स्मिता पाटील
स्मिता पाटील | |
---|---|
पाटील २०१३ च्या भारताच्या डाक तिकिटावर | |
जन्म |
स्मिता पाटील ऑक्टोबर १७, इ.स. १९५५ पुणे |
मृत्यू |
डिसेंबर १३, इ.स. १९८६ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय, टेलीविजन समाचार प्रस्तुती |
कारकीर्दीचा काळ | १९७४ – १९८५ |
भाषा | मराठी, हिंदी |
प्रमुख चित्रपट |
मंथन (१९७७), भूमिका (१९७७), आक्रोश (१९८०), चक्र (१९८१), चिदंबरम (१९८५), मिर्च मसाला (१९८५) |
पुरस्कार | पद्मश्री (इ.स. १९८५) |
वडील | शिवाजीराव पाटील |
आई | विद्याताई पाटील |
पती | राज बब्बर |
अपत्ये | प्रतीक बब्बर |
स्मिता पाटील (जन्म : पुणे, ऑक्टोबर १७, इ.स. १९५५; मुंबई डिसेंबर १३, इ.स. १९८६. [१] [२] [३] चित्रपट, दूरचित्रवाणी आणि नाटकांतून कामे करणारी अभिनेत्री होती. सर्वकालीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाणाऱ्या [४] स्मिताने तिच्या जेमतेम एक दशकभराच्या कारकिर्दीत ८० हून अधिक [५] हिंदी, बंगाली, मराठी, गुजराती, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले होते. [६]
स्मिता पाटीलचा विवाह अभिनेता राज बब्बरशी झाला होता. १३ डिसेंबर १९८६ रोजी वयाच्या ३१ व्या वर्षी बाळंतपणाच्या गुंतागुंतीमुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिचे दहाहून अधिक चित्रपट प्रदर्शित झाले. तिचा मुलगा प्रतीक बब्बर हा चित्रपट अभिनेता आहे ज्याने २००८ मध्ये पदार्पण केले.
स्मिताने श्याम बेनेगल यांच्या [७] श्याम बेनेगल यांच्याचरणदास चोर (१९७५) चित्रपटातून पदार्पण केले होते. [८] स्मिता ही त्यावेळी भारतीय सिनेमातील नवीन प्रवाहाची चळवळ असलेल्या समांतर सिनेमाची एक आघाडीची अभिनेत्री बनली होती. तरीही तिच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये देखील दिसली. [९]
तिच्या अभिनयाची बऱ्याच वेळा प्रशंसा झाली आणि तिच्या सर्वात उल्लेखनीय भूमिकांमध्ये मंथन (१९७७), [१०] [११] भूमिका (१९७७), [१०] [११] जैत रे जैत (१९७८), गमन (१९७८), आक्रोश (१९८०), चक्र (१९८१), नमक हलाल (१९८२), बाजार (१९८२), उंबरठा (१९८२), शक्ती (१९८२), अर्थ (१९८२), अर्ध सत्य (१९८३), मंडी (१९८३), आज की आवाज (१९८४), चिदंबरम (१९८५), मिर्च मसाला (१९८५), अमृत (१९८६), डान्स डान्स (१९८७)[१२] आणि वारिस (१९८८) [१३] [१०] [९] या चित्रपटांचा समावेश होतो.
अभिनयाव्यतिरिक्त स्मिता ही सक्रिय स्त्रीवादी आणि मुंबईतील महिला केंद्राची सदस्या होती. महिलांच्या समस्यांच्या प्रगतीसाठी ती मनापासून वचनबद्ध होती आणि पारंपारिक भारतीय समाजातील महिलांची भूमिका, त्यांची लैंगिकता आणि शहरी वातावरणात मध्यमवर्गीय महिलांना तोंड देत असलेल्या बदलांचा शोध घेणाऱ्या चित्रपटांमधून तिने काम केले. [१४]
तिच्या कारकिर्दीत तिला दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि एक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९८५ मध्ये स्मिता अवघ्या वयाच्या तिसाव्या वर्षी पद्मश्री या भारताच्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाची प्राप्तकर्ती होती. स्मिताच्या स्मरणार्थ धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे अजूनही "स्मिता पाटील पब्लिक स्कूल" ही शाळा चालवली जाते.
प्रारंभिक जीवन
[संपादन]स्मिता पाटीलचा जन्म पुण्यात [१५] महाराष्ट्रीय राजकारणी शिवाजीराव गिरधर पाटील आणि समाजसेविका विद्याताई पाटील यांच्या पोटी झाला. [१६] तिचे कुटुंब मूळचे महाराष्ट्राच्या खान्देश प्रांतातील शिरपूर शहरातील होते. लहानपणी तिने नाटकांमध्ये भाग घेतला. [१७]
स्मिताने पुण्यातील रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेतून (मुलींच्या भावे स्कूलमधून) शिक्षण घेतले. नंतर तिने यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये साहित्याचा अभ्यास केला. [१८] ती पुण्यातील स्थानिक थिएटर ग्रुप्सचा देखील भाग होती आणि तिने तिचा बराचसा वेळ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या कॅम्पसमध्ये घालवला, ज्यामुळे अनेकजण तिला या संस्थेची माजी विद्यार्थिनी समजण्याची चूक करतात. तिच्या वडिलांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्यानंतर हे कुटुंब 1969 मध्ये बॉम्बे (आताचे मुंबई) येथे आले.[१९]
चित्रपटांंची यादी
[संपादन]चित्रपट | पात्र | प्रकाशन वर्ष (इ.स.) |
---|---|---|
चरणदास चोर | राजकुमारी | १९७५ |
सामना | कमळी | १९७५ |
निशांत | रुक्मिणी | १९७५ |
मंथन | बिंदु | १९७६ |
जैत रे जैत | चिंदी | १९७७ |
भूमिका | उषा/उर्वशी दळवी | १९७७ |
सर्वसाक्षी | सुजाता | १९७८ |
गमन | सुजाता | १९७८ |
आक्रोश | नागी भिकू | १९८० |
चक्र | अम्मा | १९८० |
नमकहलाल | पूनम | १९८० |
शक्ती | रोमा | १९८० |
अर्थ | कविता संन्याल | १९८२ |
उंबरठा | सावित्री | १९८२ |
मंडी | झीनत | १९८३ |
अर्धसत्य | जोत्स्ना | १९८३ |
मेरे साथ चल | गीता | १९८४ |
स्मिता पाटीलवर चित्रित हिंदी-मराठी गाणी
[संपादन]- आज रपट जाएँ तो हमेंंना उठई यों (हिंदी)
- आपकी याद आती रही रातभर (हिंदी)
- गगन सदन तेजोमय
- जांभूळ पिकल्या झाडाखाली
- तुम्हारे बिना जीना लागे घर में (हिंदी)
- दिखाई दिए यूँ के (हिंदी)
- मी रात टाकली
- साजन के गुण गाये (हिंदी)
- सावन के दिन आये (हिंदी)
मृत्यू आणि वारसा
[संपादन]स्मिता १३ डिसेंबर १९८६ रोजी वयाच्या ३१ व्या वर्षी[२०] बाळंतपणाच्या गुंतागुंतीमुळे (प्युरपेरल सेप्सिस) मरण पावली.[२१] सुमारे दोन दशकांनंतर, चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांनी आरोप केला की स्मिताचा मृत्यू "घोर वैद्यकीय निष्काळजीपणामुळे" झाला होता. [२२]
प्रियदर्शनी अकादमीने १९८६ मध्ये या ज्येष्ठ अभिनेत्रीला श्रद्धांजली म्हणून स्मिता पाटील स्मृती पुरस्कार सुरू केला. २०११ मध्ये Rediff.com ने तिला नर्गिसच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकाची सर्वकालीन सर्वोत्कृष्ट भारतीय अभिनेत्री म्हणून सूचीबद्ध केले. [२३] डेक्कन हेराल्डच्या सुरेश कोहलीच्या मते, "स्मिता पाटील ही कदाचित हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात कुशल अभिनेत्री होती. तिचे कार्य उत्कृष्ट आहे आणि जवळजवळ प्रत्येक भूमिकेत ती "पॉवरहाऊस" वास्तववादी कामगिरी करायची." [२४]
