वरुण धवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वरुण धवन
जन्म २४ एप्रिल, १९८७ (1987-04-24) (वय: ३४)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. २०१२ - चालू
पुरस्कार फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार
वडील डेव्हिड धवन
आई करुणा धवन
पत्नी नताशा दलाल

वरुण धवन (जन्म: २४ एप्रिल १९८७) हा एक भारतीय सिने-अभिनेता असून बॉलिवुड दिग्दर्शक डेव्हिड धवन ह्याचा मुलगा आहे. वरुणने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये सह-नायकाची भूमिका करून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.[१]

चित्रदालन[संपादन]

आरंभीचे आयुष्य[संपादन]

वरुणचा जन्म २४ एप्रिल १९८७ रोजी चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि करुणा धवन यांच्याशी झाला. त्याचे कुटुंब पंजाबी आहे. त्याचा मोठा भाऊ रोहित हा चित्रपट दिग्दर्शक असून तो देसी बॉयझसाठी ओळखला जातो, तर काका अनिल हा अभिनेता आहे.[२] त्यांनी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयातील एच.आर. शिक्षण पूर्ण केले. वरुणने युनायटेड किंगडमच्या नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमधून बिझिनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे.[३] अभिनय कारकीर्दीपूर्वी धवनने करण जोहरच्या सहाय्यक दिग्दर्शकाच्या रूपात माय नेम इज खान (२०१०) या चित्रपटात काम केले.[४]

वैयक्तिक माहिती[संपादन]

२४ जानेवारी २०२१ रोजी वरुणने फॅशन डिझायनर नताशा दलालशी लग्न केले जिच्या बरोबर तो शाळेत शिकला होता आणि १० वर्षांपासून प्रेमसंबंधात होता.[५][६]

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका
२०१२ स्टुडन्ट ऑफ द इयर रोहन  नंदा
२०१४ मैं तेरा हीरो रीनाथ "सिनु" प्रसाद
२०१४ हम्पटी शर्मा की दुल्हनिया   राकेश "हम्प्टी" शर्मा
२०१५ बदलापूर      राघव  "रघु " प्रताप  सिंग
२०१५ एबीसीडी २ सुरेश "सुरु" मुकुंद
२०१५ दिलवाले वीर रणधीर  बक्षी
२०१६ दिशूम जुनैद "जे" अन्सारी
२०१७ बद्रिनाथ कि दुल्हनिया बद्रीनाथ "बद्री " बन्सल
जुडवा २ प्रेम / राजा
२०१८ ऑक्टोबर दानिश वालिया
सुई धागा मौजी शर्मा
२०१९ कलंक जफर चौधरी
२०२० स्ट्रीट डान्सर 3D गब्बरु
कूली नंबर १ राजू कूली/कुंवर राज प्रताप सिंह

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

संदर्भ[संपादन]

  1. ^ "The verdict is out: Varun Dhawan is officially a SUPERSTAR! : Bollywood News - Bollywood Hungama" (इंग्रजी भाषेत). 2017-10-05. 2021-05-15 रोजी पाहिले.
  2. ^ Krishnan, Aishwarya (2016-04-24). "Happy Birthday Varun Dhawan: 7 lesser known facts about the star!". India News, Breaking News | India.com (इंग्रजी भाषेत). 2021-05-15 रोजी पाहिले.
  3. ^ Hungama, Bollywood (2013-01-18). "Check out: Varun Dhawan during his college days : Bollywood News - Bollywood Hungama" (इंग्रजी भाषेत). 2021-05-15 रोजी पाहिले.
  4. ^ "The new stars of Bollywood - Hindustan Times". web.archive.org. 2012-10-05. 2021-05-15 रोजी पाहिले.
  5. ^ "२४ जानेवारीला होणार वरुण- नताशाचं लग्न, कर्मचाऱ्यांना दिल्या खास सुचना". Maharashtra Times. 2021-05-15 रोजी पाहिले.
  6. ^ "Varun Natasha Wedding: शाही लग्न सोहळ्यातील PHOTO VIRAL | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News". News18 Lokmat. 2021-05-15 रोजी पाहिले.