सीएनएन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सीएनएनचा लोगो

केबल न्यूज नेटवर्क (संक्षेपः सीएनएन) (इंग्लिश: Cable News Network (CNN)) ही अमेरिकेमधील बातम्या पुरवणारी एक दूरचित्रवाणी केबल वाहिनी आहे. १९८० साली स्थापन झालेली सीएनएन ही २४ तास बातम्या पुरवणारी जगातील पहिली दूरचित्रवाहिनी होती. सीएनएनचे मुख्यालय अटलांटा येथे आहे. अमेरिकेतील एकूण १० कोटी घरांमध्ये सीएनएन वाहिनी दिसते. सीएनएन इंटरनॅशनल ही सीएनएनची आंतरराष्ट्रीय वाहिनी जगातील २५२ देशांमध्ये प्रसारित होते.

टाइम वॉर्नर ही अमेरिकेतील मोठी मनोरंजन कंपनी सीएनएनची मालक कंपनी आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत