ॠतिक रोशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॠतिक रोशन
जन्म १० जानेवारी, १९७४ (1974-01-10) (वय: ४०)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००० - चालू
वडील राकेश रोशन
पत्नी सुझान रोशन

ॠतिक रोशन (जन्म: १० जानेवारी १९७४) हा भारतामधील एक आघाडीचा सिने-अभिनेता आहे. बॉलिवूड कलाकार राकेश रोशनचा मुलगा असलेल्या ॠतिकने २००० सालच्या कहो ना... प्यार है ह्या चित्रपटामधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला ५ फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

पत्नी सुझन खान सोबत ऋतिक

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्रपट टीपा
2000 कहो ना... प्यार है फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
2000 फिझा
2000 मिशन काश्मीर
2001 यादें
2001 कभी खुशी कभी गम
2002 आप मुझे अच्छे लगने लगे
2002 ना तुम जानो ना हम
2002 मुझसे दोस्ती करोगे!
2003 मैं प्रेम की दिवानी हूं
2003 कोई... मिल गया फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार
2004 लक्ष्य
2006 क्रिश
2006 धूम २ फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
2008 जोधा अकबर फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार
2009 लक बाय चान्स
2010 काईट्स
2010 गुजारिश
2011 जिंदगी ना मिलेगी दोबारा
2012 अग्नीपथ
2013 क्रिश ३

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: