रथसप्तमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रथ सप्तमी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो.[१][२]

सूर्य मंदिर कोणार्क

महत्व[संपादन]

हिंदू धर्मीयांच्या मते रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे.[३] त्यादिवशी सात घोडे आणि सारथी अरुण यांसह सूर्याचे पूजन केले जाते.सूर्याच्या सोन्याची प्रतिमा रथात ठेवली जाते. तुळशी वृंदावनाच्या समोर रथ आणि सूर्य यांची रांगोळी काढली जाते. या दिवशी अंगणात मातीच्या एका छोट्या बोळक्यात दूध ठेवून ते उकळवून आटवतात. या दिवशी सूर्याला खिरीचा नैवेद्य दाखविला जातो.[४]या दिवसाचे व्रत म्हणून महत्व असल्याने या दिवशी उपवासही केला जातो.[५] [६] महाराष्ट्रात मकरसंक्रातीला सुरू झालेले स्त्रियांचे तिळगुळाचे व हळदीकुंकू समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात.

भारताच्या विविध प्रांतात[संपादन]

 • दक्षिण भारत- वसंत ऋतूच्या आगमनाचा हा सण दक्षिण भारतातही उत्साहाने साजरा केला जातो.संस्कृतीच्या दृष्टीनेही या दिवसाचे विशेष महत्व आहे.[७] या दिवशी सूर्यपूजन केले जाते.[८]

बिहार,झारखंड, ओडिसा अशा भारतातील विविध प्रांतात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो.[९]

अन्य महत्व[संपादन]

याच दिवशी नर्मदा जयंती असते.यानिमित्ताने अमरकंटक येथे मोठी यात्रा भरते.[१०]

संदर्भ[संपादन]

 1. ^ CHARRAN, SWAMI RAM. SURYA NARAYAN PUJA HANDBOOK (en मजकूर). Lulu.com. आय.एस.बी.एन. 9781257834938. 
 2. ^ Upādhyāya, Kāśīnātha (1968). Dharmasindhuḥ (hi मजकूर). Caukhambā Saṃskṛta Series Office. 
 3. ^ Marāṭhī viśvakośa (mr मजकूर). Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973. 
 4. ^ Bhāratīya sãskrṭikośa: Sampādaka Mahādevaśāstrī Jośī. Sahasampādaka Padmajā Hodạ̄rakara,[Prathamāvrṭti] (mr मजकूर). Bhāratīya S̃āskr̥tikośa Maṇḍaḷa. 1962. 
 5. ^ Śarmā, Hanūmāna (1969). Vrata-paricaya (hi मजकूर). Gitapresa. 
 6. ^ Pāṇḍeya, Lālatā Prasāda (1971). Sun-Worship in Ancient India (en मजकूर). Motilal Banarasidass. 
 7. ^ Journal of Indian History (en मजकूर). University of Kerala. 1962. 
 8. ^ Guides, Rough (2017-10-05). The Rough Guide to South India and Kerala (en मजकूर). Rough Guides UK. आय.एस.बी.एन. 9780241332894. 
 9. ^ "ratha saptami in india - Google Search". www.google.co.in. 2019-01-19 रोजी पाहिले. 
 10. ^ Gajrani, S. (2004). History, Religion and Culture of India (en मजकूर). Gyan Publishing House. आय.एस.बी.एन. 9788182050648. 


बाह्यदुवे[संपादन]

रथसप्तमी


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.