Jump to content

गुजरातमधील जिल्हे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुजरातमधील जिल्हे
विकिमीडिया यादी लेख
देशभारत संपादन

भारताच्या गुजरात राज्यात ३४ जिल्हे आहेत. १९६० साली मुंबई राज्याच्या उत्तर भागतील १७ जिल्हे वेगळे काढून गुजरात राज्याची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून गुजरातने हळूहळू ह्या १७ जिल्ह्यांचे विभाजन करून जिल्ह्यांची संख्या वाढवली आहे.[] कच्छ हा गुजरातचा सर्वात मोठा जिल्हा आहे, तर डांग हा सर्वात लहान जिल्हा आहे. अहमदाबाद हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आहे, तर डांग हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.

इतिहास

[संपादन]

१ मे १९६० रोजी बॉम्बे राज्यातील १७ उत्तरेकडील जिल्ह्यांमधून गुजरात राज्याची निर्मिती झाली, जेव्हा ते भाषिक आधारावर विभाजित केले गेले आणि मराठी भाषिक महाराष्ट्र देखील तयार केला गेला.[] हे १७ जिल्हे होते - अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, भरूच, भावनगर, डांग, जामनगर, जुनागढ, खेडा, कच्छ, मेहसाणा, पंचमहाल, राजकोट, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर आणि वडोदरा.

१९६४ मध्ये अहमदाबाद आणि मेहसाणा या जिल्ह्यांच्या काही भागांतून गांधीनगरची निर्मिती करण्यात आली. १९६६ मध्ये सुरतपासून वलसाड वेगळे करण्यात आले.

२ ऑक्टोबर १९९७ रोजी पाच नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले:

  • खेडापासून आणंद वेगळे करण्यात आले.
  • पंचमहालपासून दाहोद वेगळे करण्यात आले.
  • भरूचपासून नर्मदा वेगळे करण्यात आले.
  • वलसाडपासून नवसारी वेगळे करण्यात आले.
  • जुनागडपासून पोरबंदर वेगळे करण्यात आले.

२००० मध्ये, बनासकांठा आणि मेहसाणा या जिल्ह्यांच्या काही भागांतून पाटण जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. २ ऑक्टोबर २००७ रोजी, सुरतपासून वेगळे करून तापी जिल्ह्याची राज्याचा २६वा जिल्हा म्हणून निर्मिती करण्यात आली.

१५ ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र मोदी प्रशासनाने ७ नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली.[]

२ ऑक्टोबर २०२५ रोजी बनासकांठाच्या काही भागांतून वाव-थरादची निर्मिती करण्यात आली.[]

यादी

[संपादन]
क्र.संकेत[]जिल्हामुख्यालयलोकसंख्या
(२०११)[]
क्षेत्रफळ
(किमी²)
घनता
(प्रती किमी²)
निर्मितीनकाशा
BKबनासकांठापालनपुर२१,४१,६६६६,१७६२९०१९६०
ARअरवलीमोडासा१०,५१,७४६३,२१७३२७२०१३
PAपाटणपाटण१३,४२,७४६५,७३८२३४२०००
GAगांधीनगरगांधीनगर१३,८७,४७८२,१६३६६०१९६४
MAमहेसाणामहेसाणा२०,२७,७२७४,३८६४६२१९६०
SKसाबरकांठाहिम्मतनगर२४,५८,५८९७,३९०३२८१९६०
VTDवाव-थरादथराद९,७८,८४०६,५२७२२०२०२५
AHअहमदाबादअमदाबाद७२,०८,२००७,१७०८९०१९६०
ANआणंदआणंद२०,९०,२७६२,९४२७१११९९७
१०CUछोटा उदेपूरछोटा उदेपूर१०,७१,८३१३,२३७३३१२०१३
११DAदाहोददाहोद२१,२६,५५८३,६४२५८२१९९७
१२KHखेडाखेडा२२,९८,९३४३,६६७५४११९६०
१३MHमहीसागरलुनावडा९,९४,६२४२,५००४४०२०१३
१४PMपंचमहालगोधरा२३,८८,२६७५,२१९४५८१९६०
१५VDवडोदरावडोदरा३६,३९,७७५४,३१२४६७१९६०
१६STसुरतसुरत६०,८१,३२२४,४१८९५३१९६०
१७BRभरूचभरूच१५,५०,८२२६,५२४२३८१९६०
१८DGडांगआहवा२,२६,७६९१,७६४१२९१९६०
१९NRनर्मदाराजपीपळा५,९०,३७९२,७४९२१४१९९७
२०NVनवसारीनवसारी१३,३०,७११२,२११६०२१९९७
२१TAतापीव्यारा८,०६,४८९३,४३५२४९२००७
२२VLबलसाडवलसाड१७,०३,०६८३,०३४५६११९६६
२३RAराजकोटराजकोट३१,५७,६७६११,२०३२८२१९६०
२४AMअमरेलीअमरेली१५,१३,६१४६,७६०२०५१९६०
२५BVभावनगरभावनगर२८,७७,९६१११,१५५२८८१९६०
२६BTबोटादबोटाद६,५६,००५२,५६४२५६२०१३
२७DDदेवभूमी द्वारकाजामखंभाळिया७,५२,४८४५,६८४१३२२०१३
२८GSगीर सोमनाथवेरावळ१२,१७,४७७३,७५४३२४२०१३
२९JAजामनगरजामनगर२१,५९,१३०१४,१२५१५३१९६०
३०JUजुनागढजुनागढ२७,४२,२९१८,८३९३१०१९६०
३१KAकच्छभूज२०,९०,३१३४५,६५२४६१९६०
३२MBमोर्बीमोर्बी९,६०,३२९४,८७११९७२०१३
३३POपोरबंदरपोरबंदर५,८६,०६२२,२९४२५५१९९७
३४SNसुरेन्द्रनगरसुरेन्द्रनगर१७,५५,८७३१०,४८९१६७१९६०

संदर्भ

[संपादन]
  1. "Village Map - Revenue Department". Internet Archive. 25 March 2016. रोजी मूळ पानापासून संग्रहित25 March 2016. 9 April 2016 रोजी पाहिले.CS1 maint: unfit url (link)
  2. Dave, Kapil (7 October 2012). "Next Republic Day, Gujarat will be bigger..." The Indian Express. 13 October 2012 रोजी पाहिले.
  3. "Gujarat Govt made major announcement Dholera SIR at Dholera district". Dholera SIR. Government of India. 6 January 2009 रोजी पाहिले.
  4. "Vav-Tharad becomes state's newest district from today". टाइम्स ऑफ इंडिया. २९ जुलै २०२६ रोजी पाहिले.
  5. "NIC Policy on format of e-mail Address: Appendix (2): Districts Abbreviations as per ISO 3166–2" (PDF). Ministry Of Communications and Information Technology, Government of India. 12 February 2018. pp. 5–10. 2021-05-10 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 10 May 2021 रोजी पाहिले.
  6. "Indian Districts by Population, Growth Rate, Sex Ratio 2011 Census". 2011 census of India. 27 December 2012 रोजी पाहिले.