तेझपूर विमानतळ
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
| तेझपूर विमानतळ | |||
|---|---|---|---|
| भारतीय वायुसेनेचे सुखोई एसयू-३० लढाऊ विमान. | |||
| आहसंवि: TEZ – आप्रविको: VETZ | |||
| माहिती | |||
| विमानतळ प्रकार | सेना/सार्वजनिक | ||
| मालक | भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
| प्रचालक | भारतीय वायुसेना | ||
| स्थळ | तेझपूर | ||
| उन्नतन(एलिव्हेशन) सरासरी समुद्र- सपाटीच्या वर | २४० फू / ७३ मी | ||
| गुणक (भौगोलिक) | गुणक: | ||
| धावपट्टी | |||
| दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
| फू | मी | ||
| ०५/२३ | ९,०१० | २,७४६ | डांबरी |
तेझपूर विमानतळ भारताच्या आसाम राज्यातील तेझपूर येथे असलेला विमानतळ आहे. येथे वायुसेनेचा तळही आहे. त्याला सलोनीबारी विमानतळ असेही म्हणतात.[१]
हे विमानतळ भारतीय हवाई दलाचा एक प्रमुख तळ आहे.तेझपूर वायुसेना तळ हा सुखोई एसयू-३० या विमानांचे माहेरघरच आहे.[२] या विमानतळाचे स्थानास सामरिकदृष्ट्या फार महत्त्व आहे कारण हा भूतान, तिबेट, चीन,म्यानमार व बांगला देश यांच्या दरम्यान आहे.
अनुक्रमणिका |
इतिहास[संपादन]
ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान या विमानतळाची बांधणी केली गेली. युद्धानंतर, सन १९५९मध्ये यास हवाई दलाचा तळ म्हणून विकसित करण्यात आले. ईशान्य भारतासाठी हा विमानतळ एक महत्त्वाचा तळ आहे. येथून अनेक प्रकारची विमाने उडू शकतात.
येथून उडालेले पहिले विमान हे व्हँपायर व तूफानी १०१ हे होते. गेल्या २५ वर्षांपासून, भारतीय वायुदलाच्या मिग-२१ विमानांचे हे माहेरघरच आहे. विमानतळाचा वापर बहुश: वायुदल करते.
विमानसेवा व गंतव्यस्थान[संपादन]
| विमान कंपनी | गंतव्य स्थान |
|---|---|
| एअर इंडिया स्थानिक | कोलकाता, सिल्चर |
संदर्भ[संपादन]
- ↑ सलोनीबारी विमानतळ. world-airport-codes.com. 4 July 2007 रोजी पाहिले.
- ↑ भारत सुखोई-३० विमाने तेझपूर विमानतळावर ठेवणार (इंग्लिश मजकूर)
बाह्य दुवे[संपादन]
- तेझपूर विमानतळ (इंग्लिश मजकूर)
- विमानतळ माहिती VETZ वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.