मनमाड−सिकंदराबाद रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मनमाड−सिकंदराबाद रेल्वेमार्ग
प्रदेश महाराष्ट्रतेलंगणा
मालक भारतीय रेल्वे
चालक दक्षिण मध्य रेल्वे, मध्य रेल्वे
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी ६२१ किमी (३८६ मैल)
ट्रॅकची संख्या १/२
गेज १६७६ मिमी ब्रॉड गेज
विद्युतीकरण नाही
कमाल वेग १०० किमी/तास
मार्ग नकाशा
Ajantha Express Route map.jpg

मनमाड−सिकंदराबाद रेल्वेमार्ग हा भारतामधील एक रेल्वेमार्ग आहे. मनमाडला हैदराबाद शहरासोबत जोडणारा हा ६२१ किमी लांबीचा मार्ग महाराष्ट्रतेलंगणा ह्या राज्यांमधून धावतो. मराठवाडा भागातून जाणारा हा मार्ग छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड ह्या शहरांना उर्वरित महाराष्ट्रासोबत जोडतो. आजच्या घडीला ह्या मार्गावर केवळ एकच ट्रॅक असून त्याचे विद्युतीकरण झालेले नाही.

अजिंठा एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस व इतर अनेक गाड्या ह्या मार्गावरून धावतात.