पिसाचा कलता मनोरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पिसाचा कलता मनोरा
Leaning tower of pisa 2.jpg

देश इटली ध्वज इटली
स्थान पिसा
प्रांत तोस्काना
गुणक 43°43′23″N 10°23′47″E / 43.72306, 10.39639गुणक: 43°43′23″N 10°23′47″E / 43.72306, 10.39639

पिसाचा कलता मनोरा (इटालियन: Torre pendente di Pisa) हा इटली देशाच्या पिसा शहरातील एक चर्चचा मनोरा आहे. इटलीमधील एक लोकप्रिय आकर्षण असलेला हा मनोरा गेले अनेक शतके एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत आहे.

इ.स. ११७३ साली ह्या मरोऱ्याच्या बांधकामास प्रारंभ झाला व त्यानंतर १७७ वर्षे हे बांधकाम चालू होते. कमकुवत पाया, पायाखालील ठिसूळ जमीन इत्यादी कारणांमुळे १९८८ साली तीन मजले बांधून पूर्ण झाल्यानंतर हा मनोरा एका बाजूला कलण्यास सुरुवात झाली.

गॅलिलिओने गुरुत्वाकर्षण सिद्ध करण्यासाठी अनेक प्रयोग ह्याच मनोऱ्यावरून केले होते.

पिसाचा टॉवर हा एखाद्या अवाढव्य वेडिंग केकसारखा दिसतो. तो पांढऱ्याशुभ्र संगमरवराने बांधला आहे. त्याला आठ मजले आहेत. 8 ऑगस्ट 1173ला याचे बांधकाम सुरू झाले. 1178मध्ये बांधकाम दुसऱ्या मजल्यापर्यंत पोचल्यावर टॉवर एका बाजूने खचण्यास सुरवात झाली. सततच्या लढायांमुळे नंतर शंभर वर्षे बांधकाम थांबले. 1272मध्ये बांधकाम पुन्हा परत सुरू झाले. तिरकेपणा जाणवू नये, म्हणून एक बाजू दुसरीपेक्षा थोडी उंच बांधण्यात आली; मात्र यामुळे टॉवर थोडा वक्र झाला. 1319मध्ये सातवा मजला बांधून झाला.1372मध्ये बेलचेंबर बांधण्यात आले. सप्तसुरांशी निगडित सात घंटा इथे आहेत. तळमजल्याला पंधरा कमानी आहेत. त्यानंतरच्या सहा मजल्यांना प्रत्येकी 30 व शेवटच्या मजल्याला 16 कमानी आहेत. टॉवरची उंची बुटक्‍या बाजूने 55.86 मीटर व उंच बाजूने 56. 7 मीटर आहे. आतमधून जाणाऱ्या वर्तुळाकार जिन्याला 296 पायऱ्या आहेत. 1990 ते 2001च्या डागडुजीपूर्वी 5.5 अंशांनी कललेला मनोरा आता 3.99 अंशांनी कलला आहे.

एका ठराविक ठिकाणी उभे राहून पिसाच्या कलत्या मनोऱ्याला ढकलून सरळ करत असल्याचा आभास निर्माण करणारा फोटो इथे अनेक पर्यटक काढतात. अशी एक आख्यायिका आहे, की गॅलिलिओने या मनोऱ्यावरून दोन निरनिराळ्या वजनाचे धातूचे गोळे खाली टाकले होते. खाली पडणाऱ्या वस्तूला लागणारा वेळ हा वजनावर अवलंबून नसतो, हे त्याला सिद्ध करायचे होते. तसेच तिथल्या कॅथेड्रलमधील झुंबरांचे हेलकावे पाहून त्याला पेंड्युलमची कल्पना सुचली, असे म्हणतात. दुसऱ्या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांना असे कळले, की जर्मन लोक या मनोऱ्याचा उपयोग टेहळणी बुरूजासारखा करतात; परंतु ज्या अमेरिकन सार्जंटवर टॉवर उद्‌ध्वस्त करण्याची जबाबदारी टाकली होती, त्याने तो उद्‌ध्वस्त न करण्याचा निर्णय घेतला. 1987मध्ये याला वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित करण्यात आले. 7 जानेवारी 1990मध्ये लोकांसाठी हा मनोरा बंद करण्यात आला. वजन कमी करण्यासाठी सर्व घंटा काढून टाकण्यात आल्या. त्यानंतर तिसऱ्या मजल्याभोवती केबल्स आवळून त्या दूरवर रोवण्यात आल्या. टॉवर जमीनदोस्त होण्यापासून वाचण्यासाठी त्याच्या उंच भागाखालची 38 क्‍युबिक मीटर माती काढण्यात आली. दशकभराच्या अथक प्रयत्नांनंतर डिसेंबर 2001मध्ये हा टॉवर पुन्हा खुला करण्यात आला. नंतर 2008मध्ये पुन्हा 70 मेट्रिक टन माती काढण्यात आली. आता पुढची दोनशे वर्षे तरी त्याला धोका नाही. इतिहासात पहिल्यांदाच हा टॉवर कलण्याचा थांबला आहे