मध्य प्रदेश
?मध्यप्रदेश भारत | |
— राज्य — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ३,०८,१४४ चौ. किमी |
राजधानी | भोपाळ, मध्यप्रदेश |
मोठे शहर | इंदूर |
जिल्हे | ५० |
लोकसंख्या • घनता |
७,२५,९७,५६५ (सहावा) • २४०/किमी२ |
भाषा | हिंदी भाषा |
राज्यपाल | मंगुभाई पटेल |
मुख्यमंत्री | मोहन यादव |
मुख्य सचिव | इकबाल सिंह बैंस |
स्थापित | १ नोव्हेंबर १९५६ |
विधानसभा (जागा) | मध्य प्रदेश विधानसभा (२३०) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-MP |
संकेतस्थळ: मध्य प्रदेश राज्याचे संकेतस्थळ |
मध्य प्रदेश ( उच्चार (सहाय्य·माहिती)) हे भारत देशामधील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे व २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत ६ व्या क्रमांकावर आहे. ह्याला भारताचे हृदय देखील म्हंटले जाते, कारण ते भारत देशाच्या मध्यावर आहे. मध्य प्रदेशात वाघांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. म्हणून या राज्याला टायगर स्टेट या नावाने सुद्धा ओळखले जाते. फार फार पूर्वी अवंती महाजनपद म्हणून हा प्रदेश ओळखला जात होता. त्याकाळी त्या प्रदेशाची राजधानी उज्जैन होती. राज्याचे ६ सांस्कृतिक विभाग आहेत; निमाड, मालवा, बुंदेलखंड, बघेलखंड, महाकौशल आणि ग्वाल्हेर.
भारताच्या मध्य प्रदेश हे राज्य, भाषावार प्रांतरचनेनंतर १ नोव्हेंबर इ.स. १९५६ला बनवले गेले. त्यानंतर, १ नोव्हेंबर इ.स. २०००ला पुन्हा त्यातून छत्तीसगढ हा विभाग वेगळा होऊन त्याचे स्वतंत्र्य राज्य निर्माण केले गेले. नर्मदा नदीच्या खोऱ्यात हठ्नोरा आदिमानव हा मध्य प्रदेशात सुमारे ३,००,००० वर्षांपूर्वी, मिडल Pleistocene कालखंड पासून जगात आले असते हे दर्शविते. नंतर मेसोलीठीक कालावधी दिनांक ?? पेंट मातीची भांडी भीमबेटका रॉक shelters मध्ये सापडला आहे . कायथा संस्कृती (2100-1800 सालच्या) आणि माळवा संस्कृती (1700-1500 सालच्या) राज्यातील पश्चिम भागात शोधला गेले आहेत राहण्याचे चाल्कॉलीठीक साइट.
भूगोल
[संपादन]मध्य प्रदेशला लागून
- ईशान्येला - उत्तरप्रदेश,
- पश्चिमेला - गुजरात,
- पूर्वेला- छत्तीसगढ,
- वायव्येला- राजस्थान व
- दक्षिणेला महाराष्ट्र आहेत.
मध्य प्रदेश या राज्याच्या मध्यावर नर्मदा नदी आहे व सातपुडा व विंध्य हे पर्वत आहेत.
मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळ आहे.
प्रशासकीय विभाग
[संपादन]मध्य प्रदेश राज्याचे खालील दहा प्रशासकीय विभाग आहेत.
- भोपाळ विभाग
- चंबळ विभाग
- इंदूर विभाग
- जबलपूर विभाग
- उज्जैन विभाग
- ग्वाल्हेर विभाग
- रेवा विभाग
- शाहडोल विभाग
- होशंगाबाद विभाग
- सागर विभाग
जिल्हे
[संपादन]मध्य प्रदेश राज्यात् खालील ४८ जिल्हे आहेत.
- अनुपपुर
- अशोकनगर
- बालाघाट
- बडवानी
- बैतूल
- भिंड
- भोपाळ
- बऱ्हाणपूर
- छत्रपूर
- छिंदवाडा
- दमोह
- दातिया
- देवास
- धार
- दिंडोरी
- गुणा
- ग्वाल्हेर
- हरदा
- होशंगाबाद
- इंदूर
- जबलपूर
- झाबुआ
- कटनी
- खांडवा (पूर्व निमर)
- खरगोन (पश्चिम निमर)
- मंडला
- मंदसौर
- मोरेना
- नरसिंगपूर
- नीमच
- पन्ना
- रेवा
- राजगढ
- रतलाम
- रायसेन
- सागर
- सतना
- सिहोर
- शिवनी
- शाहडोल
- शाजापूर
- शिवपूर
- शिवपुरी
- सिधी
- टिकमगढ
- उज्जैन
- उमरिया
- विदीशा
यावरील विस्तृत लेख पहा - मध्य प्रदेशमधील जिल्हे.
बाह्य दुवे
[संपादन]- मध्यप्रदेश सरकारचे पोर्टल (इंग्रजी मजकूर)
- मध्यप्रदेशच्या पर्यटन विभागाचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर)
- तात्पुरती एकूण लोकसंख्या - २०११ची लोकसंख्येची मोजणी:मध्य प्रदेश (इंग्रजी मजकूर)
राजस्थान | राजस्थान, उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश | ||
गुजरात | छत्तीसगढ | |||
मध्यप्रदेश | ||||
महाराष्ट्र | महाराष्ट्र | छत्तीसगढ |