Jump to content

बाराशिंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाराशिंगा

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: आर्टिओडाक्टायला
(विभाजीत खुरांचे)

कुळ: सर्विडी,(सारंग हरीण)
जातकुळी: सेर्वस
जीव: से.डुव्हुसेली
शास्त्रीय नाव
सेर्वुस डुव्हुसेली
जी कुव्हियर, १८२३
''सेर्वुस डुव्हुसेली''
इतर नावे

बाराशिंगा
Swamp Deer

बाराशिंगा हे भारत नेपाळ , बांगलादेश येथे आढळणारे हरीण आहे. याची वर्गवारी हरीणांच्या सारंग कुळात होते. या हरीणाची शिंगे हे याचे वैशिठ्य आहे. १२ किंवा त्याहीपेक्षा जास्ती टोके शिंगाना असतात म्हणून यांना मराठी व हिंदीमध्ये बाराशिंगा असे म्हणतात. आसाम मध्ये याला डोलहरीण असे म्हणतात डोल या शब्दाचा अर्थ दलदल असा आहे.

याचा वावर मुख्यत्वे मध्यभारतातील कान्हा अभयारण्यात आहे. एक वेळ अशी होती कि हे हरीण जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर होते कान्हा अभयारण्यात १९७० मध्ये केवळ ६६ हरीणांची नोंद झाली होती. परंतु वन्य जीव कायद्याने याच्या शिकारीवर बंदी आणली व कान्हामध्ये याच्या संवर्धनावर विशेष प्रयत्न झाले आज त्याचा परीणाम म्हणून १००० पेक्षाही जास्त बाराशिंगा कान्हामध्ये आहेत. महाराष्ट्रात बरीच पुर्वी विदर्भाच्या जंगलामध्ये आढळत परंतु आता नाहित.

कान्हा अभयारण्यातील बाराशिंगा हरीणांचा कळप

याची दुसरी उपजात आसाम, नेपाल, बांगलादेशनैरुत्य भारतात आढळते. सुंदरबनकाझीरंगामध्ये प्रामुख्याने दलदलीच्याच प्रदेशात आढळते. याच्या दलदलीच्या प्रदेशात रहात असल्याने इंग्लिशमध्ये स्वाम्प डियर (Swamp Deer) म्हणतात. परंतु मध्य भारतातील जात ही घनदाट जंगलात आढळते.

बाराशिंगा हे तसे मोठे हरीण आहे. याची खांद्यापर्यंत उंची सव्वा ते दीड मीटर पर्यंत भरते व मोठ्या नराचे वजन दीडशे किलो पेक्षाही जास्त भरू शकते. याचा शिंगाचा आकर्षक डोलारा ७५ सेमी पर्यंत असतो. वीणीचा हंगाम सप्टेंबर ते एप्रिल पर्यंत असतो. मादी एका वेळेस बहुतेक हरीणांप्रमाणे एकच पिल्लाला जन्म देते. नर व माद्या हे कळप करून रहातात. त्यांचा कळप ८ ते २० जणांचा असतो. एकटे नर तसे कमी असतात.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Cat Specialist Group (2002). Neofelis nebulosa. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. 11 May 2006ला बघितले. Database entry includes justification for why this जीव is vulnerable