Jump to content

"संत तुकाराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
ओळ १०९: ओळ १०९:
* समग्र तुकाराम दर्शन (किशोर सानप)
* समग्र तुकाराम दर्शन (किशोर सानप)
* तुकाराम (हिंदी बालनाट्य, लेखिका - धनश्री हेबळीकर, दिग्दर्शन अभिजित चौधरी, निर्मता युवराज शहा)
* तुकाराम (हिंदी बालनाट्य, लेखिका - धनश्री हेबळीकर, दिग्दर्शन अभिजित चौधरी, निर्मता युवराज शहा)
* श्री तुकाराम महाराज चरित्र - (प्रा. र.रा. गोसावी, वीणा गोसावी)
* तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे : लेखक डॉ. यादव अढाऊ
* तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे : लेखक डॉ. यादव अढाऊ
* तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व : लेखक किशोर सानप आणि मनोज तायडे
* तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व : लेखक किशोर सानप आणि मनोज तायडे

१६:५१, ६ जून २०१९ ची आवृत्ती

तुकाराम बोल्होबा अंबिले {मोरे} चित्र = Tukaram by Raja Ravi Varma.jpg
मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
जन्म माघ शुद्ध ५, शके १५२८, [१ फेब्रुवारी १६०७ ]
देहू, महाराष्ट्र
निर्वाण फाल्गुन कृ.२ , शके १५७१, [१९ मार्च १६५०]
देहू, महाराष्ट्र
संप्रदाय वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय
गुरू केशवचैतन्य (बाबाजी चैतन्य), ओतूर
शिष्य संत निळोबा संत बहिणाबाई, शिवूर, ता.वैजापूर, जिल्हा. औरंगाबाद भगवानबाबा
भाषा मराठी
साहित्यरचना तुकारामाची गाथा (पाच हजारांवर अभंग)[]
कार्य समाजसुधारक, कवी, विचारवंत, लोकशिक्षक
संबंधित तीर्थक्षेत्रे देहू
व्यवसाय वाणी
वडील बोल्होबा अंबिले
आई कनकाई बोल्होबा आंबिले
पत्नी आवली
अपत्ये महादेव, विठोबा, नारायण, भागूबाई
विठठ्ल्...

संत तुकाराम( तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदेव होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते.

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंग रूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य यांच्या शब्दकळेत पाझरते.त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे.संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या.

संत तुकारामाच्या अभंगाचा अनेकांनी अनेक अंगानी अभ्यास करून त्यांचे सौंदर्य उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

जीवन

तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार संभाव्य तारखा इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मध्ये एका सार्वजनिक समारंभात त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेला असे मानले जाते.

  त्यांचे घराणे मोरे क्षत्रिय आणि आडनाव अंबिले आहे. यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. त्यांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांच्यावरच होती.  पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) यांच्याशी त्यांचा विवाह झाला.

तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दु:खे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते..

तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली.

सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग लिहिण्याचे काम केले.
देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केला. मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले. पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितला म्हणून तुकारामाच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली.

फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. तुकाराम हे मराठीतील ख्यातनाम संत आहेत.

वंशावळी

  • विश्वंभर आणि आमाई अंबिले

यांना दोन मुले हरि व मुकुंद

  • यांतील एकाचा मुलगा विठ्ठल
  • दुसऱ्याची मुले -
  • पदाजी अंबिले
  • शंकर अंबिले
  • कान्हया अंबिले
  • संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान आणि वसतीस्थान, देहूगाव
    बोल्होबा आणि कनकाई अंबिले

यांना तीन मुले

  • सावजी (थोरला) तीर्थयात्रेला जाण्यासाठी घर सोडले.
  • तुकाराम व कान्होबा( धाकटा )

जीवनोत्तर प्रभाव

संत बहिणाबाई शिवुर ता.वैजापूर ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनी तिला स्वप्नात गुरूपदेश दिला होता. तुकाराममहाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते, असे म्हणतात. तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या ’वज्रसूची’ या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते.[ संदर्भ हवा ]

