विजय रूपाणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विजय रूपाणी
विजय रूपाणी


विद्यमान
पदग्रहण
७ ऑगस्ट २०१६
मागील आनंदीबेन पटेल
मतदारसंघ राजकोट पश्चिम

राज्यसभा सदस्य
कार्यकाळ
२००६ – २०१२

जन्म २ ऑगस्ट, १९५६ (1956-08-02) (वय: ६५)
यांगून, बर्मा
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
धर्म जैन

विजय रूपाणी (जन्म: २ ऑगस्ट १९५६) हे भारतीय जनता पक्षाचे गुजरातमधील वरिष्ठ राजकारणी, विधानसभा सदस्य व गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

२०१४ पासून मुख्यमंत्री राहिलेल्या आनंदीबेन पटेल ह्यांना राज्यातील काही महत्त्वाच्या घटना हाताळण्यात अपयश आले व ह्या कारणावरून पटेल ह्यांनी २०१६ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पक्षाने त्यांच्या जागी विजय रूपाणी ह्यांची निवड केली व ७ ऑगस्ट २०१६ रोजी रूपाणींनी पदाची शपथ घेतली.

बर्माच्या यांगून येथे जन्मलेले रूपाणी १९६० साली कुटुंबाबरोबर गुजरातमध्ये स्थानांतरित झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता राहिलेल्या रूपाणींनी १९७१ साली जनसंघात प्रवेश केला. ते स्थापनेपासून भाजपचे सदस्य आहेत. आणीबाणीच्या काळात त्यांना ११ महिने तुरूंगवास भोगावा लागला होता. १९७८ ते १९८१ दरम्यान रूपाणी रा.स्व. संघाचे प्रचारक होते. १९८७ साली रूपाणी राजकोट महापालिकेवर निवडून आले. सुमारे १० वर्षे राजकोट महापालिकेत राहिल्यानंतर १९९७ मध्ये त्यांना भाजपच्या गुजरात विभागाचे सरचिटणीस बनवण्यात आले. २००६ ते २०१२ दरम्यान रूपाणी राज्यसभा सदस्य होते. २०१४ मध्ये ते सर्वप्रथम गुजरात विधानसभेवर निवडून आले.

बाह्य दुवे[संपादन]