आदिमानव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आदिमानवसद्य मानव जातीचा पुर्वज (Homo erectus). या प्रजाती पासून उत्क्रांती होत होत आजची मानवजात निर्माण झाली असे मानण्यात येते. मात्र त्यातही विविध भूभागात वेगवेगळे आदिमानव असल्याचे पुरावे सापडले आहेत. जसे की जावा बेटावर सापडलेल्या अवशेषांवरून येथे पाच लाख वर्षांपूर्वी आदिमानव होता असे दिसून आले आहे.

सद्य संशोधन[संपादन]

न्यूकास गॉडफ्रेडसन हा चित्रकार आणि जीवाश्मशास्त्रज्ञ उत्तर ध्रुवीय प्रदेशातील मानवसदृश प्राण्यांचा शोध घेतला. लक्षावधी वर्षांपूर्वी उत्तरध्रुवीय प्रदेशात मानव निर्माण झाला असावा आणि त्यानंतरच्या भौगोलिक परिस्थितीतील बदलांमुळे तो विषुववृत्तीय प्रदेशाकडे स्थायिक झाला असावा, असे प्रतिपादन काही शास्त्रज्ञांचा एक गट करतो. तेथे आढळलेल्या जीवाश्मांचे डीएनए आणि इतर माहिती संकलित केल्यानंतर ग्रीनलॅंड, सैबेरियाच्या प्रदेशात राहणारे विशिष्ट चेहरेपट्टीचे मानव असावेत अशाप्रकारे मतप्रवाह सुरू झाला. त्यांचा उल्लेख चिचुकी पीपल असा जीवाश्म शास्त्रीय परिभाषेत करण्यात येतो. या मानवांचे कपाळाचे आणि डोक्याचे पुढील भागातील केस पूर्णपणे नष्ट झालेले. डोळे लांबट आणि अरूंद आणि कानांपासून वाढलेले केस लांबलचक असावेत असा एकंदर अंदाज बांधता आला. केस सुमारे वीस ते पंचवीस सेंटीमिटर लांब असून मानेभोवतीसुद्धा केस असावेत अशी शक्यता वर्तवण्यात आले. अशा व्यक्ती समूहाला इन्यूक नावाने संबोधले जाते. जीवाश्मांच्या अभ्यासानुसार हा मानवसमूह साधारणत: दोन लक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नष्ट झाला असावा असा संशोधकांचा अंदाज आहे. परंतु न्यूकासच्या प्रयत्नांनुसार ‘इन्यूक’ चे तैलचित्र न्यूयॉर्कच्या मानववंश संशोधन केंद्रात उपलब्ध आहे. मानवसदृश प्राणी आणि मानव यांचा खूप जवळचा संबंध असावा असे मानणाराही एक शास्त्रज्ञ गट आहे. चिंपाझी, गोरिला, ओरांगउटान हे मर्कट समूहातील प्राणी आणि आदिमानव त्यांच्यात उत्क्रांती घडून दोन पायांवर चालणारा ‘होमोझेपियन्स’ तयार झाला असावा, असे निश्चितपणे मानणारा संशोधकांचा गट आहे. अर्थात काही संशोधकांचा याला पूर्ण विरोध आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.