नर्मदा जयंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नर्मदा जयंती ही हिंदू पंचांगाप्रमाणे माघ महिन्यातल्या शुक्ल सप्तमीला असते.

ओंकारेश्वर येथील नर्मदा नदी

नदीविषयी आख्यायिका[संपादन]

नर्मदा नदीवरील घाट

एकदा पृथ्वीवर दुष्काळ पडला आणि सर्व देव आणि माणसे त्रासून गेली. माणसांनी देवाना त्यांना या दुष्काळापासून वाचविण्याची विनंती केली.ब्रह्मदेव आणि विष्णू असे करण्यास असमर्थ ठरल्याने नंतर सर्वांनी भगवान शंकराला साकडे घातले. त्यानंतर शंकराच्या कपाळावर असलेले घामाचा थेंब हा जमिनीवर पडला आणि त्यातून एका नदीची निर्मिती झाली. ती एका सुंदर स्त्रीच्या रूपाने प्रकट झाल्याने तिच्यावर मोहित होवून तिच्यामागे देव धावू लागले परंतु शंकराने तिला 'नर्मदा' असे नाव दिले.[१] भारतीय संस्कृती आणि धर्मात नर्मदा नदीला विशेष मान्यता आहे.[२]

अमरकंटक येथील नर्मदा मंदिर

नदीचे माहात्म्य[संपादन]

नर्मदा नदी ही शंकराच्या घामाच्या थेंबापासूनन उत्पन्न झाली आहे आणि देवांच्या हातून घडलेली पापे धुऊन काढण्यासाठी या नदीचे महत्त्व पौराणिक साहित्यात वर्णन केलेले आढळते.नर्मदा नदीच्या केवळ दर्शनानेच आपल्या हातून घडलेली सर्व पापे धुऊन जातात. या श्रद्धेमुळे अनेक भाविक नर्मदा नदीत स्नान करतात.[३] मार्कंडेय ऋषी,अगस्त्य ऋषी यांच्यासारख्या तपस्वी व्यक्तींनी नर्मदेच्या किनारी साधना आणि तपाचरण केले आहे असे मानले जाते.[४]

  • नर्मदा परिक्रमा- भारतीय धर्म आणि संस्कृतीत नर्मदा परिक्रमा या संकल्पनेला आध्यात्मिक महत्त्व आहे.नर्मदा नदी आपल्या उजव्या हाताला ठेवून तिला संपूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. ओंकारेश्वर येथे ही यात्रा सुरू होते. त्यासाठी संकल्प केला जातो आणि यात्रा सुरू होते. यात्रेची सांगता करताना कुमारीपूजन केले जाते, कारण नर्मदा ही कुमारी स्वरूप मानली गेली आहे.

स्वरूप[संपादन]

नर्मदा नदीचा प्रकट दिवस हा तिची जयंती म्हणून साजरा केला जातो. अमरकंटक या नर्मदा नदीच्या उगमस्थानी आणि मध्य प्रदेशातील अनेक अन्य ठिकाणी साजरी होते. होशंगाबाद येथील घाटांवर दिवसभर हा उत्सव साजरा होतो. नदीच्या घाटांवर अनेक भाविक दिवे लावतात आणि नदीच्या पात्रात सोडतात. यानिमित्ताने नर्मदेचे मंदिर सजविले जाते.[२] साधू आणि संत या दिवशी नर्मदेच्या विविध घाटांवर यज्ञयाग करतात आणि सेवा करतात, पूजा करतात.

महाराष्ट्र[संपादन]

महाराष्ट्रातही ’नर्मदाप्रेम” संस्थेसारख्या काही संस्था हा दिवस व्याख्यानांनी साजरा करतात. याच दिवशी रथ सप्तमी असते.

हे ही पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Gajrani, S. (2004). History, Religion and Culture of India (इंग्रजी भाषेत). Gyan Publishing House. ISBN 9788182050648.
  2. ^ a b Bal, Hartosh Singh (2013-10-19). Water Close Over Us: A Journey along the Narmada (इंग्रजी भाषेत). HarperCollins Publishers India. ISBN 9789350297063.
  3. ^ मेहता, मनिष. "Narmada Jayanti 2019- शंकर की पुत्री नर्मदा करती है कल्याण". २०.११.२०१९ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "Significance of Narmada Jayanti". Apni Sanskriti. Archived from the original on 2020-09-26. २०. ११. २०१९ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)