Jump to content

"सुरेश श्रीधर भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६: ओळ ३६:
त्यांचा जन्म महाराष्ट्रातील [[अमरावती]] येथे कर्‍हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांचा खूप नाद होता. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली.

ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.
सुरेश भट यांनी ते अडीच वर्षाचे असताना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.

शालेय जीवनात त्यांना संगीताची गोडी आईने लावली होती. त्या स्वत: हार्मोनिअम वाजवत. त्यांनी मैदानी खेळ खेळण्यास जाऊ न शकणार्‍या आपल्या लाडक्या मुलाला बाजाची पेटी आणली होती. भट यांचे वडील- श्रीधरपंतही संगीतप्रेमी होते. त्यांनी एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन (चावीवाला) आणला होताच; मुलाची आवड पाहून आठवड्यातून ते एक तरी रेकॉर्ड विकत आणत. ही संगीतआवड सुरेश भट यांना शाळेच्या बँडपथकात घेऊन गेली. तिथे ते बासरी वाजवीत. संगीतातील गती पाहून श्रीधरपंतांनी सुरेशला रीतसर संगीत शिक्षण द्यायचे ठरविले आणि प्रल्हादबुवा घरी येऊ लागले. आजारी असताना सुरेश भट तासन् तास अंथरुणावर बासरी वाजवत बसलेले असायचे. गुलाबराव महाराज यांचा ‘गानसोपान’ ग्रंथ असो की संगीतभास्कर भातखंडेकृत ‘संगीत खंड’ असो; सारे ग्रंथ सुरेश भट यांनी त्याच काळात वाचले होते. नव्हे, ‘गानसोपान’ची पारायणे केली होती. १९५२ ला त्यांना तबला शिकावासा वाटल्यावर तोही ते शिकले. पुढे ते ढोलकीही वाजवीत.

त्यांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यानंतर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.

१६:२३, ३० जानेवारी २०१७ ची आवृत्ती

सुरेश श्रीधर भट
जन्म नाव सुरेश श्रीधर भट
टोपणनाव गझलसम्राट
जन्म एप्रिल १५, १९३२
अमरावती, महाराष्ट्र
मृत्यू मार्च १४ ,२००३
नागपूर, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म बौद्ध
कार्यक्षेत्र काव्य, साहित्य, पत्रकारिता
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता,गझल़
प्रसिद्ध साहित्यकृती रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, सप्तरंग
वडील डॉ॰ श्रीधर रंगनाथ भट
आई शांता श्रीधर भट
अपत्ये विशाखा, हर्षवर्धन, चित्तरंजन
स्वाक्षरी सुरेश श्रीधर भट ह्यांची स्वाक्षरी
संकेतस्थळ www.sureshbhat.in

सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते.

त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे कर्‍हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांचा खूप नाद होता. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली.

सुरेश भट यांनी ते अडीच वर्षाचे असताना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.

शालेय जीवनात त्यांना संगीताची गोडी आईने लावली होती. त्या स्वत: हार्मोनिअम वाजवत. त्यांनी मैदानी खेळ खेळण्यास जाऊ न शकणार्‍या आपल्या लाडक्या मुलाला बाजाची पेटी आणली होती. भट यांचे वडील- श्रीधरपंतही संगीतप्रेमी होते. त्यांनी एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन (चावीवाला) आणला होताच; मुलाची आवड पाहून आठवड्यातून ते एक तरी रेकॉर्ड विकत आणत. ही संगीतआवड सुरेश भट यांना शाळेच्या बँडपथकात घेऊन गेली. तिथे ते बासरी वाजवीत. संगीतातील गती पाहून श्रीधरपंतांनी सुरेशला रीतसर संगीत शिक्षण द्यायचे ठरविले आणि प्रल्हादबुवा घरी येऊ लागले. आजारी असताना सुरेश भट तासन् तास अंथरुणावर बासरी वाजवत बसलेले असायचे. गुलाबराव महाराज यांचा ‘गानसोपान’ ग्रंथ असो की संगीतभास्कर भातखंडेकृत ‘संगीत खंड’ असो; सारे ग्रंथ सुरेश भट यांनी त्याच काळात वाचले होते. नव्हे, ‘गानसोपान’ची पारायणे केली होती. १९५२ ला त्यांना तबला शिकावासा वाटल्यावर तोही ते शिकले. पुढे ते ढोलकीही वाजवीत.

त्यांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यानंतर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.

त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.[ संदर्भ हवा ]

त्यांना दोन मुले होती. त्यापैकी एकाचा अपघातात मृत्यू झाला होता.

हृदयविकाराच्या झटक्याने १४ मार्च २००३ रोजी त्यांचा वयाच्या ७१ व्या वर्षी मृत्यू झाला.[]

काव्यसंग्रह

  • एल्गार
  • काफला
  • झंझावात
  • रंग माझा वेगळा (१९७४)
  • रसवंतीचा मुजरा
  • रूपगंधा
  • सप्‍तरंग
  • सुरेश भट - निवडक कविता
  • हिंडणारा सूर्य (गद्य)

सुरेश भट यांच्यावरील पुस्तके

  • गझलसम्राट सुरेश भट आणि ... (प्रदीप निफाडकर)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ (इंग्रजी भाषेत) http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-03-15/news-interviews/27282240_1_suresh-bhat-poet-asha-bhosle. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे