wànlǐ Chángchéng
चीनThe Great Wall of china (Mutianyu section)
माक्सू पिक्त्सू
Machu Pikchu
कुस्को, पेरूMachu Picchu in Peru
पेट्रा al-Batrāʾजॉर्डनThe Monastery at Petra

ह्यांव्यतिरिक्त ऐतिहासिक जगातील सध्या अस्तित्वात असलेले एकमेव आश्चर्य गिझाचा पिरॅमिड ह्याला मानाचे स्थान देण्यात आले.

आश्चर्य स्थान चित्र
गिझाचा भव्य पिरॅमिड | गिझा, इजिप्तPyramide Kheops

इतर स्पर्धक

[संपादन]
आश्चर्य स्थान चित्र
अथेन्सचे अ‍ॅक्रोपोलिसअथेन्स, ग्रीस
आलांब्राग्रानादा, स्पेन
आंग्कोर वाटआंग्कोर, कंबोडिया
आयफेल टॉवरपॅरिस, फ्रान्स
हागिया सोफियाइस्तंबूल, तुर्कस्तान
कियोमिझू-देराक्योतो, जपान
माउईईस्टर द्वीप, चिली
नॉयश्वानस्टाइनबायर्न, जर्मनी
लाल चौकमॉस्को, रशिया
स्वातंत्र्यदेवतेचा पुतळान्यू यॉर्क, अमेरिका
स्टोनहेंजएम्सबरी, इंग्लंड
सिडनी ऑपेरा हाउससिडनी, ऑस्ट्रेलिया
टिंबक्टूटिंबक्टू, माली

संदर्भ

[संपादन]
  1. Dwoskin, Elizabeth. "Vote for Christ". ISSN 0028-9604.

बाह्य दुवे

[संपादन]