डेझर्ट राष्ट्रीय उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मरु(वाळवंट) राष्ट्रीय उद्यान या पानावरून पुनर्निर्देशित)

मरू राष्ट्रीय उद्यान हे भारतातील राजस्थान राज्यातील राष्ट्रीय उद्यान आहे व जैसलमेर या वाळवंटातील पर्यटन शहरापासून पश्चिमेकडे आहे. या उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ ३,१६२ कि.मी. इतके असून आकाराने सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यानात याची गणना होते. नेहेमीच्या राष्ट्रीय उद्यानात आढळणारी हिरवी वनराई येथे अजिबात नाही उलट उद्यानाचा मोठा भूभाग वाळूच्या टेकड्यांनी व्यापला आहे. या उद्यानात वनराई नसली तरी हे वाळवंटी पर्यावरणाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अनेकविध प्रकारचे पक्षी उदा. दुर्मिळ माळढोक येथे आढळतो. विविध प्रकारचे गरूड, घारी, गिधाडे येथे आढळतात. वाळवंटात आढळणारे खास प्रकारचे सरपटणारे प्राणी येथील वैशिष्ट्य आहे. सस्तन प्राण्यांमध्ये वाळवंटी खोकड आढळते. नोव्हेंबर ते जानेवारी हा उद्यानाला भेट देण्यास उत्तम काल् आहे.