Jump to content

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(काझीरंगा अभयारण्य या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?काझीरंगा राष्ट्रीय उद्यान
কাজিy

ঙা ৰাষ্ট্ৰীয় উদ্যান
आसाम • भारत

—  राष्ट्रीय उद्यान  —
काझीरंगा अभयारण्य
काझीरंगा अभयारण्य
काझीरंगा अभयारण्य
Map

२६° ४०′ ००″ N, ९३° २१′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
४३० चौ. किमी
• ८० मी
हवामान
वर्षाव
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा

• २,२२० मिमी (८७ इंच)

• ३७ °C (९९ °F)
• ५ °C (४१ °F)
जवळचे शहर गोलाघाट
स्थापना १९७४
पर्यटक ५,२२८[१] (२००५-०६)
संचालक भारत सरकार, आसाम सरकार
संकेतस्थळ: काझीरंगा अभयारण्य
 1. ^ "गोलाघाट जिल्हा माहिती". |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |url= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य)

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (असमीया: কাজিৰঙা ৰাষ্ট্ৰীয় উদ্যান, (Kazirônga Rastriyô Uddan), उच्चार /kaziɹɔŋga ɹastɹijɔ udːan/ ) हे भारतातील आसाम राज्यातील गोलाघाटनागांव जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान आहे. याचा समावेश जागतिक वारसा स्थानांत केलेला असून, जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी दोन-तृतीयांश गेंडे या अभयारण्यात सापडतात.[१] काझीरंगामध्ये अनेक वाघ असून २००६ मध्ये त्याला वाघांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. या जंगलात अनेक हत्ती, पाणम्हशी तसेच हरणे आढळतात. काझीरंगा अभयारण्यामध्ये अनेक दुर्मिळ पक्षी आढळतात. काझीरंगा हे भारतातील सर्वात जास्त सुरक्षित अभयारण्य मानले जाते.

काझीरंगामध्ये चार प्रमुख नद्या आहेत. यापैकी मुख्य म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी होय. तसेच अनेक छोटे-मोठे पाण्याचे तलावसुद्धा आढळतात. काझीरंगाला १९०५ मध्ये संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळाला होता.

नावाची व्युत्पत्ती

[संपादन]

काझीरंगा नावाच्या व्युत्पत्तीबद्दल अनेक आख्यायिका आहेत. एका आख्यायिकेप्रमाणे, रंगा नावाची एक मुलगी, जवळच्या कार्बी ॲंगलॉंग जिल्ह्यातील काझी नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली. पण त्यांच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. म्हणून ते दोघे कायमसाठी जंगलात पळून गेले. त्यांच्या नावांवरूनच या भागाला काझीरंगा असे नाव पडले.[२] दुसऱ्या आख्यायिकेप्रमाणे १६ व्या शतकातील वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांनी एका निपुत्रिक दांपत्यावर (काझी व रंगा) कृपा केली व त्यांना त्या भागात एक मोठे तळे तयार करण्यास सांगितले. काझीरंगा नावाचे उल्लेख इतिहासात अनेक ठिकाणी आढळतात. १७ व्या शतकातील ॲहम राजा प्रतापसिंह जेव्हा या भागातून जात होता, तेव्हा त्याने खाल्लेले मासे हे काझीरंगातून आणल्याचे त्याला सांगण्यात आले होते.[३]

तरीही, काही स्थानिक लोकांच्या मते काझीरंगा हे नाव कार्बी भाषेतील काझीर-ए-रंग या शब्दातून तयार झाले. याचा अर्थ 'काझीरांचे गाव' असा आहे. कार्बी लोकांमध्ये 'काझीर' हे मुलीचे नाव मोठ्या प्रमाणात वापरले जाते,[४] व असे म्हणतात की पूर्वी "काझीर" नावाच्या एका स्त्रीने या भागावर राज्य केले. या भागात सापडणाऱ्या काही अवशेषांमुळे या तर्काला पुष्टी मिळते.

काझीरंगाचा अजून एक अर्थ लाल बकऱ्यांचे (हरणांचे) क्षेत्र असाही होऊ शकतो. कारण कार्बी भाषेमध्ये "काझी"चा अर्थ "बकरी" तर "रंगाई"चा अर्थ "लाल" असा आहे.[३]

इतिहास

[संपादन]
जिला गेंड्यांचे संरक्षण सुरू करण्याचे श्रेय दिले जाते ती मेरी व्हिक्टोरिया लॅटर, लॉर्ड कर्झन (व्हाईसरॉय) यांची पत्नी

