अशोक सराफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अशोक सराफ
जन्म ०४ जून १९४७
इतर नावे मामा, ससम्राट अशोक
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र मराठी नाटक
मराठी चित्रपट
बॉलीवूड
मराठी दूरचित्रवाणी मालिका
हिंदी दूरचित्रवाणी मालिका
कारकीर्दीचा काळ इ.स. १९६९ - चालू
भाषा मराठी, हिंदी
प्रमुख नाटके हमीदाबाईची कोठी
प्रमुख चित्रपट नवरी मिळे नवऱ्याला
गंमत जंमत
अशी ही बनवाबनवी
भुताचा भाऊ (चित्रपट)
आयत्या घरात घरोबा
प्रमुख टीव्ही कार्यक्रम

१. डोन्ट वरी होजायेगा,

२. हम पांच
पत्नी निवेदिता सराफ
अपत्ये अनिकेत सराफ

अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हम पांच सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला.[ संदर्भ हवा ] लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत. सिने अभिनेत्री निवेदिता जोशी ह्या सराफांच्या पत्नी असून नाट्य‍अभिनेते रघुवीर नेवरेकर हे त्यांचे मामा होते.[१]

त्यांनी अनेक चित्रपटात विनोदी भूमिका करण्याबरोबरच काही चित्रपटात खलनायकी तसेच विविध भूमिका तितक्याच ताकदीने व रसिकांच्या आयुष्यभर स्मरणात राहतील अशा साकारलेल्या आहेत. उत्कृष्ट अभिनय, सहज विनोद प्रवृत्ती, चेहऱ्यावरील कमालीचे हावभाव, विनोदाची अचूक वेळ, इत्यादी त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये होती. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे या अभिनेत्यांनी मराठी चित्रपटामध्ये फार मोठा काळ गाजवला आहे. चित्रपट क्षेत्रात सर्वांचे लाडके अशोकमामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत.[ संदर्भ हवा ] त्यांनी मी बहुरूपी हे आत्मचरित्र लिहिले आहे.

ओळख[संपादन]

मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले.[ संदर्भ हवा ] त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.[ संदर्भ हवा ]

गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार'मधील इरसाल पोलीस, 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या.[ संदर्भ हवा ] अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.[ संदर्भ हवा ]

चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे.[२]

अभिनय-प्रवास[संपादन]

अशोक सराफ आणि निवेदिता जोशी

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. दादा कोंडकेंबरोबर पांडू हवालदार , कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन' व 'पहिली शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर'पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले.[ संदर्भ हवा ]

'अनधिकृत' या त्यांच्या रंगभूमीवरील पुनरारंभाच्या नाटकास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. 'मनोमिलन'नंतर सध्या अशोक सराफ सारखं छातीत दुखतंय! हे विनोदी नाटक करीत आहेत. त्यांच्या सोबत पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्या सहकलाकार आहेत.[३] पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून 'टन टना टन' ही मराठी व काही हिंदी मालिका बनवल्या. हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली.[ संदर्भ हवा ] हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 'दामाद' (जावई) या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. 'करण अर्जुन', 'कोयला', 'येस बॉस', 'जोडी नं.१' हे अशोक सराफ अभिनीत काही उल्लेखनीय चित्रपट.[ संदर्भ हवा ]

अमेरिकेतील सिएटल येथे नुकत्याच झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शन २००७ येथे विजय केंकरे दिग्दर्शित 'हे राम कार्डिओग्राम' या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही पाऊल ठेवले आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकातून सदैव मनोरंजीत केले आहे.आधीच्या काळी ते नायक,खलनायक,दुहेरी भूमिका सहाय्यक व्यक्तीरेखा व विनोदी भूमिकेत लहान होते आणि सुधीर जोशी,विजू खोटे मोठे होते आणि आजकाल वडलांच्या पात्रात मोठे आहेत आणि प्रथमेश परब, परश्या,अभिजीत खांडकेकर असे ठरावीक जण लहान आहेत.[ संदर्भ हवा ]

कारकीर्द[संपादन]

अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. मुुुख्यात्वे त्यानी सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे सारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर काम केले.सचिन पिळगांवकर अशोक सराफ यांचा आदर करतात.[४] आपल्या प्रत्येक सिनेमात अशोक मामांची भूमिका असावी असा त्यांचा प्रयत्न असतो. अशोक सराफ यांनी मराठी नाटकांतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या वडिलांचा इलेक्ट्रिक वस्तू आणण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता. अशोक सराफ यांनी बँकेत दहा वर्ष नोकरी केली पण प्रत्यक्षात ते नोकरीवर हजर कमी राहायचे आणि नाटकात जास्त काम करायचे.[ संदर्भ हवा ] त्यांची पहिली फिल्मी भूमिका एका विदूषकाची होती. दादा साहेब कोंडके यांच्या 'पांडू हवालदार' या चित्रपटात त्यांनी 'सखाराम हवालदार' या भ्रष्ट हवालदाराच्या भूमिका साकारली. अशोक सराफ यांची अभिनयाची पद्धत ही सीच्युशनल कॉमेडी स्वरूपाची आहे.त्यांची मिमीक्री कुशल बद्रिके व ओमकार भोजने करतात.[ संदर्भ हवा ]

अभिनय सूची[संपादन]

मराठी चित्रपट[संपादन]

