Jump to content

समरसता एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
समरसता एक्सप्रेसचा फलक

समरसता एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोलकाताच्या शालिमार रेल्वे स्थानक दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे.

मार्ग

[संपादन]

समरसता एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, कल्याण, नाशिकरोड, जळगाव, भुसावळ, अकोला, वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपूर, रुरकेला, टाटानगर, खरगपूर व शालिमार ही आहेत.

तपशील

[संपादन]

या गाडीत एक वातानुकुलित प्रथमवर्गाचा, एक वातानुकुलित प्रथम/दुसऱ्या वर्गाचा, दोन वातानुकुलित दुसऱ्या वर्गाचे, पाच वातानुकुलित तिसऱ्या वर्गाचे, नऊ तिसऱ्या वर्गाचे, तीन बसण्याची सोय असलेले, दोन बसण्याची सोय तथा सामानवाहक डबे असतात. याशिवाय खानपानासाठीचा एक वेगळा डबा जोडलेला असतो.

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी सरासरी वेग अंतर
१२१५१मुंबई लोटिट शालिमार२०:३५०८:२५ (तिसरा दिवस)बुध, गुरू५९.५ किमी/तास२,०८१ किमी
१२१५२शालिमार मुंबई लोटिट७:५५०७:३० (तिसरा दिवस)शुक्र, शनी

संदर्भ

[संपादन]