गेंडा
गेंडा एओसीन - अलीकडील | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() काळा गेंडा
| ||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||
|
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
गेंडा अथवा इंग्रेजीत राईनोसिरोसेस हा प्राणी शाकाहारी भूचर आहे. हा प्राणी गवताळ प्रांतात आढळतो. गेंडा भारत, नेपाळ व दक्षिण-पूर्व आशियाई देशात आढळतो. या प्राण्याची दुसरी जात म्हणजे आफ्रिकन गेंडा. नावावरून कळते कि हि जात आफ्रिका खंडा मध्ये आढळते. आशियात या प्राण्याचा तीन मुख्य जाती आहेत जावन गेंडा, जो इंडोनेशियाच्या जावा बेटावर आणि वेतनाम देशात आढळतो, दुसरा म्हणजे सुमात्रीयान गेंडा, जो इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढळतो, आणि तिसरी जात म्हणजे भारतीय गेंडा किवा एक शिंगी गेंडा, जो भारत आणि नेपाळ मध्ये आढळतो. जावन गेंडा हि जात एकेकाळी उत्तर-पूर्व भारतापर्यत आढळत असे. पण आज ते नष्ट झाले आहेत.
भारतात काझीरंगा येथे मोठ्या प्रमाणात भारतीय गेंडे मिळतात. एक शिंगी गेड्यासाठी काझीरंगा जगभर प्रसिद्ध आहे. जगातील २/३ भारतीय गेंडे काझीरंगा येथे आढळतात. एक शिंगी गेंडे अथवा भारतीय गेंडे भारतात आसाम, पश्चिम बंगाल व उत्तर प्रदेश मध्ये आढळतात, तर काही प्रमाणात नेपाळ मध्ये पण आढळतात. आफ्रिकन गेन्ड्यामध्ये दोन प्रकार आहेत, पंधरा गेंडा आणि काळा गेंडा.