तिबेट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| चीनमधील तिबेट स्वायत्त प्रदेश | |||||||||
| अनेक स्वातंत्र्यवादी चळवळींनुसार बृहद तिबेटची व्याख्या | |||||||||
| चीनच्या मते तिबेटची व्याख्या | |||||||||
| अक्साई चीन | |||||||||
| भारताच्या अखत्यारीखालील प्रदेश ज्यांवर चीनने हक्क सांगितला आहे | |||||||||
| इतर ऐतिहासिक तिबेटी भाग | |||||||||
तिबेट (तिबेटी: བོད་; चिनी: 西藏) हे आशिया खंडातील हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील एक पठार आहे. समुद्रसपाटीपासून सरासरी १६,००० फूट उंच असलेले तिबेट हे जगातील सर्वात उंच पठार मानले जाते. सातव्या शतकापासून इतिहास असलेले तिबेट आजवर एक साम्राज्य, स्वायत्त देश व चीन देशाचा प्रांत इत्यादी अनेक स्वरूपांमध्ये अस्तित्वात राहिलेले आहे. आजच्या घडीला तिबेट ह्या नावाने ओळखला जाणारा बराचसा प्रदेश चीनच्या अंमलाखाली (तिबेट स्वायत्त प्रदेश) आहे.
बहुसंख्य बौद्ध धर्मीय असलेले तिबेटी लोक दलाई लामा ह्यांना धर्मगुरू, पुढारी व तिबेटचे खरे शासक मानतात. परंतू १९५९ सालापासून १४वे दलाई लामा तेनझिंग ग्यात्सो हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे भारत सरकारच्या आश्रयास आहेत व ते धरमशालामधूनच आपले सरकार चालवतात.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत