चर्चा:गौरीपूजन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेख ज्येष्ठा गौरी नावाने स्थानांतरणाची आवश्यकता[संपादन]

गूगलवर मराठी हिंदी आणि इंग्रजीत शोध घेतला असता भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात किमान ९ प्रकारचे म्हणजे ९ वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या नावाने गौरी व्रत पूजन केले जाते. यातील प्रत्येक प्रकारच्या गौरी पूजनाच्या संदर्भाने एक एक पूर्ण लेख होऊ शकेल इतका मजकुर उपलब्ध होऊ शकेल असे दिसते. सध्याचा लेख मुख्यत्वे ज्येष्ठा गौरींबद्दल असून तो ज्येष्ठा गौरी नावावर स्थानांतरीत करावा.

गौरी लेखाचे पुर्ननिर्देशन गौरीपूजनकडे करून गौरीपूजन लेखात भारतभरातील सर्व प्रकारच्या गौरी पूजनांची एकत्रित माहिती देता येईल. गणपती बद्दल जसा विकिपीडियावर अभ्यासपूर्ण संदर्भासहीत लेखन झाले आहे तसे गौरींबद्दल करण्याची संधी असू शकेल असे वाटते. गौरी (निःसंदिग्धीकरण) पान वेगळे ठेवता येईल.

गौरीपूजनांच्या सर्व प्रकारांशिवाय भारतभरात मातृपूजनाचेही अनेक उत्सव आहेत ज्यात वेगवेगळ्या देवींचे नवरात्र घटस्थापना इत्यादी प्रकार येतात त्या सर्वांचा एकत्रित मातृपूजन नावाने लेख असावा असे सूचवावेसे वाटते.

विवीध गौरी:
  • करवा चौथ
  • जयपार्वती व्रत - आषाढ महिन्यातील गूजराथेतील व्रत
  • स्वर्णगौरी व्रत - शुक्ल तृतीया भाद्रपद (गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस - कर्नाटक
  • चैत्र गौरी
  • सौभाग्य गौरी व्रत - आंध्रप्रदेश
  • मंगळा गौरी
  • केदार गौरी व्रत -तामीळनाडू
  • ललिता गौरी
  • लज्जा गौरी

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२८, २६ सप्टेंबर २०१४ (IST)[reply]