Jump to content

प्रिया मराठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रिया मराठे
जन्म प्रिया शंतनू मोघे
२३ एप्रिल, १९८७ (1987-04-23) (वय: ३७)
ठाणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००६ ते आजपर्यंत
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट विघ्नहर्ता महागणपती
प्रमुख टीव्ही कार्यक्रम या सुखांनो या, तुझेच मी गीत गात आहे, तू तिथे मी, येऊ कशी तशी मी नांदायला
पती
शंतनू मोघे (ल. २०१२)

प्रिया मराठे (जन्म:ठाणे, २३ एप्रिल १९८७) ही एक मराठी अभिनेत्री आहे. 'या सुखांनो या' (२००६) ह्या मराठी दूरचित्रवाहिनी मालिकेत तिने भूमिका करून आपल्या अभिनयास सुरुवात केली.[]

त्या नंतर विविध मराठी आणि हिंदी मालिका, 'कसम से', 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते है', 'चार दिवस सासूचे', 'तू तिथे मी', 'कॉमेडी सर्कस' इत्यादीत त्यांनी काम केले. त्याच सोबत मराठी चित्रपट 'विघ्नहर्ता महागणपती' (२०१६) आणि 'किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी' (२०१६) मध्येपण त्यांनी काम केले. [] []

वैवाहिक जीवन

[संपादन]

प्रिया मराठे यांनी श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनू मोघे सोबत २४ एप्रिल २०१२ रोजी लग्न केले[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Ya Sukhano Ya" (इंग्रजी भाषेत). १ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "Priya Marathe" (इंग्रजी भाषेत). १ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "Priya Marathe Height, Weight, Age, Husband, Biography & More" (इंग्रजी भाषेत). १ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "'माझा बाबा…वाहणारा प्रेमाचा झरा थांबला!' श्रीकांत मोघेंच्या आठवणींना अभिनेत्री प्रिया मराठेकडून उजाळा!". १ एप्रिल २०२१ रोजी पाहिले.