Jump to content

छत्तीसगढ एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छत्तीसगढ एक्सप्रेस
माहिती
चालक कंपनी भारतीय रेल्वे
मार्ग
सुरुवात बिलासपूर, छत्तीसगढ
शेवट अमृतसर, पंजाब
अप क्रमांक १८२३७
निघायची वेळ (बिलासपूर, छत्तीसगढ) १४.१५
पोचायची वेळ (अमृतसर, पंजाब) ८.१०
डाउन क्रमांक १८२३८
निघायची वेळ (अमृतसर, पंजाब) १६.१४
पोचायची वेळ (बिलासपूर, छत्तीसगढ) १२.२०
अंतर २०११ किमी
साधारण प्रवासवेळ ४१ तास५५ मिनीटे
प्रवासीसेवा
खानपान उपलब्ध
तांत्रिक माहिती
गेज ब्रॉडगेज
वेग ४७ किमी/तास

छत्तीसगढ एक्सप्रेस ही बिलासपूर आणि अमृतसर दरम्यान धावणारी एक जुनी भारतीय प्रवासी रेल्वेगाडी आहे. या गाडीला छत्तीसगढ या नव्याने स्थापन झालेल्या राज्याचे नाव दिले आहे. यापूर्वी १९७७ मध्ये 'छत्तीसगड ऑंचल एक्सप्रेस ही बिलासपूर आणि भेापाळमधील हबीबगंज दरम्यान धावत होती. [] २०१९ साली नवीन बांधलेल्या भोपाळ हबीबगंज रेल्वे स्थानकामधून धावणारी ही पहिलीच गाडी आहे. १९८० मध्ये ती भोपाळ जंक्शन येथील मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत जायला लागली. १९८७ नंतर ती हजरत निजामउद्दीन (दिल्ली) [] तसेच नवी दिल्ली स्थानकांपर्यंत विस्तारली आणि शेवटी १९९० मध्ये ती अमृतसरपर्यंत जाऊ लागली.

मार्ग

[संपादन]
छत्तीसगड एक्सप्रेसचे मार्गावरील मुख्य थांबे

महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा आणि पंजाब या राज्यांमधून ही गाडी धावते आणि २०११ किमी अंतर पार करते.[] २५१ स्थानकांपैकी ८१ स्थानके खालीलप्रमाणे आहेत. []

अ.क्र.स्थानक संकेतस्थानक नावसुटण्याची वेळ (१८२३८ - अप)सुटण्याची वेळ (१८२३७ - डाऊन)विशेष नोंद
BSPबिलासपूर--१४:१५दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि गाडीचे उगमस्थान
BYLबेल्हा१२:२५१४:३१बिलासपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे स्थानक
BYTभातपारा११:५३१५:०३सिमॅंट उद्योगाचे प्रमुख केंद्र
HNहातबंध११:३३१५:२४ग्रामीण संपर्क केंद्र
TLDटील्डा११:१८१५:४४याला टील्डा नेवरा असेही ओळखले जाते
Rरायपूर१०:५०१६:३०छत्तीसगढ राज्याची राजधानी (मोठा थांबा)
BPHBभिलाई पॉवर हाउस१०:०७१७:०८भिलाई पोलाद कारखान्यासाठीचे मुख्य प्रवासी स्थानक
DURGदुर्ग जंक्शन०९:५५१७:४५हावडा-नागपूर-मुंबई मार्गावरील महत्त्वाचे जंक्शन
RJNराजनांदगाव०९:१६१८:०७ऐतिहासिक संस्थानाचे शहर
१०DGGडोंगरगड०८:५०१८:३६डोंगरगड येथील बम्बलेश्वरी देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध
११SKSसालेकसा०८:१३१९:११महाराष्ट्र आणि छत्तीसगढ सीमेजवळील निसर्गरम्य घाट विभाग
१२AGNआमगांव०७:५९१९:२७गोंदिया जिल्ह्यातील कृषी व्यापार केंद्र
१३Gगोंदिया०७:३५२०:०५विदर्भातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आणि तांदूळ बाजार
१४TROतिरोरा०६:५७२०:२८अदानी पॉवर प्रकल्पासाठीचे महत्त्वाचे स्थानक
१५TMRतुमसर रोड०६:४२२०:४५मॅंगनीज खाणींसाठी प्रसिद्ध
१६BRDभंडारा रोड०६:२५२१:०२वरठी येथील आयुध निर्माणी जवळचे स्थानक
१७KPकांपटी०५:४३२१:४१ऐतिहासिक लष्करी छावणी (कॅन्टोन्मेंट) विभाग
१८NGPनागपूर जंक्शन०५:२०२२:२०महाराष्ट्राची उपराजधानी आणि मध्य रेल्वेचे महत्त्वाचे केंद्र
१९KATLकाटोल०३:५५२३:४५संत्र्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध
२०NRKRनरखेड०३:३०००:०५अमरावती मार्गाला जोडणारे जंक्शन
२१PARपांढुर्णा०३:१०००:२०संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध मध्य प्रदेशातील शहर
२२MTYमुल्ताई०२:२५०१:१०तापी नदीचे उगमस्थान
२३AMLAआमला जंक्शन०२:०००१:४५येथे छिंदवाडा-अमृतसर स्लिप कोच जोडले/काढले जातात
२४BZUबैतूल०१:३००२:१०मध्य प्रदेशातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र
२५GDYAघोराडोंगरी००:४५०२:५५सारणी औष्णिक वीज केंद्राजवळचे स्थानक
२६ETइटारसी जंक्शन२३:४००४:३५भारतीय रेल्वेचे प्रमुख जंक्शन (मोठा तांत्रिक थांबा)
२७HBDहोशंगाबाद२३:०५०४:५५नर्मदा नदीच्या तीरावरील शहर
२८ODGओबेदुल्लागंज२२:१५०५:४०भीमबेटका लेणींजवळचे स्थानक
२९MDPमंडीदीप२२:०००५:५५भोपाळ जवळील औद्योगिक क्षेत्र
३०MRDमिसरोद२१:४५०६:१०भोपाळचा उपनगरीय भाग
३१RKMPराणी कमलापती२१:३००६:२५पूर्वीचे हबीबगंज स्थानक
३२BPLभोपाळ जंक्शन२१:०००६:५०मध्य प्रदेशची राजधानी
३३BHSविदिशा२०:१००७:४५ऐतिहासिक सांची स्तंभांजवळचे स्थानक
३४BAQगंज बासोडा१९:४००८:१५कृषी बाजारपेठ
३५MABAमंडी भमोरा१९:१००८:४५बीना जवळील महत्त्वाचे स्थानक
३६BINAबीना जंक्शन१८:४५०९:२५मोठी रिफायनरी येथे आहे
३७DUAढौरा१८:००१०:०५ललितपूर मार्गावरील स्थानक
३८LARललितपूर जंक्शन१७:३५१०:३५उत्तर प्रदेशातील जंक्शन
३९BZYवसाई१६:५०११:१५झांशी विभागातील स्थानक
४०BABबबिना१६:३०११:३५लष्करी छावणी असलेले शहर
४१VGLJझांसी-वीरांगना लक्ष्मीबाई १५:५५१२:३५बुंदेलखंडचे प्रवेशद्वार
४२DAAदातिया१५:१०१३:०५पितांबरा पीठ मंदिरासाठी प्रसिद्ध
४३SORसोनगीर१४:४५१३:३०ग्वाल्हेर मार्गावरील स्थानक
४४DBAडाबरा१४:३०१३:४५साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध
४५GWLग्वाल्हेर जंक्शन१३:५०१४:४५ऐतिहासिक किल्ल्यांचे शहर
