शेख झायेद क्रिकेट स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम
स्टेडियमचे दृष्य
मैदान माहिती
स्थान अबु धाबी, संयुक्त अरब अमिराती
स्थापना २००८
आसनक्षमता २०,०००
प्रचालक पाकिस्तान क्रिकेट मंडळ

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम क.सा. २०–२४ नोव्हेंबर २०१०:
पाकिस्तान  वि. दक्षिण आफ्रिका
प्रथम ए.सा. १८ एप्रिल २००६:
पाकिस्तान वि. भारत
शेवटचा बदल ३० एप्रिल २०१५
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

शेख झायेद क्रिकेट स्टेडियम (अरबी: ملعب الكريكيت الشيخ زايد) हे संयुक्त अरब अमिरातीच्या अबु धाबी शहरामधील एक क्रिकेट स्टेडियम आहे. २०,००० ते २५,००० प्रेक्षकांची क्षमता असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात नव्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील तीन क्रिकेट स्टेडियमपैकी हे एक आहे (इतर दोन: दुबईमधील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमशारजामधील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम).

२०१४ इंडियन प्रीमियर लीगचे सुरुवातीचे काही साखळी सामने येथे खेळले गेले.