नागरहोळे राष्ट्रीय उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागरहोळे राष्ट्रीय उद्यान (कन्नड:ನಾಗರಹೊಳೆ ರಾಷ್ಟೀಯ ಉದ್ಯಾನವನ) हे कर्नाटक राज्यातील मैसूर शहरापासून ९४ किमी(५८ मैल) अंतरावर असलेले भारतीय राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान मैसूर आणि कोडागू जिल्ह्यांत पसरलेले असून बांदीपूर राष्ट्रीय उद्यानाच्या वायव्येस आहे. काबिनी सरोवर हे या दोन उद्यानांच्या मध्ये आहे.

या उद्यानाचे पुनर्नामकरण राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले आहे. दाट झाडी, नद्या व धबधबे असलेले हे जंगलवजा उद्यान मैसूरच्या संस्थानिकांच्या शिकारीसाठी राखून ठेवलेले होते.