Jump to content

गुजरात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुजरात राज्य या पानावरून पुनर्निर्देशित)


  ?गुजरात
ગુજરાત


भारत
—  राज्य  —
गुजरात उच्च न्यायालय, कच्छ रण, द्वारका समुद्र किनारा, लक्ष्मीविलास महल, गांधी आश्रम, कांकरिया तळे
गुजरात उच्च न्यायालय, कच्छ रण, द्वारका समुद्र किनारा, लक्ष्मीविलास महल, गांधी आश्रम, कांकरिया तळे
गुजरात उच्च न्यायालय, कच्छ रण, द्वारका समुद्र किनारा, लक्ष्मीविलास महल, गांधी आश्रम, कांकरिया तळे
Map

२३° १३′ १२″ N, ७२° ३९′ १८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,९६,०२४ चौ. किमी
राजधानी गांधीनगर
मोठे शहर अमदावाद
जिल्हे २६
लोकसंख्या
घनता
६,०३,८३,६२८ (१० वे) (२०११)
• ३०८/किमी
भाषा गुजराती
राज्यपाल नवल किशोर शर्मा
मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल स्थापित_दिनांक = मे १, १९६०
विधानसभा (जागा) Unicameral (१८२)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-GJ
संकेतस्थळ: गुजरात सरकार अधिकृत संकेतस्थळ
गुजरात ગુજરાત चिन्ह
गुजरात
ગુજરાત चिन्ह

गुजरात Gujarat.ogg उच्चार (गुजराती: ગુજરાત) हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. भारताच्या एकूण औद्योगिक उत्पन्नातील गुजरातचा वाटा १९.८% आहे.भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य आहे.

इतिहास

[संपादन]

ऐतिहासिक दृष्ट्या गुजरात प्रांत हा सिंधु संस्कृतीतल्या अनेक केंद्रांपैकी एक महत्त्वाचा भाग ओळखला जातो. मुघलांपुर्वी राजस्थान व गुजरात मधील काही प्रांत मिळून गुर्जराष्ट्र किंवा गुर्जरभुमी म्हणुन ओलखला जात असे.त्यामध्ये प्राचीन काळी लोथल, धोलावीरा व गोलाढोरो यांसारखी महानगरे सिंधु सभ्यतेत अस्तित्वात होती.प्रचिन लोथल येथे भारताच्या पहिले बंदर उभारले गेले.

भौगोलिक वैशिष्ट्ये, मृदा व खनिजे

[संपादन]
राज्य प्रतिके गुजरात
भाषा गुजराती
गीत जय जय गरवी गुजरात
नृत्य दांडिया
प्राणी सिंह
पक्षी महा रोहित
फुल झेंडू
फळ आंबा
वनस्पती वड
खेळ कबड्डी

जिल्हे

[संपादन]

यावरील विस्तृत लेख पहा - गुजरातमधील जिल्हे.

हवामान

[संपादन]

समाज जीवन

[संपादन]

गुजरात मधील समूहायांचे प्रमाण

आर्थिक स्थिती

[संपादन]

राजकारण

[संपादन]

सुरुवातीला येथे काँग्रेस पार्टीचे सरकार होते.परंतु १९९० च्या दशकापासून या राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे.नरेंद्र मोदी हे राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर होते. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत नरेंद्र मोदींमुळे हे राज्य सर्वाधिक चर्चित राज्य होते.

डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. श्री विजय रूपांनी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.

प्रमुख शहरे

[संपादन]

पर्यटन स्थळे

[संपादन]

गुजरात हे देशातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि 2020 मध्ये 19.5 दशलक्ष देशी पर्यटक आणि 210 हजार आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी भेट दिली.[] गुजरातमध्ये अनेक ऐतिहासिक तसेच आधुनिक पर्यटनस्थळे आहेत.[] अलिकडच्या वर्षांत स्टॅच्यू ऑफ युनिटी हे गुजरातचे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे.

१) गीर अभयारण्य - आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध अभयारण्य

२) गिरनार - जुनागढ जवळील दत्ता संप्रदायाचे महत्त्वाचे स्थान

३) द्वारका - श्रीकृष्णाच्या देवालासाठी प्रसिद्ध. बेट द्वारका हे जवळचे ठिकाण श्री कृष्णाची राजधानी होती असे मानले जाते.

४) मोढेराचे सूर्य मंदिर - भारताच्या अतिशय दुर्मिळ असे सूर्य मंदिर.

५) राणीनी वाव - पाटण जिल्ह्यातील पायऱ्यांची विहीर. ही युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे.

६) सोरटी सोमनाथ - येथील शिवमंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ https://tourism.gov.in/sites/default/files/2022-04/India%20Tourism%20Statistics%202021.pdf India tourism statistics 2021
  2. ^ "Complete Gujarat Travel Guide, Places". 2 April 2024 रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]