४६BAOबनमोर१३:१०१५:२०औद्योगिक क्षेत्र
४७MRAमोरेना१२:५०१५:४५मधाचे शहर म्हणून प्रसिद्ध
४८DHOधोलपूर जंक्शन१२:१०१६:३०राजस्थानमधील प्रसिद्ध लाल दगड मिळण्याचे ठिकाण
४९AGCआग्रा कॅन्टोन्मेंट११:३०१७:४०ताजमहालसाठी प्रसिद्ध केंद्र
५०RKMराजा की मंडी१०:५०१८:००आग्रा शहरातील दुसरे स्थानक
५१MTJमथुरा जंक्शन१०:०५१८:५५भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी
५२CHJछाता०९:२५१९:३५मथुरा जिल्ह्यातील स्थानक
५३KSVकोसी कलान०९:१०१९:५०हरियाणा-उत्तर प्रदेश सीमेजवळील स्थानक
५४PWLपालवाल०८:३०२०:४०दिल्ली उपनगरीय रेल्वेचे टोक
५५BVHबल्लभगढ०८:०५२१:०५फरीदाबाद मधील उपनगर
५६FDBफरीदाबाद०७:५०२१:२०हरियाणातील मोठे औद्योगिक शहर
५७NZMहजरत निजामुद्दीन०७:१०२२:१०दिल्लीतील मुख्य टर्मिनल
५८SRRसाहिबाबाद जंक्शन०६:२०२३:१०दिल्ली-गाझियाबाद सीमेजवळील स्थानक
५९GZBगाझियाबाद जंक्शन०५:५५२३:३५उत्तर प्रदेशातील महत्त्वाचे जंक्शन
६०MUDमुरादनगर०५:३०००:०५आयुध निर्माणी असलेले शहर
६१MDNRमोदीनगर०५:१५००:२०औद्योगिक शहर
६२MTCमेरठ सिटी जंक्शन०४:४५००:५५क्रीडा साहित्यासाठी प्रसिद्ध
६३MUTमेरठ कॅन्टोन्मेंट०४:३००१:१०१८५७ च्या उठावाचे केंद्र
६४KATखटौली०४:०००१:४५उसाच्या शेतीसाठी प्रसिद्ध
६५MOZमुझफ्फरनगर०३:३५०२:१०साखरेचे कोठार
६६DBDदेवबंद०३:१००२:४०धार्मिक शिक्षणाचे केंद्र
६७SREसहारनपूर जंक्शन०२:३००३:४०लाकडी कोरीव कामासाठी प्रसिद्ध
६८JUDजगाधरी०१:५००४:३०हरियाणातील औद्योगिक केंद्र
६९JUDWजगाधरी वर्कशॉप०१:४००४:४०रेल्वे डब्यांच्या दुरुस्तीचे काम
७०RAAबरारा०१:१०५:१०स्थानिक व्यापार केंद्र
७१UMBअंबाला कॅन्टोन्मेंट००:४००५:५०हरियाणातील प्रमुख रेल्वे जंक्शन
७२UBCअंबाला सिटी००:१५०६:२०अंबाला शहराचे दुसरे स्थानक
७३RPJराजपूरा जंक्शन२३:४५०६:४५पंजाबमधील महत्त्वाचे औद्योगिक शहर
७४SIRसिरहिंद जंक्शन२३:१५०७:१५ऐतिहासिक गुरुद्वारांसाठी प्रसिद्ध
७५GVGमंडी गोविंदगड२२:५५०७:३५लोखंड आणि पोलाद बाजार
७६KNNखन्ना२२:३५०७:५५आशियातील सर्वात मोठी धान्य बाजारपेठ
७७LDHलुधियाना जंक्शन२१:४५०८:४५पंजाबचे औद्योगिक केंद्र
७८PHRफिल्लौर जंक्शन२१:१५०९:१५सतलज नदीच्या काठावरील शहर
७९PGWफगवाडा जंक्शन२०:५००९:३५पंजाबमधील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र
८०JRCजालंधर कॅन्टोन्मेंट२०:२०१०:०५लष्करी छावणी असलेले स्थानक
८१JUCजालंधर सिटी जंक्शन१९:५५१०:३५क्रीडा साहित्याचे उत्पादन केंद्र
८२KREकर्तारपूर१९:३०११:००लाकडी फर्निचरसाठी प्रसिद्ध
८३BEASबियास१९:००११:३०आध्यात्मिक केंद्र
८४JNLजंडियाला१८:३०१२:००अमृतसर जिल्ह्यातील स्थानक
८५ASRअमृतसर जंक्शन१८:००१२:४५सुवर्ण मंदिराचे शहर आणि शेवटचे स्थानक

रेल्वेचा तपशील

[संपादन]

१८२३७ क्रमांकाची गाडी विलासपूरवरून तर १८२३८ क्रमांकाची गाडी अमृतसरवरून रोज धावते. [] [] या गाडीला २४ डबे आहेत.

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. "छत्तीसगड एक्सप्रेस धावणार रायपूर, बिलासपूर दरम्यान" (इंग्लिश भाषेत). 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-04 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. हजरत निजामउद्दीन
  3. "छत्तीसगड एक्सप्रेस - सद्य स्थिती". 2014-01-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-04 रोजी पाहिले.
  4. "छत्तीसगड एक्सप्रेस - १८२३७". 2014-07-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-01-04 रोजी पाहिले.
  5. छत्तीसगड एक्सप्रेस १८२३८ - रेल्वेमार्ग नकाशा
  6. छत्तीसगड एक्सप्रेस १८२३७ - रेल्वेमार्ग नकाशा