चाळीसगाव
| ?चाळीसगाव महाराष्ट्र • भारत |
|
| — तालुका — | |
|
|
|
| गुणक: (शोधा गुणक) | |
| प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
| भाषा | मराठी |
| तहसील | चाळीसगाव |
| पंचायत समिती | चाळीसगाव |
चाळीसगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.
| शहर | चाळीसगाव |
| जिल्हा | जळगाव |
| राज्य | महाराष्ट्र |
| जनगणना वर्ष | इ.स. २००१ |
| लोकसंख्या | -- |
| दूरध्वनी कोड | ०२५८९ |
| पोस्ट्ल कोड | ४२४१०१ |
| आर.टी.ओ कोड | MH-१९ |
चाळीसगाव शहराचे दोन मुख्य भाग आहेत - जुने शहर व नवे शहर. या दोन्हीच्या मधून डोंगरी नदी वाहते.
अनुक्रमणिका |
[संपादन] दळण वळण
चाळीसगाव हे लोहमार्ग व राज्य महामार्गांनी इतर शहरांशी जोडलेले आहे. लोहमार्गावरील भुसावळनजीक असलेले हे मध्य रेल्वेवरील मुंबई-दिल्ली मार्गावरील एक जंक्शन स्टेशन आहे. चाळीसगाववरून धुळे येथे जाण्यासाठी रेल्वेचा फाटा फुटतो. चाळीसगाव हे एक महत्त्वाचे स्थानक असल्याने येथे बहुतेक सर्व रेल्वेगाड्या थांबतात. मुंबई व पुणे येथून अंदाजे सात तासांच्या अंतरावर आहेत. जळगाव, नासिक, औरंगाबाद व धुळे ही शहरे येथून साधारणतः एकाच अंतरावर आहेत. या शहरासाठी पुरेशा प्रमाणात पाणी व वीज उपलब्ध आहे.
[संपादन] भूगोल
चाळीसगाव महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात नैर्ऋत्य दिशेस आहे. चाळीसगावच्या उत्तरेस धुळे जिल्हा व पारोळा तालुका, पश्चिमेस नासिक जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा तर पूर्वेस पाचोरा व भडगाव तालुके आहेत. चाळीसगाव डोंगरी व तित्तूर या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या नद्या पुढे गिरणाला मिळतात. गिरणा पुढे अरबी समुद्रास मिळणाऱ्या तापी नदीस मिळते.
[संपादन] पर्यटन
चाळीसगावच्या दक्षिणेस सातमाळा नावाची डोंगराची रांग आहे. अजिंठा व वेरूळही चाळीसगावच्या जवळची प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. अन्य पर्यटनस्थळांत [[पाटणादेवी]] व [[पितळखोरे]] लेणी ही वाखाणण्याजोगी आहेत. पाटणादेवी मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली शैलीत मोडते. तसेच चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती असलेले सौंदर्यशैलीत भर घालणारा, हिंदू मुसलमान एकीचे प्रेम जपणारा व बंधुभावाची शिकवण देणारा पिरमुसा कादरीबाबाचा दर्गा येथे आहे.
[संपादन] उद्योग
इथे कृषी उत्पन्नावर आधारित बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव कापड गिरणी, तेल व विड्यांचे कारखाने इ. अनेक उद्योग आहेत. इतर उद्योगांना चालना देण्याकरता इथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे चाळीसगाव उद्योग क्षेत्र आहे.
[संपादन] कृषी
चाळीसगाव व जवळपासच्या भागात शेती हा मुख्य धंदा आहे. ऊस, कपाशी व केळी ही मुख्य रोख पिके आहेत. येथे भुईमूगाचीही लागवड होते. ज्वारी, बाजरी व गहू ही धान्येही घेतली जातात. बहुतांश शेती जिरायती आहे.
[संपादन] बाह्य दुवे
| जळगाव जिल्ह्यातील तालुके |
|---|
| चाळीसगाव | भडगांव | पाचोरा | जामनेर | पारोळा | एरंडोल | धरणगाव | जळगाव तालुका | भुसावळ | मुक्ताईनगर | अमळनेर | चोपडा | यावल | रावेर | बोदवड |