पेलिकन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेलिकन (Pelecanidae) हे पेलिकन नावाच्या एका पाणपक्ष्यांचे पक्षिकुळ आहे. या पक्षाला मराठीत झोळीवाला म्हणतात. पेलिकन कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व पिशवीसारखा गळा असतो. बहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात त्यांची चोच, गळा पिशवी व चेहेर्‍यावरील उघडी कातडी गडद रंगाची होते. झोळीवाल्यांच्या आठ प्रजाती आहेत.

झोळीवाले समुद्रकिनारी किंवा तळ्यांमध्ये आढळून येतात. यांचे प्रमुख खाद्य मासे असून ते किनार्‍यालगत मासे पकडतात. हे राजबिंडे पक्षी कळपाने राहतात, मासेमारी पण गटाने करतात व घरटी समुदायाने बांधतात.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.