पाराना नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाराना
पाराना नदीमधून प्रवास करणारे एक मालवाहू जहाज
पाराना नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम पारानैबा व रियो ग्रांदे नद्यांचा संगम
मुख रियो दे ला प्लाता
पाणलोट क्षेत्रामधील देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना, ब्राझील ध्वज ब्राझील, पेराग्वे ध्वज पेराग्वे
लांबी ४,८८० किमी (३,०३० मैल)
सरासरी प्रवाह १७,२९० घन मी/से (६,११,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २५,८२,६७२ चौरस किमी

पाराना नदी (स्पॅनिश: Río Paraná, पोर्तुगीज: Rio Paraná) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. ब्राझील, आर्जेन्टिनापेराग्वे देशांमधून वाहणारी व ४८८० किमी लांबीची पाराना ही ॲमेझॉनखालोखाल दक्षिण अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे. ही नदी ब्राझीलच्या दक्षिण भागात दोन नद्यांच्या संगमातून सुरू होते. ब्राझील-पेराग्वे तसेच पेराग्वे-आर्जेन्टिना ह्या देशांच्या सीमा पारानावरून आखण्यात आल्या आहेत.

इताइपू धरण हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण पेराग्वेमध्ये पारानावरच बांधले गेले आहे. पेराग्वे नदी ही पारानाची सर्वात मोठी उपनदी आहे. आर्जेन्टिनाच्या उत्तर भागात पाराना व उरुग्वे ह्या दोन नद्यांच्या संगमामधून रियो देला प्लाताची निर्मिती होते. रियो देला प्लाता सुमारे २०० किमी वाहून अटलांटिक महासागराला मिळते.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: