"बाळकृष्ण भगवंत बोरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
संदर्भ - बा.भ. बोरकर शतसंवत्सरिक - संपादन डॉ.सु.म.तडकोड, लेख - डॉ.वासुदेव सावंत
ओळ १२५: ओळ १२५:
* अनुवाद ६
* अनुवाद ६
* कथासंग्रह २
* कथासंग्रह २
* कादंबऱ्या ४
* कादंबऱ्या ४ ('मावळता चंद्र','अंधारातली वाट', 'भावीण','प्रियकामा')
* कोंकणी साहित्यकृती १०
* कोंकणी साहित्यकृती १०
* चरित्रात्मक प्रबंध २
* चरित्रात्मक प्रबंध २

१४:५८, ५ जानेवारी २०२० ची आवृत्ती

बा.भ. बोरकर (टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (नोव्हेंबर ३०, इ.स. १९१० - जुलै ८, इ.स. १९८४) हे मराठी भाषेतील आणि कोंकणी भाषेतील पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते.बा.भ.बोरकर हे मराठी साहित्य प्रेमी व एक उत्कृष्ट कवी देखील होते. बा.भ,बोरकर हे गोमंतकाचं भुषण असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

बालकृष्ण भगवंत बोरकर स्मारक

जीवनकाल

बोरकरांचा जन्म गोमंतकातील कुडचडे या पावन भुमीत ३० नोव्हेंबर इ.स. १९१० या दिवशी झाला. प्रापंचिक अडचणींमुळे त्यांना मॅट्रिकच्या पुढे शिकता आले नाही. इ.स. १९३० साली कु. रुक्मिणीबाई सरदेसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी गोव्यातील सरकारी शाळेत शिक्षकी पेशा पत्करला व चौदा वर्षे याच क्षेत्रात काढली. इ.स. १९३३ साली मडगाव येथील मराठी साहित्य संमेलनात 'प्रतिभा' या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.मराठी बरोबरच त्यांनी कोंकणी भाषेतही लेखन केलेले आहे. इ.स. १९३४ साली त्यांना बडोद्यातील वाङ्‌मय परिषदेच्या अधिवेशनात उत्कृष्ट कवितालेखन व काव्यगायन ('तेथे कर माझे जुळती') यांबद्दल सुवर्णपदक मिळाले. इ.स. १९४६ साली त्यांनी गोव्याच्या मुक्तिसंग्रामात उडी घेतली. पण राजकारणात ते फार काळ रमू शकले नाहीत. इ.स. १९५५ ते इ.स. १९७० या काळात त्यांनी पुणे आणि गोवा आकाशवाणी केंद्रांवर वाङ्‌मयविभागाचे संचालक म्हणून काम केले आणि तेथूनच वयाच्या साठाव्या वर्षी ते निवृत्त झाले.




८ जुलै इ.स. १९८४ रोजी पुणे येथे ते मरण पावले.

बोरकरांच्या कवितांवरील कार्यक्रम

  • शास्त्रीय संगीत गायिका डाॅ. सुहासिनी कोरटकर या बा.भ. बोरकर यांच्या हिंदी-मराठी गीतांवर आधारित ‘दिल चाहे सो गाओ’ हा कार्यक्रम करीत असत.

प्रकाशित साहित्य

शीर्षक प्रकाशन प्रकाशन दिनांक (इ.स.) भाषा साहित्यप्रकार
अनुरागिणी इ.स. १९८२ मराठी कवितासंग्रह
आनंदभैरवी इ.स. १९५० मराठी कवितासंग्रह
कांचनसंध्या इ.स. १९८१ मराठी कवितासंग्रह
गितार इ.स. १९६५ मराठी कवितासंग्रह
चित्रवीणा इ.स. १९६० मराठी कवितासंग्रह
चिन्मयी इ.स. १९८४ मराठी कवितासंग्रह
चैत्रपुनव इ.स. १९७० मराठी कवितासंग्रह
जीवनसंगीत इ.स. १९३७ मराठी कवितासंग्रह
दूधसागर इ.स. १९४७ मराठी कवितासंग्रह
प्रतिभा इ.स. १९३० मराठी कवितासंग्रह
कागदी होड्या इ.स. १९३८ मराठी लघुनिबंध
मावळता चंद्र इ.स. १९३८ मराठी कादंबरी
अंधारातील वाट इ.स. १९४३ मराठी कादंबरी
जळते रहस्य इ.स. १९४५ मराठी कादंबरी (भाषांतरित, मूळ The Burning Secret. लेखक - स्टीफन झ्वायग)
भावीण इ.स. १९५० मराठी कादंबरी
बापूजींची ओझरती दर्शने इ.स. १९५० मराठी भाषांतर
आम्ही पाहिलेले गांधीजी इ.स. १९५० मराठी भाषांतर
काचेची किमया इ.स. १९५१ मराठी भाषांतर
गीता-प्रवचनां इ.स. १९५६ कोॆकणी (विनोबांच्या गीताप्रवचनांचे कोंकणी भाषांतर)
संशयकल्लोळ इ.स. १९५७ कोॆकणी भाषांतर
बोरकरांची कविता इ.स. १९६० मराठी कवितासंग्रह (आरंभापासूनच्या पाच कवितासंग्रहांचे संकलित प्रकाशन)
प्रियदर्शनी इ.स. १९६० मराठी कथासंग्रह
माझी जीवनयात्रा इ.स. १९६० मराठी भाषांतर
गीताय इ.स. १९६० कोंकणी भाषांतर (भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद)
पांयजणां इ.स. १९६० कोॆकणी कवितासंग्रह
आनंदयात्री रवींद्रनाथ : संस्कार आणि साधना इ.स. १९६४ मराठी चरित्रपर
चांदणवेल (बोरकरांच्या निवडक मराठी कविता) इ.स. १९७२ मराठी कवितासंग्रह (संपादित)
वासवदत्ता : एक प्रणयनाट्य इ.स. १९७३ कोंकणी भाषांतर
संशयकल्लोळ (मूळ ले. मोलियर, मराठी रूपांतर : गो. ब. देवल ) इ.स. १९७६ कोंकणी भाषांतर
पैगंबर (ले. खलील जिब्रान) इ.स. १९७६ कोंकणी भाषांतर
मेघदूत इ.स. १९८० मराठी समश्लोकी, समवृत्त, सयमक भाषांतर
सासाय इ.स. १९८० कोंकणी कवितासंग्रह
बामण आनी अभिसार इ.स. १९८१ कोंकणी भाषांतर
चांदण्याचे कवडसे इ.स. १९८२ मराठी ललित लेखसंग्रह
समुद्राकाठची रात्र इ.स. १९८२ मराठी लघुकथासंग्रह
पावलापुरता प्रकाश इ.स. १९८३ मराठी ललित लेखसंग्रह
प्रियकामा इ.स. १९८३ मराठी कादंबरी
भगवान बुद्ध (ले. धर्मानंद कोसंबी) इ.स. १९८३ कोंकणी भाषांतर
कौतुक तू पाहे संचिताचे इ.स. २०१० मराठी आत्मचरित्र (अपूर्ण) (जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित)
बा. भ. बोरकरांचे अप्रकाशित साहित्य इ.स. २०१० मराठी लेखन-संग्रह (जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित)
अप्रकाशित बाकीबाब इ.स. २०१० कोंकणी लेखन-संग्रह (जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित)
महात्मायन मराठी महाकाव्य (अपूर्ण)

संकलित किंवा संपादित सहित्य

बोरकरांच्या निवडक कविता संकलित वा संपादित पद्धतीने खालील पुस्तकांतून प्रकाशित झाल्या आहेत.

शीर्षक प्रकाशन प्रकाशन दिनांक (इ.स.) संपादक भाषा साहित्यप्रकार
कैवल्याचे झाड सुरेश एजन्सी, पुणे इ.स. १९८७ मराठी काव्यसंग्रह
चांदणवेल काँटिनेँटल प्रकाशन इ.स. १९७२ गो.म. कुलकर्णी मराठी काव्यसंग्रह
बोरकरांची कविता मौज प्रकाशन इ.स. १९६० मंगेश पाडगावकर मराठी काव्यसंग्रह
बोरकरांची निवडक कविता साहित्य अकादमी इ.स. १९९६ डॉ. प्रभा गणोरकर मराठी काव्यसंग्रह
बोरकरांची प्रेमकविता सुरेश एजन्सी, पुणे इ.स. १९८४ रा.चिं. ढेरे मराठी काव्यसंग्रह

काव्येतर साहित्यसंपदा

  • अनुवाद ६
  • कथासंग्रह २
  • कादंबऱ्या ४ ('मावळता चंद्र','अंधारातली वाट', 'भावीण','प्रियकामा')
  • कोंकणी साहित्यकृती १०
  • चरित्रात्मक प्रबंध २
  • ललितलेख संग्रह ४
  • संपादित कवितासंग्रह १ कुसुमाग्रजांची निवडक कविता रसयात्रा

बाह्य दुवे

  • https://sites.google.com/site/goapoetry/bakibabprathishtan. Missing or empty |title= (सहाय्य)
  • http://www.marathimati.net/ba-bha-borkar/. Missing or empty |title= (सहाय्य)
  • म.न.से. संकेत-स्थळावरील माहिती.
  • प्रियदर्शिनी तडकोड यांनी केलेली-. (PDF) http://irgu.unigoa.ac.in/drs/bitstream/handle/unigoa/3492/Kavivarya_BB_Borkar_Janmashatasanvatsarik_314.pdf?sequence=1&isAllowed=y. Missing or empty |title= (सहाय्य)