२०१२ मध्ये स्मिता पाटील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट्स तिच्या सन्मानार्थ सुरूकरण्यात आला. [२५] [२६] [२७] [२८] [२९] भारतीय चित्रपटसृष्टीला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ३ मे २०१३ रोजी तिच्या सन्मानार्थ भारतीय टपाल विभागाने तिचा चेहरा असलेले एक टपाल तिकीट प्रसिद्ध केले. [३०]
दृक्श्राव्य कार्यक्रम
[संपादन]स्मिता पाटील यांच्या जीवनावर आधारलेला ‘महाराष्ट्राची अस्मिता स्मिता’ नावाचा एक दृक्श्राव्य कार्यक्रम आहे.
लघुपट महोत्सव
[संपादन]स्मिता पाटील यांच्या स्मरणार्थ पुण्यात इ.स. २०१२ सालापासून दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय लघुपट-माहितीपट महोत्सव (SPIFF-Smita Patil International Film Festival) होतो. ५वा महोत्सव १०-११ डिसेंबर २०१६ या काळात झाला; त्याला ५० देशांतून एकूण १६५ लघुपट-माहितीपट आले होते, प्रेक्षकांना त्यांतले ६० दाखवले गेले.[३१]
पुरस्कार
[संपादन]- स्मिता पाटील यांच्या नावाचा एक स्मृती पुरस्कार आणि एक कौतुक पुरस्कार दरवर्षी दिला जातो. २०१८ साली हे पुरस्कार अनुक्रमे 'जैत रे जैत' या चित्रपटाला आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना मिळाले आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ Subodh Kapoor (1 July 2002). The Indian Encyclopaedia: Biographical, Historical, Religious, Administrative, Ethnological, Commercial and Scientific. Indo-Pak War-Kamla Karri. Cosmo Publication. pp. 6699–. ISBN 978-81-7755-257-7. 29 December 2012 रोजी पाहिले.
- ^ Annette Kuhn (1990). The Women's Companion to International Film. University of California Press. pp. 310–. ISBN 978-0-520-08879-5. 29 December 2012 रोजी पाहिले.
- ^ Andrew Robinson (1989). Satyajit Ray: The Inner Eye. University of California Press. pp. 258–. ISBN 978-0-520-06946-6. 29 December 2012 रोजी पाहिले.
- ^ Lahiri, Monojit (20 December 2002). "A blazing talent remembered". द हिंदू. 3 October 2003 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 February 2011 रोजी पाहिले.
- ^ D. Sharma (1 January 2004). Mass Communication : Theory & Practice In The 21St Century. Deep & Deep Publications. p. 298. ISBN 978-81-7629-507-9. 29 December 2012 रोजी पाहिले.
- ^ Gulzar; Nihalani, Govind; Chatterji, Saibal (2003). Encyclopaedia of Hindi Cinema. Popular Prakashan. p. 601. ISBN 81-7991-066-0.
- ^ Si. Vi Subbārāvu (2007). Hyderabad: the social context of industrialisation, 1875–1948. Orient Blackswan. pp. 82–. ISBN 978-81-250-1608-3. 29 December 2012 रोजी पाहिले.
- ^ William van der Heide (12 June 2006). Bollywood Babylon: Interviews with Shyam Benegal. Berg. pp. 208–. ISBN 978-1-84520-405-1. 29 December 2012 रोजी पाहिले.