तुकारामांनी लिहिलेली पुस्तके

  • गीतगाथा (संपादक प्रभाकर जोगदंड) : संत ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम यांनीही भगवद्गीतेवर टीका केली आहे. तुकारामांच्या भगवद्गीतेवरील भाष्याचा "गीतगाथा" हा ग्रंथ आहे. पोथीच्या आकारातील हा ग्रंथ, भगवद्गीतेचे श्लोक, आणि त्या श्लोकांचा अर्थ सांगणारे जे अभंग तुकारामांनी लिहिले, त्याविषयी आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभाकर जोगदंड यांनी स्वत:च्या सुंदर हस्ताक्षरात या ग्रंथाचा शब्दन्‌ शब्द लिहिला आहे. तसेच पुस्तकाची मांडणीही त्यांनी स्वतःच केलेली आहे. हा ग्रंथ, एखादी हस्तलिखित पोथी हाताळत आहोत की काय असे वाटायला लावणारा आहे. गीतेचे ७०० श्लोक आणि तुकारामाचे ७०० अभंग लेखकाने टाकाने लिहिलेले आहेत.
  • तुकारामाच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र सरकारने आणि शिवाय अनेक प्रकाशकांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे. गाथेचे तेलुगू लिपीत लिप्यंतर (लेखक - कर्णे गजेंद्र भारती महाराज)
  • तुकाराम गाथा (संपादक नानामहाराज साखरे)
  • दैनंदिन तुकाराम गाथा (संपादक माधव कानिटकर)
  • श्री तुकाराम गाथा (संपादक स.के. नेऊरगावकर)

चित्रपट

  • इ.स.१९३६ मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णुपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी मराठीत 'संत तुकाराम' या नावाने चित्रपट बनवला. या चित्रपटाला अपूर्व यश प्राप्त झाले. १२ डिसेंबर १९३६ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमा येथे प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकाराम यांचे काम केले होते. ५व्या व्हेनिस चित्रपट उत्सवामध्ये या चित्रपटाला पुरस्कार मिळाला होता. भारतातील अनेक भाषांमध्ये संत तुकाराम यांच्यावर चित्रपट काढण्यात आले. हा चित्रपट एकाच चित्रपटगृहात वर्षभर चालू होता. हा त्या काळचा उच्चांक होता.
  • हा चित्रपट येण्याआधी तुकारामांवर तीन चित्रपट बनले होते. पहिला मूकपटांच्या जमान्यात कोहिनूर फिल्म कंपनीने निर्माण केलेला 'संत तुकाराम'. त्यानंतरचे दोन तुकाराम आले ते बोलपटांच्या जमान्यात १९३२ मध्येच. यांपैकी एक तुकाराम निर्माण केला होता 'शारदा फिल्म कंपनी'ने आणि दुसरा 'मास्टर अॅन्ड कंपनी'ने 'संत तुकाराम' अर्थात 'जय विठ्ठल' या नावाने. शुक्ल नावाच्या नटाने यात तुकारामांची भूमिका केली होती. यापलीकडे या चित्रपटाची काहीच माहिती उपलब्ध नाही. हा चित्रपट म्हणजे एका नाटकाचे चित्रण होते. शारदा फिल्म कंपनीचा 'तुकाराम' मात्र चित्रपट म्हणूनच तयार करण्यात आला होता. या 'तुकारामा'चीही काही माहिती आज उपलब्ध नाही.
  • १९६३ मध्ये संत तुकाराम नावाचा कानडी चित्रपट आला होता. दिग्दर्शक - सुंदराराव नाडकर्णी
  • १९६५ मध्ये तुकारामांवर हिंदी चित्रपट आला. त्याचे नाव होते 'संत तुकाराम'. राजेश नंदा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अशोक फिल्म्सने निर्माण केला होता. शाहू मोडकांनी यात तुकारामाची भूमिका केली होती. तर अनिता गुहा 'आवडी' बनल्या होत्या.
  • त्यानंतर १९७४ मध्ये 'महाभक्त तुकाराम' आला. हा मूळ तामिळ चित्रपट होता,आणि मराठीत डब करण्यात आला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीदेवी यात बालतारका म्हणून पडद्यावर दिसली होती.
  • यानंतर २००२ मध्ये आणखी एक तुकारामांवरचा चित्रपट आला. कृष्णकला फिल्म्सचा 'श्री जगत्गुरू तुकाराम'.
  • इ.स. २०१२सालचा 'तुकाराम' हा चित्रपट या सर्व संतपटांपेक्षा वेगळा आणि आधुनिक विचारसणी मांडलेला चित्रपट आहे. हा चित्रपट चंद्रकांत कुलकर्णींनी दिग्दर्शित केला होता.
  • तुकारामाच्या आयुष्यावर कलर्स मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर ‘तू माझा सांगाती’ नावाची मालिका ११-७-२०१४पासून सुरू आहे. २१ जून २०१८ रोजी तिचा १२४७वा एपिसोड झाला.
  • 'तुका आकाशा एवढा' हा मराठी चित्रपट ???? साली आला होता. दिग्दर्शक - जितेंद्र वाईकर