चित्रपटाचे नाव भूमिका कार्य
आयत्या घरात घरोबा गोपू काका अभिनय
आमच्या सारखे आम्हीच भूपाल / निर्भय अभिनय दुहेरी भूमिका
आत्मविश्वास विजय झेंडे अभिनय
नवरी मिळे नवऱ्याला बाळासाहेब अभिनय
गंमत जंमत फाल्गुन अभिनय
भुताचा भाऊ बंडू अभिनय
माझा पती करोडपती दिनेश लुकतुके अभिनय
अशी ही बनवाबनवी धनंजय माने अभिनय
बिनकामाचा नवरा तुकाराम अभिनय
फेका फेकी राजन अभिनय
एक डाव भुताचा खंडोजी फर्जंद अभिनय
एक डाव धोबीपछाड दादा दांडगे अभिनय
आलटून पालटून अभिनय
एक उनाड दिवस विश्वास दाभोळकर अभिनय
सगळीकडे बोंबाबोंब सदा खरे अभिनय
साडे माडे तीन रतन दादा अभिनय
कुंकू अभिनय
बळीराजाचं राज्य येऊ दे अभिनय
घनचक्कर माणकू अभिनय
फुकट चंबू बाबुराव
तू सुखकर्ता विनायक विघ्नहर्ते अभिनय
नवरा माझा नवसाचा कंडक्टर अभिनय
वजीर अभिनय
अनपेक्षित दुहेरी भूमिका उत्तमराव आणि अभिनय
एकापेक्षा एक इन्स्पेक्टर सर्जेराव शिंदे अभिनय
चंगु मंगु चंगू आणि रामन्ना अभिनय (दुहेरी भूमिका)
अफलातून बजरंगराव
सुशीला
वाजवा रे वाजवा उत्तमराव टोपले
शुभमंगल सावधान प्रतापराव पाटील केतकावळीकर अभिनय
जमलं हो जमलं बापू भैय्या अभिनय
लपंडाव अभिजीत समर्थ
चौकट राजा गणा
गोडीगुलाबी राजेश/अनिलपैकी एक नायक सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तीरेखा-पुरुष
गडबड घोटाळा हेमू ढोले
मुंबई ते मॉरिशस प्रेम लडकू नायक
धमाल बाबल्या गणप्याची
बाळाचे बाप ब्रम्हचारी सारंग नायक
प्रेम करू या खुल्लम खुल्ला बजरंग
गुपचुप गुपचुप प्रोफेसर धोंड
गोष्ट धमाल नाम्याची नामदेव (नाम्या)
हेच माझं माहेर कामन्ना
गोंधळात गोंधळ मदन नायक
चोरावर मोर
जवळ ये लाजू नको
पांडू हवालदार सखाराम हवालदार अभिनय
दोन्ही घरचा पाहुणा
राम राम गंगाराम म्हामदू
अरे संसार संसार
वाट पाहते पुनवेची
भस्म
खरा वारसदार रंजीत नायक
कळत नकळत सदू मामा
आपली माणसं
पैजेचा विडा
बहुरूपी
धूमधडाका अशोक गुपचूप अभिनय
माया ममता
सखी
बाबा लगीन
निशाणी डावा अंगठा हेडमास्तर अभिनय
आयडियाची कल्पना
झुंज तुझी माझी
टोपी वर टोपी खलनायक

हिंदी चित्रपट[संपादन]

अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटांमध्ये मुख्य व सहाय्यक भूमिका निभावल्या त्या चित्रपटांची नावे खाली दिलेली आहेत.[ संदर्भ हवा ]

चित्रपट भूमिका वर्ष
कुछ तुम कहो कुछ हम कहें गोविंद
बेटी नं. १ राम भटनागर
कोयला वेदजी
गुप्त हवालदार पांडू
ऐसी भी क्या जल्दी है डॉ. अविनाश
संगदिल सनम भालचंद्र
जोरू का गुलाम पी. के. गिरपडे
खूबसूरत महेश चौधरी
येस बॉस जॉनी
करण अर्जुन मुंशीजी
सिंघम हेड कॉन्स्टेबल सावलकर

२०११

प्यार किया तो डरना क्या तडकालाल

रंगमंच[संपादन]

अशोक सराफ अभिनित नाटके

नाटकाचं नाव
हमीदाबाईची कोठी
अनधिकृत
मनोमिलन
हे राम कार्डिओग्राम
डार्लिंग डार्लिंग
सारखं छातीत दुखतंय
व्हॅक्यूम क्लीनर[५]

मालिका[संपादन]

अशोक सराफ अभिनित दूरचित्रवाहिनी मालिका.[ संदर्भ हवा ]

मालिकेचे नाव साकारलेली भूमिका टीव्ही चॅनल भाषा वर्ष
टन टना टन ई टीव्ही मराठी मराठी
हम पांच आनंद माथुर झी टीव्ही हिंदी १९९५
डोन्ट वरी हो जाएगा संजय भंडारी सहारा टीव्ही हिंदी २००२
छोटी बडी बातें हिंदी
नाना ओ नाना नाना मी मराठी मराठी २०११

संदर्भ[संपादन]

  1. ^ [१]
  2. ^ "मराठीनायक.कॉम वरील अशोक सराफ यांचे व्यक्तिचित्र". Archived from the original on 2007-10-08. 2007-09-12 रोजी पाहिले.
  3. ^ "अशोक सराफ पुन्हा रंगभूमीवर!". Archived from the original on 2007-12-21. 2007-09-12 रोजी पाहिले.
  4. ^ [२]
  5. ^ "व्हॅक्यूम क्लीनर मराठी नाटक [Review] • रंगभूमी.com". रंगभूमी.com. 2021-11-12. 2021-11-28 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत