माधव त्रिंबक पटवर्धन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माधव पटवर्धन (लेखक) या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
माधव त्रिंबक पटवर्धन
विकिस्रोत लोगो माधव त्रिंबक पटवर्धन यांचे, अथवा यांच्या बद्दलचे साहित्य मराठी विकिस्रोतावर उपलब्ध आहे.:
जन्म नाव माधव त्रिंबक पटवर्धन
टोपणनाव माधव जूलियन
जन्म २१ जानेवारी, इ.स. १८९४;
बडोदा
मृत्यू २९ नोव्हेंबर, इ.स. १९३९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
वडील त्रिंबक विनायक पटवर्धन
आई उमा त्रिंबक पटवर्धन
अपत्ये दिनकर, सुधा

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (जन्म : बडोदा, २१ जानेवारी १८९४; - २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य होते.[१]. ते फारसी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत. इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी "जूलियन" असे टोपणनाव धारण केले [ संदर्भ हवा ]. (माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे). याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे नाव उचलले असेही सांगितले जाते.

गझलरुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. माधव ज्युलियनांनी दित्जू, मा.जू. आणि एम्‌. जूलियन या नावांनीही लिखाण केले आहे. त्यांनी कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन केले आहे. उत्कृष्ट संपादनाचा हा एक नमुना मानला जातो. पटवर्धनांचे काही लिखाण इंग्रजीतही आहे.

पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.

व्यक्तिगत जीवन[संपादन]

पटवर्धनांचा जन्म इ.स. १८९४ साली बडोदा, बडोदा संस्थान येथे झाला. त्यांनी इ.स. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर इ.स. १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला.

व्यावसायिक कारकीर्द[संपादन]

शिक्षणानंतर इ.स. १९१८ ते इ.स. १९२४ या कालखंडात ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी इ.स. १९२५ ते इ.स. १९३९ या काळात अध्यापन केले. माधव त्र्यंबक पटवर्धनांना त्यांच्या ’छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाने १ डिसेंबर १९३८ रोजी डी.लिट्. ही सन्माननीय पदवी दिली. मुंबई विद्यापीठाने मराठी साहित्यासाठी दिलेली ही पहिली डी.लिट. होती.

१९३९साली माधव ज्युलियन यांचे निधन झाले.

माधव जूलियन यांच्या पत्नी लीलाताई पटवर्धन यांनी आमची अकरा वर्षे (१९४५) या पुस्तकात माधवरावांच्या आठवणी सांगितल्या आहेत. हे पुस्तक येथे डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. तिथे ते वाचता येते आणि उतरवूनही घेता येते.

माधवरावांचे व्यक्तिमत्त्व वादळी ठरले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्यावर तीन-चार चरित्रग्रंथ लिहिले गेले आहेत. ते असे :

साहित्यिक कारकीर्द[संपादन]

माधव ज्यूलियन यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]

 • उमरखय्यामच्या रुबाया (इ.स. १९२९, मूळ पर्शियन रुबायांचा पहिला अनुवाद)
 • काव्यचिकित्सा (निधनोत्तर इ.स. १९६४, लेखसंग्रह)
 • काव्यविहार (निधनोत्तर इ.स. १९४७, लेखसंग्रह)
 • गज्जलांजली(१९३३, स्फुट गझला)
 • छंदोरचना (१९३७, संशोधनात्मक)
 • तुटलेले दिवे (१९३८, एक 'सुनितांची माला'नामक दीर्घकाव्य आणि बाकीच्या स्फुट कविता)
 • द्राक्षकन्या (इ.स. १९३१, रुबायांचे दुसरे मराठी भाषांतर)
 • नकुलालङ्कार (इ.स. १९२९, दीर्घकाव्य)
 • फारसी - मराठी शब्दकोष (इ.स. १९२५)
 • भाषाशुद्धि-विवेक (१९३८, लेख आणि भाषणे)
 • मधुलहरी (मृत्यूनंतर इ.स. १९४०, रुबायांचे सुधारित तिसरे भाषांतर)
 • विरहतरङ्ग (इ.स. १९२६, खंडकाव्य)
 • सुधारक (१९२८, दीर्घकाव्य)
 • स्वप्नरंजन (१९३४, काव्यसंग्रह)

प्रसिद्ध कविता[संपादन]

 • कशासाठी पोटासाठी
 • जीव तुला लोभला माझ्यावरी
 • प्रेम कोणीही करीना
 • प्रेमस्वरूप आई
 • मराठी असे आमुची मायबोली

माधव ज्युलियन यांची चरित्रे[संपादन]

पुरस्कार आणि गौरव[संपादन]

 • इ.स. १९३३मध्ये नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे अध्यक्ष.
 • इ.स. १९३४मध्ये बडोदे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष होते.
 • अध्यक्ष, इ.स. १९३६मध्ये जळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलन.
 • "छंदोरचना" साठी मुंबई विद्यापीठाकडून डी. लिट. प्रदान. (मराठी साहित्यातील योगदानाबद्दल भारतातली पहिली डी. लिट.)(१ डिसेंबर १९३८)
 • पुण्यातल्या टिळकरोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहाला ’माधवराव पटवर्धन सभागृह’ असे नाव देण्यात आले आहे.

संकीर्ण[संपादन]

 • आचार्य अत्र्यांचा "झेंडूची फुले" हा काव्यसंग्रह माधव ज्यूलियन व रविकिरण मंडळाचे इतर सदस्य ह्यांच्या हलक्या फुलक्या प्रेमकवितांचे विडंबन आहे.
 • माधव ज्युलियन यांच्या सर्व कवितांचे संकलन व संपादन प्रा. रा.श्री. जोग, डॉ. द.न. गोखले, डॉ. सु.रा. चुनेकर यांनी 'समग्र माधव ज्यूलियन' या नावाने केले आहे.
 • डाॅ.गीता भागवत या विविध कवी आणि त्यांच्या कविता असा रंगमंचीय कार्यक्रम करतात. अशा कवींपैकी माधव ज्यूलियन व विंदा करंदीकर यांच्यावरील कार्यक्रमाचे 'शब्दसुगंध (पुष्प १)' नावाचे पुस्तक गीता भागवत यांनी लिहिले आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

 1. ^ जॉर्ज,के.एम. मॉडर्न इंडियन लिटरेचर, अ‍ॅन ॲंथॉलजी, व्हॉल्यूम ३ (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.