तुकारामाचे चरित्र, अभंग आणि त्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके

तुकारामांचे ’तुकारामबाबांचे चरित्र’ नावाचे मराठीतले पहिले चरित्र कृष्णाजी अर्जुन केळूसकर यांनी इ.स. १८९६ साली लिहिले. ’आध्यात्मिक ज्ञान रत्‍नावली’ नावाच्या मासिकात हे चरित्र क्रमश: प्रसिद्ध झाले होते. न्यायमूर्ती रानडे यांनी या चरित्राचे कौतुक केले होते. दक्षिणा प्राईज कमिटीने या पुस्तकाला पहिले बक्षीस दिले होते. चमत्कारांवर भर न देता संत तुकारामांचे थोरपण या पुस्तकात सांगितले आहे. २०१५ साली औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाने या पुस्तकाची ’संत तुकाराम’ या नावाची नवी आवृत्ती काढली आहे. अन्य पुस्तके -

  • आनंदओवरी (कादंबरी - लेखक दि.बा. मोकाशी)
  • आनंड डोह (२०१४). नाटक - लेखक  : योगेश्वर
  • आनंदाचे डोही आनंद तरंग (कादंबरी, लेखिका मृणालिनी जोशी)
  • ’A complete collection of the poems of Tukáráma, the Poet of Maharashtra (दोन खंड-इ.स.१८६९) मराठीतून इंग्रजीत भाषांतर करणारे : विष्णु परशुरामशास्त्री पंडित, शंकर पांडुरंग पंडित आणि जनार्दन सखाराम गाडगीळ
  • तुका झाला पांडुरंग (कादंबरी, भा.द. खेर)
  • तुका झालासे कळस (चित्रपट, १९६४) - दिग्दर्शक राजा नेने. या चित्रपटात तुकारामाची भूमिका कुमार दिघे यांनी केली होती.
  • तुका आकाशाएवढा : लेखक गो.नी. दांडेकर
  • तुकाराम गाथा (भालचंद्र नेमाडे)
  • तुका म्हणे : लेखक डॉ. सदानंद मोरे
  • तुका म्हणे भाग १, २ : लेखक डॉ. दिलीप धोंगडे
  • तुका म्हणे सोपी केली पायवाट (डॉ. अविनाश वाचासुंदर - तुकारामांच्या दैनंदिन उपयोगाच्या निवडक १५० अभंगांचे निरूपण)
  • तुका झाले कळस (डाॅ. व.दि. कुलकर्णी)
  • तुका झालासे कळस : लेखक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी
  • तुका झालासे कळस : लेखक स.कृ. जोशी
  • तुका झालासे कळस : लेखक डॉ. रामचंद्र देखणे
  • तुका झालासे कळस: लेखक अर्जुन जयराम परब
  • तुका झालासे विठ्ठल : (ढवळे प्रकाशन)
  • तुकाराम - अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे (म.सु. पाटील)
  • तुकाराम दर्शन (डॉ. सदानंद मोरे)
  • समग्र तुकाराम दर्शन (किशोर सानप)
  • तुकाराम (हिंदी बालनाट्य, लेखिका - धनश्री हेबळीकर, दिग्दर्शन अभिजित चौधरी, निर्मता युवराज शहा)
  • श्री तुकाराम महाराज चरित्र - (प्रा. र.रा. गोसावी, वीणा गोसावी)
  • तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे : लेखक डॉ. यादव अढाऊ
  • तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व : लेखक किशोर सानप आणि मनोज तायडे
  • तुकारामांचा शेतकरी : लेखक डॉ. आ.ह. साळुंखे
  • तुकारामांची अभंगवाणी : लेखक पंडित कृष्णकांत नाईक
  • तुकारामाचे निवडक १०० अभंग : लेखक डॉ. दिलीप चित्रे
  • तुकारामाचे निवडक १००० अभंग (व्हीनस प्रकाशन)
  • तुकारामाच्या अभंगांची चर्चा (खंड १, २) (वासुदेव पटवर्धन)
  • तुका, विठू आणि मी : लेखिका यशश्री भवाळकर
  • तुकोबा : लेखक शंकर पांडुरंग गुणाजी
  • तुकोबाचे वैकुंठगमन दिलीप चित्रे
  • धन्य तुकाराम समर्थ (एकपात्री), लेखक व सादरकर्ते नामदेव तळपे
  • निवडक तुकाराम (वामन देशपांडे)
  • ’The poems of Tukārāma’ : translated and re-arranged, with notes and an introduction. लेखक : जे. नेल्सन फ्रेझर आणि के. बी. मराठे.
  • पुन्हा तुकाराम : दिलीप चित्रे
  • प्रसादाची वाणी अर्थात तुका म्हणे (डॉ.सदानंद मोरे)
  • मुलांसाठी तुकाराम (वामन देशपांडे)
  • One Hundred Poems of Tukaram (चंद्रकांत म्हात्रे)
  • विद्रोही तुकाराम : लेखक आ.ह. साळुंखे
  • विद्रोही तुकाराम - समीक्षेची समीक्षा : लेखक आ.ह. साळुंखे
  • संत तुकाराम आणि रेव्ह. टिळक : एक भावानुबंध (लेखक : सुभाष पाटील):
  • श्री संत तुकाराम चरित्र (अनंत पैठणकर)
  • संत तुकाराम (चरित्र) (कृ.अ. केळूसकर, १८९५)
  • संत तुकाराम (बालवाङ्‌मय, रवींद्र भट)
  • संत तुकारामांचे अप्रकाशित अभंग (वा.सी. बेंद्रे)
  • संतसूर्य तुकाराम (कादंबरी लेखक : आनंद यादव)
  • साक्षात्कारी संत तुकाराम (शं.दा. पेंडसे)
  • 'Says Tuka (चार खंड): लेखक दिलीप चित्रे

चित्रकला-शिल्पकला व मुद्राचित्र

विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात हॉलंडमध्ये वास्तव्य असलेल्या चित्रकार, शिल्पकार व कवी भास्कर हांडे यांनी तुकारामाच्या गाथेतील अभंगावरून स्फुरलेल्या चित्रांची शिल्पांची व मुद्रा चित्रांची मालिका तयार केली आहे. तिला 'तुझे रूप माझे देणे' असे नाव दिले आहे. त्या चित्रांची कायमस्वरूपी मांडणी वैश्विक कला पर्यावरण औंध(पुणे) येथे केली आहे. लोकांसाठी हे कलादालन उघडे आहे. गाथेतील अभंगांवर चित्र काढण्याचा हा प्रयोग प्रथमच आहे.

बाह्य दुवे


संदर्भ

  1. ^ http://web.bookstruck.in/book/show?id=88. Missing or empty |title= (सहाय्य)



मराठी माहिती पोर्टल - https://marathiinfopedia.co.in/2018/05/26/sant-tukaram-maharaj/