१९०४ साली तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या पत्नीने (मेरी व्हिक्टोरिया लॅटर) या भागाला भेट दिली.[५] जेव्हा तिला एकही गेंडा दिसला नाही तेव्हा तिने आपल्या पतीकडे गेंड्यांचे संरक्षण करण्याची मागणी केली.[६] जून ११ १९०५ रोजी सुमारे २३२ वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असणारा भाग प्रस्तावित संरक्षित वनक्षेत्र म्हणून राखून ठेवण्यात आला.[७] त्यानंतरच्या तीन वर्षात ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरील सुमारे १५२ वर्ग कि.मी. भाग या क्षेत्राला जोडण्यात आला.[८] इ.स. १९०८ मध्ये काझीरंगाला संरक्षित वनक्षेत्राचा दर्जा मिळाला. इ.स. १९१६मध्ये याचे रूपांतर काझीरंगा संरक्षित शिकार (Game Reserve) वनक्षेत्रामध्ये करण्यात आले व शेवटी इ.स. १९३८मध्ये या जंगलात शिकारींवर बंदी घालण्यात आली.[८]

इ.स. १९५०साली पी.डी. स्ट्रसी यांनी या जंगलाचे नाव बदलून काझीरंगा अभयारण्य असे ठेवले.[८] इ.स. १९५४मध्ये तत्कालीन आसाम राज्य सरकारने एक कायदा केला. या कायद्यान्वये गेंड्यांची शिकार करणाऱ्याला मोठा दंड ठोठावण्याची शिक्षा मुक्रर केली गेली. [८] त्यानंतर १४ वर्षांनी (म्हणजेच इ.स. १९६८ साली) राज्य सरकारने आसाम राष्ट्रीय उद्यान कायदा - १९६८ संमत केला. त्यानुसार काझीरंगा अभयारण्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला.[८] फेब्रुवारी ११ इ.स. १९७४मध्ये सरकारने या ४३० चौरस कि.मी.च्या जंगलाला राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिकृत मान्यता दिली. युनेस्कोने १९८५ साली या उद्यानाचा जागतिक वारसा स्थान यादीत समावेश केला.[९]

अलीकडील काळामध्ये काझीरंगावर अनेक नैसर्गिक तसेच मानवनिर्मित संकटे आली. ब्रह्मपुत्रा नदीला येणाऱ्या पुरांमुळे येथील प्राणिजगतावर बरेच परिणाम झाले.[१०] जंगलपट्ट्यातील मानवी आक्रमणांमुळे प्राण्यांच्या नैसर्गिक वसतिस्थळांना धोका पोचत आहे.[११] आसाममधील उल्फा अतिरेक्यांनी जरी आसामच्या आर्थिक स्थितीवर परिणाम केलेला असला,[१२] तरीही काझीरंगावर या कारवाईचा काहीही परिणाम झालेला नाही. उलट अतिरेक्यांनी शिकाऱ्यांच्या हत्या केल्याच्या नोंदी १९८० सालापासून आढळू लागल्या आहेत. [६]

या उद्यानाने आपला शताब्दी महोत्सव २००५ साली साजरा केला. यामध्ये लॉर्ड कर्झनच्या वंशजांना सुद्धा आमंत्रण देण्यात आले होते.[६] २००७ सालाच्या सुरुवातीला दोन गेंडे व एक हत्ती यांचे मानस राष्ट्रीय उद्यानात पुनर्वसन करण्यात आले. हा भारतातील पहिलाच हत्तींच्या पुनर्वसनाचा प्रयत्न होता.[१३]

भूगोल

[संपादन]

काझीरंगा हे अभयारण्य २६°३०' व २६°४५' उ. अक्षांश आणि ९३°०८' ते ९३°३६' पू. रेखांशांदरम्यान येते. हे जंगल भारतातील आसाम राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये - नागांव जिल्हागोलाघाट जिल्हा - पसरलेले आहे.[९]

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा नकाशा

त्याची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे ४० कि.मी. असून, उत्तर-दक्षिण रुंदी १३ कि.मी. आहे.[१४] काझीरंगा आता फक्त ३७८ चौरस कि.मी. क्षेत्रावर पसरलेले आहे, कारण जवळ जवळ ५१.१४ चौरस कि.मी. क्षेत्रफळाची धूप झालेली आहे.[१४] एक वाढीव ४२९ चौरस कि.मी.चे क्षेत्रफळसुद्धा राखीव ठेवण्यात आलेले आहे. हे क्षेत्रफळ सध्याच्या सीमेच्या सभोवती पसरले आहे. त्यामुळे प्राण्यांसाठी जास्तीचे वसतिस्थान मिळाले आहे. तसेच कर्बी ऑंगलॉंग डोंगरांमध्ये जाण्यासाठी सुरक्षित रस्ता मिळाला आहे. [१५] याची उंची ४० मी. पासून ८० मी. पर्यंत आहे.[९] ह्या उद्यानाला ब्रह्मपुत्रा नदीने विळखा घातलेला आहे व याची उत्तरेची तसेच पूर्वेची सीमा म्हणजे ही नदी आहे. या उद्यानाच्या दक्षिणेला मोरा दिफ्लु ही नदी आहे. या उद्यानात आणखी दोन नद्या वाहतात - दिफ्लु नदीमोरा धनसिरी नदी.[११] :पान ५

काझीरंगाची जमीन ही मुख्यत: धूप होऊन तयार झालेली आहे. तसेच इथे ब्रह्मपुत्रा नदीने टाकलेला गाळसुद्धा आढळतो.[९] हे जंगल अनेक छोट्या-मोठ्या तलावांनी भरलेले आहे. एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे ५% जागा या तलावांनी व्यापलेली आढळते.[९] जास्त उंचीच्या क्षेत्रांना स्थानिक भाषेत चपोरी असे म्हणतात व पूर आल्यास प्राण्यांना या चपोरीवर आश्रय मिळतो. भारतीय लष्कराच्या साहाय्याने अशा अनेक चपोरी बनविलेल्या आहेत.[१६][१७]

हवामान

[संपादन]

या उद्यानात मुख्य तीन ऋतू आढळतात - उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान असतो. हिवाळा जास्त करून शुष्क असतो व हिवाळ्यात येथील सरासरी कमाल तापमान २५° सेल्शियस तर सरासरी किमान तापमान ५° सेल्शियस इतके असते.[९] हिवाळ्यामध्ये इथले तलाव व नाले सुकून जातात.[११]:पान ६ मार्च ते मे महिन्यात येणारा उन्हाळा हा गरम, व सरासरी कमाल तापमान ३७° से इतके असणारा असतो.[९] उन्हाळ्यामध्ये प्राणी मुख्यकरून पाणवठ्यांवर आढळतात.[११]:पान ६ पावसाळा जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये असतो. काझीरंगाच्या जंगलात होणाऱ्या वार्षिक सरासरी २२२० मि.मी. पावसापैकी जास्तीतजास्त पाऊस हा पावसाळ्यातच होतो.[९] जुलै व ऑगस्ट महिन्यांमध्ये काझीरंगा उद्यानाचा तीन चतुर्थांश इतका भाग ब्रह्मपुत्रेच्या पाण्याखाली जातो. या पुरामुळे प्राणी जवळच्या मिकिर पर्वतरांगेचा आश्रय घेतात.[९] तरीही काही दिवस पाऊस न झाल्यास प्राण्यांना अन्नाची कमतरता जाणवते.[१८]

वनस्पती

[संपादन]
काझीरंगातील गवताळ प्रदेश व जंगले

काझीरंगा उद्यानात मुख्यत: चार प्रकारचे वनस्पती विभाग आढळतात.[१९] पाण्याने भरलेला गवताळ प्रदेश, सवाना जंगले, विषववृत्तीय पानगळीची जंगले व वृत्तीय अर्ध सदाहरित जंगले. लॅंडसॅट उपग्रहाने दिलेल्या माहितीनुसार १९८६ साली या जंगलाचा ४१% भाग हा उंच गवताने, ११% भाग हा छोट्या गवताने, २९% भाग उघड्या जंगलाने, ४% भाग दलदलीने, ८% भाग नद्या व अन्य पाण्याने, व उरलेला ६% भाग हा वाळूने व्यापलेला होता.[२०]

काझीरंगा हे उतारावर वसलेले जंगल आहे. या जंगलाचा पश्चिमेचा भाग हा पूर्व भागापेक्षा कमी उंचीवर आहे. पश्चिमेचा भाग हा गवताळ प्रदेशांनी व्यापलेला आहे. उंच गवत हे जास्त उंचीवरच्या भागात आढळते तर छोटे गवत हे कमी उंचीच्या भागावर तलावांच्या काठाने आढळते.[९] वार्षिक पूर, शाकाहारी प्राण्यांचे चरणे व थोड्या प्रमाणावर लावण्यात येणाऱ्या आगी, यांच्यामुळे हा भाग व्यवस्थित जतन झालेला आहे. उंच गवतांमध्ये मुख्यत्वे ऊसबांबू आढळतात. तर इतर झाडांमध्ये कुंभी तसेच कापसाची झाडे आढळतात. गवताळ प्रदेशामध्ये सफरचंदाची झाडे आढळतात.[९]


प्राणीजगत

[संपादन]
भारतीय एकशिंगी गेंडा
पाणम्हैस - एक मादी आपल्या वासरा समवेत

काझीरंगा उद्यानात ३५ विविध प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात.[२१] यापैकी सुमारे १५ प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.[९] ह्या उद्यानात जगात असणाऱ्या एकशिंगी गेंड्यांच्या एकूण संख्येपैकी सर्वात जास्त संख्या (१,८५५),[२२][९] तसेच पाणम्हशी (१,६६६)[२३]बाराशिंगा (४६८) आढळते.[२४] तसेच शाकाहारी प्राण्यापैकी हत्ती (१,९४०),[२५] रानगवे (३०) आणि सांबर (५८) आहेत. छोट्या प्राण्यांमध्ये भेकर, रानडुक्करहॉग हरणेसुद्धा आढळतात.[२६][९]

काझीरंगा हे वाघांचे एक मुख्य आश्रयस्थान आहे. काझीरंगा उद्यानाला इ.स. २००६ साली व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. या उद्यानात जगातील सर्वात जास्त वाघांची घनता आढळते (प्रत्येक ५ किलोमीटरमध्ये एक वाघ). २००० च्या गणनेनुसार या जंगलात ८६ वाघ आहेत.[२२] वाघांखेरीज इथे रानमांजर, बिबटेपाणमांजरी सुद्धा आढळतात.[२१] इतर छोट्या प्राण्यांमध्ये मुंगूस, कोल्हा, तरस, अस्वल, इ. प्राणी सुद्धा इथे दिसतात.[९][२१][२७] भारतात आढळणाऱ्या माकडांच्या १४ जातींपैकी ९ जाती या उद्यानात आहेत. [६] यांमध्ये आसामी माकड, सोनेरी वानर व भारतात आढळणारे एकमेव एप माकड यांचा समावेश होतो.[२७][२१][९] काझीरंगाच्या नद्यांमध्ये दुर्मिळ असे डॉल्फिन सुद्धा आहेत.[९]

काझीरंगातील भारतीय रोलर पक्षी

काझीरंगाला आंतरराष्ट्रीय पक्षीजगत संस्थेकडून एक महत्त्वाच्या पक्षी अभयारण्याचा दर्जा मिळालेला आहे.[२८] काझीरंगामध्ये अनेक प्रकारचे स्थलांतर करणारे पक्षी, पाणपक्षी, शिकारी पक्षी, इ. आढळतात. हिवाळ्यामध्ये मध्य आशियातून विविध प्रकारची बदके, बगळे, करकोचे, इ. पक्षी स्थलांतर करून येतात.[२९] नदीकाठच्या पक्ष्यांमध्ये खंड्या, पेलिकन, सारंग, इ. पक्षी आहेत. [२९]:पान १० शिकारी पक्ष्यांमध्ये दुर्मिळ असे इंपिरियल घार, ठिपक्यांची घार, पांढऱ्या शेपटीची घार, पल्लास मत्स्य घार, करड्या डोक्याची घार, व केस्ट्रेल घार हे पक्षी आढळतात.[२९] :पान.०३-०४

काझीरंगामध्ये एकेकाळी सात प्रकारची गिधाडे आढळत. पण त्यापैकी बऱ्याच जाती आता नष्ट झालेल्या दिसतात. यामागचे मुख्य कारण म्हणजे मेलेल्या प्राण्यांच्या शरीरात आढळणारे डायक्लोफेनाक नावाचे औषध हे होय.[३०] आता फक्त भारतीय गिधाड, पातळ चोचीचे गिधाडभारतीय पांढऱ्या रंगाचे गिधाड याच प्रजाती आढळतात.[३०]


हेसुद्धा पाहा: काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील सस्तन प्राण्यांची यादी, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील सरपटणाऱ्या प्राण्यांची यादी, काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील माशांची यादी, आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील पक्ष्यांची यादी


प्रबंधन

[संपादन]
उद्यानातील एक माहिती-फलक

बोकाखाट येथील आसाम सरकारच्या जंगल विभागातील वन्यप्राणी विभाग या उद्यानाची व्यवस्था पाहतो. [११]:पान ५ या उद्यानाचा मुख्य एक डायरेक्टर असतो व मुख्याधिकारी हा एक विभागीय जंगल अधिकारी असतो. याच्या हाताखाली दोन उप-कॉन्झर्व्हेटर दर्जाचे अधिकारी असतात. उद्यानाचे चार विभाग केलेले आहेत. त्यांच्यांवर चार विभाग अधिकारी लक्ष ठेवून असतात.[११]:पान ११ बुरापहार, बागुरी, मध्य व पूर्व असे ते चार विभाग आहेत. यांची मुख्य कार्यालये क्रमश: गोराकाटी, बागुरी, कोहोरा व अगोराटोली इथे आहेत. प्रत्येक विभाग हा छोट्या छोट्या ठाण्यांमध्ये विभागलेला आहे. त्यांचा मुख्य अधिकारी एक फॉरेस्टर व त्याच्या हाताखालील फॉरेस्ट गार्ड असतात.[११]:पान ११

या उद्यानाला राज्य तसेच केंद्र सरकार कडून अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या हत्ती प्रकल्पातून सुद्धा या उद्यानाला अर्थसाहाय्य होते. १९९७-१९९८ मध्ये या उद्यानाला जागतिक वारसा फंडातून १,००,००० अमेरिकन डॉलरची मदत मिळाली होती.[१७]:पान २ तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गैर-सरकारी संस्थाकडून सुद्धा या उद्यानाला वेळोवेळी मदत मिळत आलेली आहे.

जैविक सुरक्षा

[संपादन]
काझीरंगातील गेंडे व हत्तींच्या मोजणीचे निकाल

काझीरंगा उद्यानाला भारतीय कायद्यांद्वारे जैविक सुरक्षेसाठी सर्वात जास्त संरक्षण दिलेले आहे. या उद्यानातील वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे करण्यात आले. त्यापैकी आसाम जंगल सुरक्षा कायदा १८९१जैवविविधता सुरक्षा कायदा २००२ हे याच उद्यनासाठी अस्तित्वात आले आहेत.[१७]:पान १ येथील अधिकाऱ्यांसमोर शिंगांसाठी होणाऱ्या एकशिंगी गेंड्यांच्या हत्त्यांचे मोठे आव्हान आहे. या उद्यानात १९८० पासून ते २००५ सालापर्यंत सुमारे ५६७ गेंड्यांची शिकार झाली.[११]:पान १० मात्र गेल्या काही वर्षांत या संख्येत मोठी घट झालेली आढळते. २००७ मध्ये या उद्यानात १७ गेंड्यांची शिकार झाली.[३१] विविध अभ्यासांनुसार अल कायदाशी संलग्न असणाऱ्या बांग्लादेशातील दहशतवादी गटांना मिळणारे पैसे व गेंड्यांच्या शिकारी यांचा परस्पर संबंध आढळून आलेला आहे.[३२][३३] काझीरंगा उद्यानात तयार करण्यात आलेली शिकारी-विरोधी ठाणी, गस्तीमध्ये वाढ तसेच जंगलाच्या आजूबाजूला हत्यारे बाळगण्यावर घालण्यात आलेली बंदी यांच्यामुळे शिकारींची संख्या लक्षणीयरीत्या घटलेली आहे.[३४][३५]

काझीरंगा उद्यानातील गवतास मुद्दाम लावण्यात आलेली आग

वारंवार येणारे पूर व होणारा जास्त पाऊस यामुळे बऱ्याच वन्य जीवांचे अस्तित्व धोक्यात येते. तसेच वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेकरिता केल्या जाणाऱ्या उपायांमध्येही यामुळे अडथळे निर्माण होतात.[१५] पाण्यापासून वाचण्यासाठी वन्य प्राणी उद्यानाच्या बाहेर असणाऱ्या उंच जागांचा आश्रय घेतात. तिथे ते चोरट्या शिकारींमुळे, वाहनांखाली सापडून किंवा स्थानिक लोकांकडून मारले जातात.[८] अशा प्रकारे वन्य प्राण्यांना मृत्यूपासून वाचण्यासाठी काझीरंगातील अधिकाऱ्यांनी अनेक वेगवेगळे उपाय योजले आहेत. यांमध्ये गस्त वाढविणे, तसेच कृत्रिम आश्रयाच्या उंच जागा तयार करणे, इत्यादींचा समावेश होतो.[८] तसेच वन्य प्राण्यांना सुरक्षितरीत्या राष्ट्रीय महामार्ग ३७ ओलांडता यावा (हा उद्यानाच्या दक्षिणेकडून जातो), म्हणून अनेक जागा तयार करण्यात आलेल्या आहेत.[३६] वेगवेगळे आजार पसरण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक पातळीवरील पाळीव प्राण्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येते.[८]

तसेच वणव्यांपासून वाचण्यासाठी काही भागातील गवतही थोड्या थोड्या अवधीने जाळण्यात येते.

पर्यटक

[संपादन]
काझीरंगामधील आसाम सरकार द्वारा संचालित बोनोश्री टुरिस्ट लॉज

पर्यटक मुख्यत: येथील प्राणी पहाण्यासाठी उद्यानाला भेट देतात. हत्ती किंवा जीपमधून केलेल्या जंगल सफारी इथे उपलब्ध आहेत. या उद्यानात पायी चालण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. सोहोला, मिहिमुख, कठपारा, फॉलियामारी व हरमोटी इथे निरीक्षण-मनोरे उभारण्यात आलेले आहेत. काझीरंगातील बागोरी रांगेमध्ये एक माहिती केंद्र सुद्धा उभारण्यात येत आहे. हे प्रवाशांना या उद्यानाबद्दल अधिक माहिती देईल.[३७] हे उद्यान मध्य एप्रिल पासून मध्य ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद असते. याचे मुख्य कारण म्हणजे इथे होणारा पाऊस. आसाम सरकार द्वारा या उद्यानात तीन विश्रामगृहे तसेच कोहोरा येथे चार विश्रामगृहे चालविली जातात. खाजगी विश्रामगृहे उद्यानाच्या बाहेर उपलब्ध आहेत.[१५]:पान १९ पर्यटकांच्या संख्येत झालेली वाढ येथील आर्थिक विकासाला कारणीभूत ठरलेली आहे.[३]:पान १६-१७ इथे येणाऱ्या पर्यटकांच्या पाहणीमध्ये असे आढळून आलेले आहे की ८०% पर्यटकांना गेंड्याचे दर्शन आनंददायी वाटलेले आहे. इथे येणारे परदेशी पर्यटक हे या उद्यानाला आर्थिक मदत देण्यास उत्सुक आहेत.[३८]

काझीरंगाला जाण्याचे मार्ग

[संपादन]

सरकारच्या जंगल खात्याचे अधिकृत वाटाडे सर्व पर्यटकांना उद्यानात फिरताना सतत सोबत करतात. माहूत असणारे हत्ती तसेच जीप व इतर चार-चाकी वाहने आधी नोंदणी केल्यास मिळू शकतात.[३९] कोहोरा येथील उद्यानाच्या प्रशासकीय कार्यालयापासून सुरू होणारी जंगल सफारी, तीन वेगवेगळ्या मार्गांनी पूर्ण होऊ शकते. यामध्ये कोहोरा, बागोरी व अगाराटोली असे तीन विभाग आहेत.[३९] हे मार्ग हलक्या वाहनांसाठी नोव्हेंबर पासून मध्य मे पर्यंत पर्यटकांसाठी उघडे असतात. पर्यटकांना स्वतःची वाहने घेऊनसुद्धा जाता येते पण फक्त अधिकृत वाटाड्या सोबत घ्यायला लागतो.[३९]

आसाम राज्य परिवहन मंडळाच्या तसेच खाजगी बस ज्या गुवाहाटी, तेझपूर व आसामच्या इतर उत्तरी भागांमधून सुटतात, काझीरंगाच्या मुख्य द्वारापाशी (कोहोरा) सोडतात.[३९] या उद्यानाच्या सर्वात जवळचे शहर हे बोकाखाट (२३ कि.मी.) आहे. इतर मुख्य शहरांमध्ये गुवाहाटी (२१७ कि.मी.) व जोरहाट (९७ कि.मी.) यांचा समावेश होतो. सर्वात जवळचे रेल्वे-स्थानक फुर्काटिंग आहे जे सुमारे ७५ कि.मी. वर आहे.[३९] रौरिया इथले जोरहाट विमानतळ (९७ कि.मी.), सालोनबारी इथले तेजपूर विमानतळ (१०० कि.मी.) व गुवाहाटी मधील लोकप्रिया गोपीनाथ बोर्डोलोई आंतर्राष्ट्रीय विमानतळ (२१७ कि.मी.) ही जवळची विमानतळे आहेत.[३९]

संस्कृती

[संपादन]

काझीरंगाचा उल्लेख अनेक पुस्तके, चित्रपट व गाण्यांमधून आढळतो. काझीरंगाचा पहिला उल्लेख १९६१ साली बर्लिन दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या रॉबिन बॅनर्जी यांच्या काझीरंगा या माहितीपटात आढळतो.[४०][४१][४२] अमेरिकेचा लेखक, एल. स्प्रेग डि कॅम्प ने त्याच्या काझीरंगा, आसाम कवितेमध्ये या उद्यानाचा उल्लेख केलेला आहे. ही कविता प्रथम १९७० साली डेमॉन्स अँड डायनोसोर्स मध्ये प्रसिद्ध झाली व नंतर काझीरंगा या नावाने २००५ मध्ये पुनःप्रकाशित झाली.[४३]

काझीरंगा ट्रेल (चिल्ड्रन्स बुक ट्रस्ट), १९७९), नावाच्या एका लहान मुलांसाठीच्या अरूप दत्ता यांनी लिहिलेल्या गोष्टीच्या पुस्तकाला शंकर पुरस्कार मिळालेला आहे.[४४] आसामी गायक भूपेन हजारिका यांनी त्यांच्या एका गाण्यामध्ये काझीरंगाचा उल्लेख केलेला आढळतो.[२४] बीबीसीचे पर्यटन लेखक मार्क शॅन्ड यांनी काझीरंगातील पहिल्या महिला माहूत पार्वती बारुआ यांच्यावर एक पुस्तक व माहितीपट (क्वीन ऑफ द एलिफंट्स) लिहिलेले आहेत. या पुस्तकाला १९९६चा थॉमस कुक ट्रॅव्हल बुक पुरस्कारप्री लिटरेअर डि’अमिस पुरस्कार मिळालेले आहेत. यामुळे काझीरंगा तसेच येथील माहूतांना जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळालेली आहे[४५]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
 1. ^ भौमिक, सुबीर (१७ एप्रिल २००७). "आसाम ऱ्हाइनो पोचिंग 'स्पायरल्स'". बीबीसी न्यूझ. २८/०४/२००८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 2. ^ "काझीरंगा राष्ट्रीय उद्यान - मिथ आणि मिस्टरीज". 2008-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३/०२/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ a b c माथुर, व्ही.बी. "युनेस्को EoH प्रकल्प_दक्षिण आशिया तांत्रिक अहवाल क्र. -७ -काझीरंगा राष्ट्रीय उद्यान" (PDF). pp. पाने. १५-१६. 2008-05-30 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २८/०२/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 4. ^ "आसामातील कार्बी". १९/०५/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 5. ^ "काझीरंगा राष्ट्रीय उद्यान शताब्दी महोत्सव संकेतस्थळ". 2008-02-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३/०२/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 6. ^ a b c d भौमिक, सुबीर (१८/०२/२००५). "काझीरंगाचा शताब्दी महोत्सव". २५/०२/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 7. ^ तालुकदार, सुशांत (०१/०५/२००५). "Waiting for Curzon's kin to celebrate Kaziranga". 2009-11-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४/०२/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 8. ^ a b c d e f g h "काझीरंगा राष्ट्रीय उद्यान - हिस्टरी ॲंन्ड कॉन्झर्व्हेशन". 2007-09-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३/०२/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 9. ^ a b c d e f g h i j k l m n o p q "UN Kaziranga Factsheet". 2008-07-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३/०२/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 10. ^ काझीरंगा फॅक्टशीट (रिवाइज्ड) Archived 2008-07-18 at the Wayback Machine., युनेस्को, २७/०२/२००७ ला पाहिले.
 11. ^ a b c d e f g h :पाने २०-२१ माथुर, व्ही.बी. "युनेस्को EoH प्रकल्प_दक्षिण आशिया तांत्रिक अहवाल-काझीरंगा राष्ट्रीय उद्यान" (PDF). 2008-05-30 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २८/०२/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)*वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती ऑक्टोबर ८, २००७ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
 12. ^ डेका, अरूप कुमार. "उल्फा व आसामातील शांतिकार्ये" (PDF). pp. पाने १-२. १२/०५/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 13. ^ भट्टाचार्यजी, गायत्री (२०/०३/२००७). "मानस राष्ट्रीय उद्यानात प्राण्यांचे पुनर्वसन". ११/०४/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 14. ^ a b लहान, पी; सोनोवाल, आर. (मार्च १९७२), "काझीरंगा वाईल्डलाईफ सॅंक्च्युअरी, आसाम. अ ब्रीफ डिस्क्रिप्शन ॲन्ड रिपोर्ट ऑन द सेन्सस ऑफ लार्ज ॲनिमल्स", जर्नल ऑफ द BNHS, ७० (२): २४५–२७७
 15. ^ a b c :पान ६ (२००३). "सेक्शन II: पीरिऑडिक रिपोर्ट ऑन द स्टेट ऑफ कॉन्झर्व्हेशन ऑफ काझीरंगा नॅशनल पार्क, इंडिया" (पीडीएफ). युनेस्को. २८/०२/२००७ रोजी मिळवले.
 16. ^ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. वाइल्डफोटोटूर्सइंडिया (आर्चिव्ह.ऑर्ग कडून). २७/०२/२००७ ला बघितले.
 17. ^ a b c :पान ३ "स्टेट ऑफ कॉन्झव्हेशन ऑफ द वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टीज इन द एशिया-पॅसिफिक रीजन - काझीरंगा नॅशनल पार्क" (PDF). ०९/०५/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 18. ^ ए‍एफपी इंग्लिश मल्टीमीडिया वायर (२९ ऑगस्ट २००६). "रेअर ऱ्हायनोज इन इंडिया फेस फूड प्रॉब्लेम". २५/०४/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
 19. ^ तालुकदार, बी. (१९९५). स्टेटस ऑफ स्वॅम्प डिअर इन काझीरंगा नॅशनल पार्क. डिपार्टमेंट ऑफ झूलॉजी, गुवाहाटी युनिवर्सिटी, आसाम.
 20. ^ खुशवाहा, एस. व उन्नी, एम. (१९८६). ॲप्लिकेशन्स ऑफ रिमोट सेन्सिंग टेक्निक्स इन फॉरेस्ट कव्हर मॉनिटरिंग ॲन्ड हॅबिटॅट इव्हॅल्युएशन - अ केस स्टडी ॲट काझीरंगा नॅशनल पार्क, आसाम, इन, कामत, डी. ॲन्ड पवार, एच. (एड्स), वाईल्डलाईफ हॅबिटॅट इव्हॅल्युएशन यूजिंग रिमोट सेन्सिंग टेक्निक्स. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग / वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, देहराडून. पाने २३८-२४७
