Jump to content

केरसुणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झाडू या पानावरून पुनर्निर्देशित)
केरसुणी आणि सुपली

केरसुणी हे घर आणि परिसरातील कचरा साफ करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडाच्या पानांपासून केरसुणी बनते.[] महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची केरसुणीची पूजा करण्याचा रिवाज आहे. पुण्याला जवळच्याच जुन्नर शहरातून केरसुण्यांचा पुरवठा होतो. औरंगाबाद जवळच्या सोयगाव तालुक्यात शिंदीच्या पानांच्या केरसुण्या बनविणे हा पिढीजात व्यवसाय आहे. महाराष्ट्राच्या जंगलांतून शिंदीची झाडे संपत आल्याने आता ही पाने परराज्यांतून आणावी लागतात. केरसुणी हा कमी भांडवलातून चालणारा व्यवसाय आहे.

धार्मिक महत्त्व

[संपादन]
केरसुणी

दिवाळी उत्सवातील आश्विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. त्या दिवशी अलक्ष्मी घालवून लक्ष्मीचे स्वागत करताना केरसुणी पूजन करण्याची परंपरा महाराष्ट्र राज्यात प्रचलित आहे.[] दिवाळीत झाडू विकत घेऊन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा करण्याची परंपरा आहे. झाडूमुळे घरातील साफसफाई होते आणि स्वच्छता तिथे लक्ष्मी वास करते. झाडूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा केली जाते.[]

प्रक्रिया

[संपादन]

शिंदीच्या पानापासून केरसुणी बनविण्याची प्रक्रिया सोपी आहे.

  1. शिंदीच्या पन्हाळ्या तोडून आणल्या जातात.
  2. पन्हाळ्या उन्हात वाळवतात.
  3. पन्हाळ्या वाळवल्यानंतर सोलतात.
  4. पन्हाळ्या सोलल्यानंतर बांधणी करून झाडू बनवतात.[]


संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Diwali 2023 : तांत्रिक युगातही केरसुणीलाच 'लक्ष्मी' म्हणून पूजनाचा मान; कच्चा माल नसल्याने दरवाढ | in modern age Kersuni is worshipped as Lakshmi in diwali jalgaon news". eSakal - Marathi Newspaper. 2023-11-15 रोजी पाहिले.
  2. ^ वृत्तसेवा, प्रभात (2022-10-17). "केरसुणी बनवण्याची लगबग अंतिम टप्प्यात". Dainik Prabhat (इंग्रजी भाषेत). 2023-11-15 रोजी पाहिले.
  3. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी,बुधवार,२२ ऑक्टोबर २०२५
  4. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी,बुधवार,२२ ऑक्टोबर २०२५
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत