माक्सू पिक्त्सू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गुणक: 13°9′48″S 72°32′46″W / 13.16333°S 72.54611°W / -13.16333; -72.54611

माक्सू पिक्त्सूचे अवशेष

माक्सू पिक्त्सू (स्पॅनिश: Machu Picchu) हे पेरू ध्वज पेरू  देशातील ऐतिहासिक इन्का साम्राज्यातील एक स्थळ आहे. माक्सू पिक्त्सू पेरूमधील कुस्को शहराच्या ८० किमी वायव्येला समुद्रसपाटीपासुन ८,००० फूट उंचीवर स्थित आहे व इन्का साम्राज्याच्या सर्वाधिक महत्त्वाच्या खुणांपैकी एक मानले जाते. युनेस्कोने माक्सू पिक्त्सूला जागतिक वारसा स्थान जाहीर केले आहे. तसेच २००७ साली प्रकाशित झालेल्या जगातील सात नवी आश्चर्ये ह्या यादीमध्ये देखील माक्सू पिक्त्सूचा समावेश केला गेला.