आंध्र प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आंध्रप्रदेश या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
  ?आंध्र प्रदेश
भारत
—  राज्य  —
हैदराबाद
हैदराबाद

१६° ००′ ००″ N, ७९° ००′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,६०,२०५ चौ. किमी
राजधानी हैदराबाद
मोठे शहर विशाखापट्टणम
जिल्हे 13
लोकसंख्या
घनता
४,९६,६५,५३३ (५ वे) (२०११)
• ३०७.८/किमी
भाषा तेलुगू
राज्यपाल ई.एस.एल. नरसिंहन
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू
स्थापित १ नोव्हेंबर १९५६
विधानसभा (जागा) विधानसभा व विधान परिषद (१७६+५८)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-AP
संकेतस्थळ: आंध्र प्रदेश संकेतस्थळ

गुणक: 16°30′N 80°36′E / 16.5°N 80.6°E / 16.5; 80.6{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही.

आंध्रप्रदेश (तेलुगू- ఆంధ్ర ప్రదేశ్) हे भारतीय २८ राज्यांपैकी एक राज्य आहे. आंध्रप्रदेशाचे क्षेत्रफळ १६०.२०५ वर्ग कि.मी. असून क्षेत्रफळानुसार ते भारतात आठवे राज्य आहे. २०११ च्या जणगणनेुसार आंध्र प्रदेशाची लोकसंख्या ४९,३८६,७९९ एवढी आहे. लोकसंख्येनुसार आंध्र प्रदेश भारतात दहावे राज्य आहे. या राज्याची नवीन राजधानी गुंटुर जिल्ह्यात अमरावती या नावाने विकसित करण्यात येत आहे. काही काळापर्यंत हैदराबाद ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांची राजधानी राहणार आहे.

इतिहास[संपादन]

१ नोव्हेंबर इ.स. १९५६च्या राज्य पुनर्रचना कायद्याने हैदराबाद संस्थानाचे विभाजन होऊन तेलगू भाषकांचा आंध्र प्रदेश निर्माण झाला, मराठी भाषकांचा प्रदेश महाराष्ट्राला जोडला गेला, कन्नड भाषकांचा प्रदेश कर्नाटकाला जोडला गेला.

भूगोल[संपादन]

  • आंध्र प्रदेश राज्याचे क्षेत्रफळ २,७५,०६८ वर्ग किमी आहे.
  • राज्याला ९७२ किमीचा समुद्र किनारपट्टी लाभली आहे.
  • आंध्र प्रदेश राज्य अक्षांश- १२°४१' ते २२° उत्तर व रेखांश- ७७° ते ८४°४०' पूर्व या सीमांमध्ये वसलेला आहे.
  • राज्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ८,४६,५५,५३३ असून लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला ३०८ इतकी आहे.

चतुःसीमा[संपादन]

जिल्हे[संपादन]

यावरील विस्तृत लेख येथे पहा.

आंध्र प्रदेशमध्ये २३ जिल्हे आहेत. जिल्ह्यांची यादी अशी -

राज्यातील पर्यटनस्थळे[संपादन]

चारमिनार[संपादन]

चारमिनार

चारमिनार हा मोहम्मद कुली कुतब शहा यांनी १५९१ साली बांधला. शहराचा प्रतिक म्हणून चारमिनार ओळखला जातो. चारमीनार हे नाव त्याच्या बांधलेल्या पध्दतीवरून हे नाव मिळाले. चारमिनार हा ५४ मीटर उंच आहे.

तिरुपती[संपादन]

बालाजीचे विख्यात मंदिर

तिरुपती हे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती(विष्णू). येथे बालाजीचे विख्यात मंदिर आहे. शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. तेलुगूतमिळ भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय.

श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन[संपादन]

श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. हे हैद्राबादपासून २२० किमी अंतरावर आहे.

एथिपोथला धबधबा[संपादन]

एथिपोथला धबधबा

राज्याची प्रतिके[संपादन]

राज्य प्रतिके आंध्र प्रदेश
प्रतीक
Kalasha.jpg
कलश
भाषा तेलुगू
गीत मा तेलुगू तल्लीकी
नृत्य
Kuchipudi Dance Uma Muralikrishna.jpg
कुचिपुडी
प्राणी
Black Buck.jpg
काळवीट
पक्षी
Indian Roller Bandhavgarh.jpg
चास
फुल
Victoria cruziana flower.jpg
वॉटर लिली
वनस्पती
Unripe Neem fruits.jpg
कडुनिंब
खेळ
Kabaddi..JPG
कबड्डी

आंध्र प्रदेशावरील पुस्तके[संपादन]

  • स्वागतशील शेजारी आंध्र प्रदेश (श्रीनिवास गडकरी)

बाह्य दुवे[संपादन]