- ^ a b Lahiri, Monojit (20 December 2002). "A blazing talent remembered". द हिंदू. 3 October 2003 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 February 2011 रोजी पाहिले.
- ^ a b c Subodh Kapoor (1 July 2002). The Indian Encyclopaedia: Biographical, Historical, Religious, Administrative, Ethnological, Commercial and Scientific. Indo-Pak War-Kamla Karri. Cosmo Publication. pp. 6699–. ISBN 978-81-7755-257-7. 29 December 2012 रोजी पाहिले.
- ^ a b William van der Heide (12 June 2006). Bollywood Babylon: Interviews with Shyam Benegal. Berg. pp. 208–. ISBN 978-1-84520-405-1. 29 December 2012 रोजी पाहिले.
- ^ "Google". www.google.com. 2024-01-09 रोजी पाहिले.
- ^ Hena Naqvi (1 January 2007). Journalism And Mass Communication. Upkar Prakashan. pp. 202–. ISBN 978-81-7482-108-9. 29 December 2012 रोजी पाहिले.
- ^ "Reminiscing Smita Patil". 14 August 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 14 August 2007 रोजी पाहिले. "Reminiscing About Smita Patil"
- ^ "Smita Patil". MANAS. UCLA Social Sciences. 3 April 2021 रोजी पाहिले.
- ^ Pothukuchi, Madhavi (17 October 2019). "Smita Patil — the 'real' woman Indian women could relate to". ThePrint (इंग्रजी भाषेत). 3 April 2021 रोजी पाहिले.
- ^ Farook, Farhana (16 October 2020). "Smita Patil – An incomplete dream". Yahoo Entertainment. 5 May 2021 रोजी पाहिले.
- ^ Rajadhyaksha, Ashish; Willemen, Paul (10 July 2014). Encyclopedia of Indian Cinema. Routledge. pp. 173–174. ISBN 978-1-135-94318-9.
- ^ Rao, Maithili (31 October 2015). "The making of Smita Patil". DNA India (इंग्रजी भाषेत). 3 April 2021 रोजी पाहिले.
- ^ Ram Awgnihotri (1998). Film stars in Indian politics. Commonwealth Publishers. ISBN 978-81-7169-506-5. 29 December 2012 रोजी पाहिले.
- ^ Andrew Robinson (1989). Satyajit Ray: The Inner Eye. University of California Press. pp. 258–. ISBN 978-0-520-06946-6. 29 December 2012 रोजी पाहिले.
- ^ "Memories from Mrinal da". Rediff.com. 2 February 2005.
- ^ Sen, Raja (29 June 2011). "Readers Choice: The Greatest Actresses of all time". Rediff.com. 22 September 2011 रोजी पाहिले.
- ^ Kohli, Suresh (22 September 2011). "Immortal performances". Deccan Herald. 22 September 2011 रोजी पाहिले.
- ^ staff. "Smita Patil Documentary and Short Film Festival". Time Out. 19 December 2015 रोजी पाहिले.
- ^ "7th Smita Patil international film festival to be held in Pune on December 8–9". Hindustan Times. 7 December 2018.
- ^ "Every life matters, says the man who has saved scores". द टाइम्स ऑफ इंडिया. Pune.
- ^ "Salvage army". Pune Mirror.[permanent dead link]
- ^ "Cop documents work of Pune's unsung hero". Pune Mirror. 2019-05-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-01-07 रोजी पाहिले.
- ^ "President Pranab Mukherjee releases stamps on 50 Bollywood personalities". The Economic Times. PTI. 3 May 2013. 3 April 2021 रोजी पाहिले.
- ^ "About". Smita Patil Documentary and Short Film Festival (इंग्रजी भाषेत). 2018-12-13 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील स्मिता पाटील चे पान (इंग्लिश मजकूर)