"गौरीपूजन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ५०: | ओळ ५०: | ||
* गवराय आली गवराय आली

* गवराय आली गवराय आली

कोणत्या पावलानं ?

कोणत्या पावलानं ?

हळदी कुंकवाच्या |
हळदी कुंकवाच्या, हिऱ्या माणकाच्या |

*रुणुझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा

*रुणुझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा

आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा (चित्रपट - टिळा लाविते मी रक्ताचा) |
आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा (कवी - जगदीश खेबूडकर; संगीत - राम कदम; गायिका - उ़षा मंगेशकर; चित्रपट - टिळा लाविते मी रक्ताचा) |

** गौरीला घागरी फुंकण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे. त्यामुळेच या गाण्याची सुरुवातही 'घागर घुमू दे' अशा शब्दांनी होते. अनेक माहेरवाशिणी गौरीच्या सणाला आपल्या माहेरी जातात. अशीच एक माहेरवाशीण हे गाणे गाते आहे. ती म्हणते,'पाखरा माझ्या माहेरी जा. तिथे माझी गवराबाई आली असेल तिचे स्वागत कर.' |

* रुणझुणत्या पाखरा, तू जा माझ्या माहेरा (कवी - ग.दि. माडगुळकर, संगीत - सुधीर फडके; चित्रपट - जिवाचा सखा) |

