Jump to content

अमोल मिटकरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अमोल रामकृष्ण मिटकरी ( १९८२) एक महाराष्ट्रातील वक्ता व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य असून त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले आहे. २४ मे २०२० रोजी ते इतर ९ जणांसह महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार म्हणून बिनविरोध निवडून आले. मिटकरी हे अकोला जिल्ह्यातील अकोटचे आहेत. ते २०१९ मधील महाराष्ट्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक होते. मराठा सेवा संघापासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेल्या मिटकरी यांनी संभाजी ब्रिगेडमध्येही काम केले आहे.[१][२][३] ते फुले-शाहू-आंबेडकरी विचारांना मानणारे आहेत.[४]

राजकीय कारकीर्द[संपादन]

अमोल मिटकरी यांनी संभाजी ब्रिगेडचे सदस्य म्हणून करिअरची सुरुवात केली. ते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आहेत आणि १४ मे २०२० रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेवर त्यांची निवड झाली आहे.

पदे[संपादन]

  • महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, १४ मे २०२०

संदर्भ[संपादन]

  1. ^ "विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, मिटकरी यांना उमेदवारी". Maharashtra Times. 2020-07-03 रोजी पाहिले.
  2. ^ टीम, टीव्ही 9 मराठी डिजीटल (2020-05-14). "मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला". TV9 Marathi (इंग्रजी भाषेत). 2020-07-03 रोजी पाहिले.
  3. ^ "हुकमी एक्क्यांना विधानपरिषदेचे तिकीट देऊन राष्ट्रवादीने पाळला शब्द | eSakal". www.esakal.com. 2020-07-03 रोजी पाहिले.
  4. ^ "BBC News मराठी".