"सुरेश श्रीधर भट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →काव्यसंग्रह |
|||
ओळ ६३: | ओळ ६३: | ||
* सुरेश भट - निवडक कविता |
* सुरेश भट - निवडक कविता |
||
* हिंडणारा सूर्य (गद्य) |
* हिंडणारा सूर्य (गद्य) |
||
==सुरेश भट यांच्यावरील पुस्तके== |
|||
* <small>गझलसम्राट</small>सुरेश भट आणि ... (प्रदीप निफाडकर) |
|||
==संदर्भ आणि नोंदी== |
==संदर्भ आणि नोंदी== |
१६:१२, ३० जानेवारी २०१७ ची आवृत्ती
सुरेश श्रीधर भट | |
---|---|
जन्म नाव | सुरेश श्रीधर भट |
टोपणनाव | गझलसम्राट |
जन्म |
एप्रिल १५, १९३२ अमरावती, महाराष्ट्र |
मृत्यू |
मार्च १४ ,२००३ नागपूर, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | बौद्ध |
कार्यक्षेत्र | काव्य, साहित्य, पत्रकारिता |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | कविता,गझल़ |
प्रसिद्ध साहित्यकृती | रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात, सप्तरंग |
वडील | डॉ॰ श्रीधर रंगनाथ भट |
आई | शांता श्रीधर भट |
अपत्ये | विशाखा, हर्षवर्धन, चित्तरंजन |
स्वाक्षरी | |
संकेतस्थळ | www.sureshbhat.in |
सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना गझल सम्राट असे मानाने संबोधले जाते.
त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे कर्हाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांचा खूप नाद होता. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली.
ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.
त्यांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यानंतर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.
त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.[ संदर्भ हवा ]
त्यांना दोन मुले होती. त्यापैकी एकाचा अपघातात मृत्यू झाला होता.
हृदयविकाराच्या झटक्याने १४ मार्च २००३ रोजी त्यांचा वयाच्या ७१ व्या वर्षी मृत्यू झाला.[१]
काव्यसंग्रह
- एल्गार
- काफला
- झंझावात
- रंग माझा वेगळा
- रसवंतीचा मुजरा
- रूपगंधा
- सप्तरंग
- सुरेश भट - निवडक कविता
- हिंडणारा सूर्य (गद्य)
सुरेश भट यांच्यावरील पुस्तके
- गझलसम्राटसुरेश भट आणि ... (प्रदीप निफाडकर)
संदर्भ आणि नोंदी
- ^
(इंग्रजी भाषेत) http://articles.timesofindia.indiatimes.com/2003-03-15/news-interviews/27282240_1_suresh-bhat-poet-asha-bhosle. Missing or empty
|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- माणिक मोती वरील सुरेश भट यांची गाणी
- सुरेशभट.इन - सुरेश भट व मराठीतील गझलेला समर्पित संकेतस्थळ
- 'सुरेशभट.इन'वरील सुरेश भटांची मुलाखत