==हेसुद्धा पहा== |
==हेसुद्धा पहा== |
१४:२७, ३ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
व्रताचे स्वरूप
गौरीपूजन हा महाराष्ट्रातील सण आहे.यास महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरी बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात.
आख्यायिका आणि इतिहास
हिंदू देवताशास्त्रात तसेच समाजजीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाई असे सांगितले आहे. लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे. त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे. गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे.ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे. एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली.त्याला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले.महालक्ष्मीच्या कृपा प्रसादाने आपापल्या सौभाग्य प्राप्त झाले,म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या.[१]
आशय व महत्व
महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती-जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो. मांग समाजात उभ्या लक्ष्मी मांडतात. शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरांतून मात्र स्त्रिया धान्याची राशी मांडून पूजा करतात. लक्ष्मी वा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा,भूमीच्या सुफलीकरणाचा आहे.[२]
गौरी नावाचे अर्थ
वा.शि. आपटे यांच्या संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार 'गौरी' म्हणजे आठ वर्षाची,अनाघ्रात अशी पवित्र कन्या. तसेच गौरी म्हणजे पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचे झाड, मल्लिका उर्फ जाईची वेल हेही अर्थ कोशात दिले आहेत..[३]
गौरींच्या मांडणीच्या विविध पद्धती
गौरी ही गोधासना(???) असावी. तिला चार हात, तीन डोळे असावेत आणि ती आभूषणांनी युक्त असावी, असे म्हटले आहे. स्थळपरत्वे गौरींच्या पूजेंची पद्धत आणि परंपरा बदलल्या आहेत. कोणाकडे गौरींचे मुखवटे असतात, तर काही ठिकाणी परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच, सात किंवा अकरा खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरांत धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ ,ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटच्या कोथळ्या मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेऊन त्यावर मुखवटा ठेवतात. किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणतात. ही मुळे म्हणजेच गौरींची पावले, असा समज आहे. आधुनिक काळात गौरीपूजनाच्या व मांडणीच्या पद्धतीत व गौरीच्या रूपातही आधुनिकता दिसून येते. विविध रूपांत अनेक घरांत गौरी/महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या गौरी/महालक्ष्मी किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात.कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजतात, कोणी मातीची बनवितात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. [४]
गौरी आवाहन (दिवस पहिला)
आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना, जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात. घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. त्यावेळी ताट चमच्याने वाजवत आवाज केला जातो. यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखविण्याची प्रथा आहे. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करतात.काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवितात.
गौरीपूजन (दिवस दुसरा)
दुसर्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची/महालक्ष्मीची पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा (रव्याचा लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू) नैवेद्य दाखवतात. नंतर संध्याकाळी शास्त्रानुसार मोठी पूजा, व आरती करतात. त्या दिवशी पूजेला शेवंतीच्या फुलांचे खूप महत्त्व आहे. शेवंतीच्या फुलांचा हार गौरीच्या गळ्यात घालतात. पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ वगैरे पदार्थांचा नैवेद्यात समावेश असतो. नैवेद्यात शेगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात. दिवेफळ ठेवतात त्यात तुपातील वाती लावतात. संध्याकाळी बायकांचा हळदीकुंकुवाचा कार्यक्रम ठेवलेला असतो. त्या निमित्ताने सर्वांच्या घरातील महालक्ष्मींचे दर्शन होते. अशा प्रकारे ह्या दिवशीची पूजा पार पाडली जाते. ह्या दिवशी गौरींच्या/महालक्ष्मींच्या चेहर्यांवर एक वेगळाच आनंद पाहायला मिळतो, असे बायकांना वाटते. जरी ते मुखवटे मातीचे,शाडूचे किंवा पितळेचे असले तरी त्यांच्या चेहर्यांवरील आनंद, त्यांच्या डोळ्यांत दिसणारी चमक काही औरच असते अशी श्रध्दा आहे.
विसर्जन (दिवस तिसरा)
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे/महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पाच(?) सवाष्णींना किंवा घरच्याच लोकांना जमवून पोवत्याच्या/सुताच्या गाठी पाडतात, त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची/ महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. या तिसऱ्या दिवशी गौरींच्या/ महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते. कारण या माहेरवाशिणी या दिवशी आपल्या माहेरून सासरी जात असतात असे मानले जाते. गौरींना निरोप देण्याची वेळ जसजशी जवळ येते तशी घरातील मंडळींची हुरहूर वाढत जाते.रात्री पंचांग वेळ पाहून गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते. (धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत.) गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवर टाकतात. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडुपांचे कीटकांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे.[५]
दोरकाची पूजा
या तिसऱ्या दिवशी महाराष्टातील ग्रामीण बहुजनसमाजात गौरींच्या पूजेबरोबरच सुताच्या गुंड्याला सोळा गाठी देऊन त्याचीही पूजा करतात. तो गुंडा मग हळदीने रंगवून त्यातला दोरा घरातल्या सुवासिनी आपल्या गळ्याभोवती बांधतात व नवीन पीक येईपर्यंत गळ्यात ठेवतात.आश्विन वद्य अष्टमीला तो गळ्यातून काढून त्याची पूजा करतात. या दोऱ्यालाच महालक्ष्मी समजतात.[६]
प्रांतानुसार
दक्षिणी भारतात भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीचा सण सुरु होतो व तो बरेच दिवस चालतो. प्रत्येक गावात गौरीची एक पिठाची प्रतिमा करतात व तिला मखरात बसवून पूजतात. तिची रस्त्यातून मिरवणूकही काढतात.[७]
लोकसाहित्यातील उल्लेख
लोकसाहित्यात गौरीपूजन प्रसंगी म्हटली जाणारी गीते आहेत -
आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको
बाळाला सांगते, धरला हात सोडू नको.
मला आहे हौस, चांदीच्या ताटाची
लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखरभाताची. -- भूमी आणि स्त्री (शैला लोहिया, गोदावरी प्रकाशन)
लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
मालकाच्या घरी लक्ष्मी आली -- भूमी आणि स्त्री (शैला लोहिया, गोदावरी प्रकाशन)
ललित साहित्यातील आणि दृक्श्राव्यमाध्यमातील उल्लेख
- गवराय आली गवराय आली
कोणत्या पावलानं ?
हळदी कुंकवाच्या, हिऱ्या माणकाच्या
- रुणुझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा
आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा (कवी - जगदीश खेबूडकर; संगीत - राम कदम; गायिका - उ़षा मंगेशकर; चित्रपट - टिळा लाविते मी रक्ताचा)
- गौरीला घागरी फुंकण्याचीही पद्धत काही ठिकाणी आहे. त्यामुळेच या गाण्याची सुरुवातही 'घागर घुमू दे' अशा शब्दांनी होते. अनेक माहेरवाशिणी गौरीच्या सणाला आपल्या माहेरी जातात. अशीच एक माहेरवाशीण हे गाणे गाते आहे. ती म्हणते,'पाखरा माझ्या माहेरी जा. तिथे माझी गवराबाई आली असेल तिचे स्वागत कर.'
- रुणझुणत्या पाखरा, तू जा माझ्या माहेरा (कवी - ग.दि. माडगुळकर, संगीत - सुधीर फडके; चित्रपट - जिवाचा सखा)
हेसुद्धा पहा
- करवा चौथ
- केदार गौरी व्रत -तामीळनाडू
- चैत्र गौरी
- जयपार्वती व्रत - आषाढ महिन्यातील गुजराथेतील व्रत
- नवरात्र
- मगळा गौरी
- ज्येष्ठागौरीची कहाणी (विकिस्रोत बंधुप्रकल्पात)
- लज्जा गौरी
- ललिता गौरी
- सौभाग्य गौरी व्रत - आंध्रप्रदेश
- स्वर्णगौरी व्रत - शुक्ल तृतीया भाद्रपद (गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस - कर्नाटक)
- हरितालिका व्रत (महाराष्ट्र)