कृष्णा नदी
|
कृष्णा नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या. |
| कृष्णा | |
श्रीशैलम्, आंध्र प्रदेश येथील कृष्णा नदीने तासलेल्या घळईतून नदीपात्राचे दृश्य |
|
| उगम | सह्याद्रीमध्ये महाबळेश्वरजवळ ११३६ मी. |
| मुख | हमसलादेवी (बंगालचा उपसागर) |
| लांबी | १४०० कि.मी. |
| देश | महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश |
| उपनद्या | वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, तुंगभद्रा, घटप्रभा, |
| पाणलोट क्षेत्र | २.९५ लाख किमी² |
| धरण | धोम, अल्लमट्टी, श्रीशैलम, नागर्जुनसागर |
कृष्णा नदी (मराठी: कृष्णा; कन्नड: ಕೃಷ್ಣಾ ನದಿ ; तेलुगू: కృష్ణా నది ;) ही दक्षिणी भारतातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ही नदी महाराष्ट्रातील महाबळेश्वरजवळ उगम पावून सुमारे १,३०० कि.मी. अंतर पार करत बंगालच्या उपसागराला आंध्र प्रदेशातील हंसलदिवी येथे मिळते. वाटेमध्ये ती कराड, औदुंबर, सांगली, नरसोबाच्या वाडीवरून कर्नाटकात प्रवेश करते. महाराष्ट्रातील कृष्णेचा प्रवास ३०० कि मी. आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेली कृष्णा पुढे पूर्वेकडे आंध्र प्रदेशात जाते.कर्नाटकात कृष्णेला दक्षिणेकडून येणारी घटप्रभा नदी मिळते. आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्रातून येणारी भीमा व कृष्णा यांचा संगम होतो. कृष्णा आंध्र प्रदेशात मच्छलीपट्टणमच्या दक्षिणेस बंगालच्या उपसागराला मिळते. मुखाजवळ तिचा प्रवाह ३ शाखांत विभागला जातो. कृष्णा नदीच्या खोर्याचा आंध्र प्रदेशांतील भाग अधिक विस्तृत व सुपीक आहे. तिच्या उगमाकडील भागात पावसाचा पाणीपुरवठा कमी असल्याने उगमाकडे उन्हाळ्यात पाणी खूप कमी असते. आंध्र प्रदेशातील नागार्जुन सागर हे कृष्णा नदीवरील मोठे धरण आहे. तुंगभद्रेवरील तुंगभद्रा धरण व कोयना प्रकल्प ही तिच्या उपनद्यांवरील मुख्य धरणे आहेत. कृष्णा व गोदावरी यांचे त्रिभुजप्रदेश कालव्यांनी जोडले आहेत.
[संपादन] संदर्भ
[संपादन] बाह्य दुवे
- रेन वॉटर हार्वेस्टिंग.कॉम - कृष्णा नदीची माहिती (इंग्लिश मजकूर)
- [कृष्णेचा प्रागैतिहासिक कालखंड इंग्लिश] (मराठी मजकूर)
- [कृष्णेची कालरेषा इंग्लिश] (मराठी मजकूर)
कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या
|
|||||
भारतातील नद्या
|
|||||||||||
