"मोरेश्वर रामचंद्र पराडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ २: | ओळ २: | ||
== प्रसिद्ध काव्ये == |
== प्रसिद्ध काव्ये == |
||
* [[आर्याकेकावलि]] |
* [[आर्याकेकावलि]] |
||
* [[आर्याभारत]] |
* [[आर्याभारत]] |
||
ओळ १४: | ओळ १३: | ||
* [[भीष्मभक्तिभाग्य]] |
* [[भीष्मभक्तिभाग्य]] |
||
* [[मंत्ररामायण]] |
* [[मंत्ररामायण]] |
||
* [[संशयरत्नावली]] |
|||
* [[संशयरत्नावली]] |
|||
* [[साररामायण]] |
* [[साररामायण]] |
||
* [[सीतागीत]] |
* [[सीतागीत]] |
||
⚫ | मोरोपंत प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या आर्याभारतामुळे. त्यामुळेच त्यांना आर्याभारती असे म्हटले जाते. समग्र महाभारत त्यांनी [[आर्यावृत्तात]] रचून एक चमत्कार केला. त्यांनी विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी १०८ रामायणे लिहिली. 'झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु या सम हा’ आणि 'बालिश बहु बायकांत बडबडला' ह्या त्यांच्या काव्यांतल्या ओळी आजही सुयोग्य उक्ती म्हणून सुपरिचित आहेत आणि वेळप्रसंगी वापरल्या जातात.. |
||
==मोरोपंतांच्या नावाच्या संस्था== |
|||
* कवी मोरोपंत पतसंस्था, बारामती |
|||
* मोरोपंत गृहरचना सोसायटी, बारामती |
|||
* मोरोपंत नाट्यगृह, बारामती |
|||
* बारामती नगरपरिषदेचे मोरोपंत सार्वजनिक वाचनालय |
|||
* बारामतीमधील कर्हा नदीच्या काठावरील मोरोपंतांच्या जुन्या वाड्याचे स्मारकात रूपांतर (बांधकाम अंतिम टप्प्यात) |
|||
* मोरोपंतांच्या स्मारक समितीतर्फे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला बारामतीच्या(?) सिद्धेश्वर मंदिरात व्याख्यानमाला आणि पतसंस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण होते. |
|||
⚫ | मोरोपंत प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या आर्याभारतामुळे. त्यामुळेच त्यांना आर्याभारती असे म्हटले जाते. समग्र महाभारत त्यांनी [[आर्यावृत्तात]] रचून एक चमत्कार केला. त्यांनी विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी १०८ रामायणे लिहिली. 'झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु या सम हा’ आणि 'बालिश बहु बायकांत बडबडला' ह्या त्यांच्या काव्यांतल्या ओळी आजही सुयोग्य उक्ती म्हणून सुपरिचित आहेत आणि वेळप्रसंगी वापरल्या जातात.. |
||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
२२:३०, २ जानेवारी २०१५ ची आवृत्ती
मोरोपंत पूर्ण नाव: मोरेश्वर रामचंद्र पराडकर. जन्म इ.स. १७२९. मध्ययुगीन मराठी पंडिती काव्यपरंपरेतील श्रेष्ठ कवी. पन्हाळगड इथे पराडकर कुळात मोरोपंतांचा जन्म झाला. पराडकर कुटुंब हे मूळचे कोकण येथील सौंदळ गावचे. मोरोपंताचे पणजे रामजीपंत हे नौकरीच्या निमित्ताने कोकणातून पन्हाळगडावर येऊन राहिले. रामजीपंताचे नातू रामचंद्रपंत हे मोरोपंताचे वडील. ते कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पदरी नोकरीस होते. मोरोपंताचे बालपण तिथेच गेले. तेथेच त्यांचा विद्याभ्यासही झाला. पन्हाळगडावरील केशव पाध्ये व गणेश पाध्ये या दोन वेदशास्त्रपारंगत विद्वान बंधूंकडे मोरोपंतांनी न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदान्त व साहित्य यांचे अध्ययन केले. वयाच्या २४व्या वर्षांपर्यंत मोरोपंताचे पन्हाळगडावर वास्तव्य होते. मोरोपंताचे वडील इ.स. १७५२ च्या सुमारास पन्हाळगडावरुन बारामतीस गेले. पुढे मोरोपंतही वडिलांना भेटण्यासाठी म्हणून बारामतीस गेले व कायमचे बारामतीकर होऊन गेले. पन्हाळगडावरील वास्तव्यात थोडीफार काव्यनिर्मिती सोडल्यास मोरोपंताचे सर्व लेखन बारामतीस झाले. सुमारे ४५ वर्ष अखंडितपणे काव्यरचना करणाऱ्या मोरोपंतानी ७५ हजाराच्या वर कविता लिहिल्या. त्यांच्या नावावर २६८ काव्यकृतींची नोंद आहे.
प्रसिद्ध काव्ये
- आर्याकेकावलि
- आर्याभारत
- आर्यामुक्तमाला
- कुशलवोपाख्यान
- कृष्णविजय
- नाममाहात्म्य
- नारदाभ्युगम
- परमेश्वरस्तोत्र
- प्रल्हादविजय
- भीष्मभक्तिभाग्य
- मंत्ररामायण
- संशयरत्नावली
- साररामायण
- सीतागीत
मोरोपंत प्रसिद्ध आहेत, ते त्यांच्या आर्याभारतामुळे. त्यामुळेच त्यांना आर्याभारती असे म्हटले जाते. समग्र महाभारत त्यांनी आर्यावृत्तात रचून एक चमत्कार केला. त्यांनी विविध शब्द-अक्षर-चमत्कृत पद्धतींनी १०८ रामायणे लिहिली. 'झाले बहू, होतील बहू, आहेतही बहू, परंतु या सम हा’ आणि 'बालिश बहु बायकांत बडबडला' ह्या त्यांच्या काव्यांतल्या ओळी आजही सुयोग्य उक्ती म्हणून सुपरिचित आहेत आणि वेळप्रसंगी वापरल्या जातात..
मोरोपंतांच्या नावाच्या संस्था
- कवी मोरोपंत पतसंस्था, बारामती
- मोरोपंत गृहरचना सोसायटी, बारामती
- मोरोपंत नाट्यगृह, बारामती
- बारामती नगरपरिषदेचे मोरोपंत सार्वजनिक वाचनालय
- बारामतीमधील कर्हा नदीच्या काठावरील मोरोपंतांच्या जुन्या वाड्याचे स्मारकात रूपांतर (बांधकाम अंतिम टप्प्यात)
- मोरोपंतांच्या स्मारक समितीतर्फे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला बारामतीच्या(?) सिद्धेश्वर मंदिरात व्याख्यानमाला आणि पतसंस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण होते.
बाह्य दुवे