आमगाव रेल्वे स्थानक
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
आमगाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | आमगाव, गोंदिया जिल्हा |
गुणक | 21°21′41.4″N 80°22′26.9″E / 21.361500°N 80.374139°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ३१७ मी |
मार्ग | हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग |
फलाट | ३ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण पूर्व मध्य रेल्वे |
स्थान | |
|
आमगाव हे भारत देशाच्या गोंदिया जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबई व कोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गावर असलेले आमगाव रेल्वे स्थानक ह्या भागातील एक महत्त्वाचे स्थानक मानले जाते. हे नागपूर स्थानकापासून सुमारे १४८ किमी अंतरावर आहे, तर गोंदिया स्थानकापासून हावड्याकडे सुमारे २२ किमी अंतरावर आहे. येथे ३ फलाट आहेत. या स्थानकावर सुमारे २७ गाड्या थांबतात. येथून कोणत्याही रेल्वे गाडीची सुरुवात होत नाही व कोणतीही गाडी येथे टर्मिनेट होत नाही.[१]
आमगाव रेल्वे स्थानकाहून जाणाऱ्या महत्त्वाच्या गाड्या
[संपादन]- गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस
- गोंदिया-छत्रपती शिवाजी टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस
- पुणे-हावडा आझाद हिंद एक्सप्रेस
- मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा समरसता एक्सप्रेस
- नागपूर-बिलासपूर इंटरसिटी एक्सप्रेस
- छत्तीसगढ एक्सप्रेस
- शिवनाथ एक्सप्रेस[१]
संदर्भ
[संपादन]- ^ a b Rizvi, Ammar. "Trains to Amgaon Station - 27 Arrivals SECR/South East Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. 2018-12-29 रोजी पाहिले.