क्रिस्तो रेदेंतोर

क्रिस्तो रेदेंतोर (पोर्तुगीज: Cristo Redentor) हा ब्राझिल देशाच्या रियो दि जानेरोमधील येशू ख्रिस्ताचा एक पुतळा आहे. ३९.६ मी उंच व ३० मी रूंद असलेला हा पुतळा येशू ख्रिस्ताचा जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा पुतळा आहे.[ संदर्भ हवा ] हा पुतळा रियोजवळील कोर्कोव्हादो नावाच्या ७०० मी उंचीच्या डोंगराच्या माथ्यावर स्थित असून तो इ.स. १९२२ ते १९३१ ह्या काळादरम्यान बांधला गेला. क्रिस्तो रेदेंतोर रियो व ब्राझिलच्या सर्वात ठळक खुणांपैकी एक असून ब्राझिलमधील ख्रिस्ती धर्माचे प्रतिक मानला जातो.
२००७ साली प्रकाशित झालेल्या जगातील सात नव्या आश्चर्यांपैकी क्रिस्तो रेदेंतोर हे एक आहे.
बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ
- नकाशा Archived 2006-01-13 at the Wayback Machine. (पोर्तुगीज)