 21. ^ a b c d "काझीरंगा नॅशनल पार्क - मॅमल्स चेकलिस्ट". 2008-05-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३/०२/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 22. ^ a b हुसेन, सय्यद झाकीर (१०/०८/२००६). "काझीरंगा ॲड्ज अनादर फेदर - डिक्लेर्ड टायगर रिझर्व". 2007-04-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २६/०२/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 23. ^ 'वाईल्ड बफेलो सेन्सस इन काझीरंगा', द ऱ्हायनो फाउंडेशन फॉर नेचर इन नाॅर्थईस्ट इंडिया, न्यूझलेटर नं. ३, जून २००१
 24. ^ a b रशीद, पर्बिना (२८/०८/२००५). "हियर कॉन्झर्व्हेशन इज अ वे ऑफ लाईफ". २६/०८/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 25. ^ एलेफंट सर्व्हे इन इंडिया (पीडीएफ), मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरन्मेन्ट ॲन्ड फॉरेस्ट्‌स, भारत सरकार, २००५, pp. पान १, २६/०२/२००७ रोजी पाहिले |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 26. ^ "काझीरंगा नॅशनल पार्क - ॲनिमल सर्व्हे". 2007-09-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३/०२/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 27. ^ a b काझीरंगा Archived 2010-01-31 at the Wayback Machine., कोलकाता बड्‌सबर्डस, बघितले ०८/०४/२००७ला.
 28. ^ "काझीरंगा राष्ट्रीय उद्यान - एवीफौना यादी". 2008-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४/०२/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 29. ^ a b c :पान.०७-१० बरूआ, एम.; शर्मा, पी. (१९९९), "बर्डस ऑफ काझीरंगा नॅशनल पार्क, ईंडिया" (पीडीएफ), फोर्कटेल, ओरिएन्टल बर्ड क्लब, १५: ४७-६०, २६/०२/२००७ रोजी पाहिले |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 30. ^ a b आर. कुथबर्ट, आर.ई. ग्रीन, एस. रानडे, एस. सर्वानन, डीजे पेन, व्ही प्रकाश, ए‍ए कन्निंगहॅम (२००६) "रॅपिड पॉप्युलेशन डिक्लाईन्स ऑफ इजिप्तियन व्हल्चर ॲन्ड रेड-हेडेड व्हल्चर इन इंडिया", ॲनिमल कॉन्झर्व्हेशन ९ (३), ३४९–३५४. [१] बघितले ०९/०३/ २००७ ला
 31. ^ "ॲनदर ऱ्हाईनो किल्ड इन काझीरंगा". ०६/०२/२००८. ०६/०२/२००८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 32. ^ "पोचर्स किल इंडियन ऱ्हाइनो". १७/०४/२००७. १७/०४/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 33. ^ रॉय, अमित (०६/०५/२००६). "पोचिंग फॉर बिन लादेन, इन काझीरंगा". ०६/०५/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 34. ^ "काझीरंगा राष्ट्रीय उद्यान - हीरोज ऑफ काझीरंगा". 2008-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३/०२/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 35. ^ "टू पोचर्स किल्ड इन काझीरंगा - टाईट सिक्युरिटी मेझर्स, बेटर नेटवर्क यील्ड रिझल्ट्स ॲट पार्क". २५ एप्रिल २००७. २५/०४/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 36. ^ बोनाल, बी.एस व चौधरी, एस (२००४), इव्हॅल्युएशन ऑफ बॅरिअर इफेक्ट ऑफ नॅशनल हायवे ३७ ऑन द वाईल्डलाईफ ऑफ काझीरंगा नॅशनल पार्क ॲन्ड सजेस्टेड स्ट्रॅटेजीज ॲन्ड प्लॅनिंग फॉर प्रोव्हायडिंग पॅसेज: अ फिजिबीलिटी रिपोर्ट टू द मिनिस्ट्री ऑफ एनव्हायरनमेंट ॲंड फॉरेस्टस, भारत सरकार.
 37. ^ "सफारी माहिती". ३१/०३/२००७. १०/०४/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 38. ^ श्रीवास्तव, राहुल; हेनेन, जोएल (२००३), अ पायलट सर्व्हे ऑफ नेचर-बेस्ड टुरिजम ॲट काझीरंगा नॅशनल पार्क ॲन्ड वर्ल्ड हेरिटेज साईट, इंडिया, "अमेरिकन म्युझियम ऑफ नॅशनल हिस्टरी: स्प्रिंग सिम्पोझियम". ३०/१२/२००५ रोजी मूळ पान पासून संग्रहित. |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) templatestyles stripmarker in |publisher= at position 1480 (सहाय्य); External link in |publisher= (सहाय्य)
 39. ^ a b c d e f "काझीरंगा राष्ट्रीय उद्यान". 2007-07-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २३/०७/२००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 40. ^ पर्सनॅलिटिज ऑफ गोलाघाट डिस्ट्रिक्ट. बघितले २२ मार्च २००७ ला.
 41. ^ रॉबिन बॅनर्जी. बघितले २२ मार्च २००७ ला.
 42. ^ लव्हर ऑफ द वाईल्ड, अंकल रॉबिन नो मोअर[मृत दुवा]. द सेंटिनेल (गुवाहाटी) ०६/०८/२००३ बघितले २२ मार्च २००७ ला.
 43. ^ इयर्स इन द मेकिंग: द टाईम-ट्रॅव्हल स्टोरीज ऑफ एल. स्प्रेग डि कॅम्प Archived 2008-05-11 at the Wayback Machine.. नेस्फा.ऑर्ग. बघितले २६ फेब्रुवारी २००७ ला.
 44. ^ खोरोना, मीना. (१९९१). द इंडियन सबकॉन्टिनेन्ट इन लिटरेचर फॉर चिल्ड्रेन ॲन्ड यंग ॲडल्ट्स. ग्रीनवुड प्रेस
 45. ^ बोर्डोलोई, अनुपम (२००५-०३-१५). "वाईल्ड ॲट हार्ट". २००७-०२-२७ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

अधिक माहिती

[संपादन]
 • बर्ठाकुर, रणजीत; सहगल, बिट्टू (२००५), द काझीरंगा इनहेरिटन्स, मुंबई: सॅंक्चुअरी एशिया
 • चौधरी, अन्वरुद्दीन. द बर्ड्‌स ऑफ आसाम. गुवाहाटी.
 • चौधरी, अन्वरुद्दीन. बर्ड्‌स ऑफ काझीरंगा नॅशनल पार्क: अ चेकलिस्ट. गुवाहाटी.
 • चौधरी, अन्वरुद्दीन. काझीरंगा वाईल्ड लाईफ इन आसाम. इंडिया.
 • दत्ता, अरूप कुमार. युनिकॉर्निस: द ग्रेट इंडियन वन हॉर्न्ड ऱ्हाइनोसॉरस. न्यू दिल्ली.

बाह्य दुवे

[संपादन]