मंडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मंडी
भारतामधील शहर
Victoria Suspension Bridge in Mandi (24638542387)2.jpg
Mandi town.jpg
Panchvaktra Temple, Mandi (SIDE VIEW).jpgNatural Treasures of India - Prashar Lake.jpg
व्हिक्टोरिया पूल, मंडी नगराचे दृश्य, पंचवक्त्र मंदीर, प्रशर तलाव
मंडी is located in हिमाचल प्रदेश
मंडी
मंडी
मंडीचे हिमाचल प्रदेशमधील स्थान
मंडी is located in भारत
मंडी
मंडी
मंडीचे भारतमधील स्थान

गुणक: 31°42′25″N 76°55′54″E / 31.70694°N 76.93167°E / 31.70694; 76.93167

देश भारत ध्वज भारत
राज्य हिमाचल प्रदेश
जिल्हा मंडी
स्थापना वर्ष इ.स. १५२७
समुद्रसपाटीपासुन उंची २,४९० फूट (७६० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर २६,४२२
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)


मंडी हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याच्या मंडी ह्याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय व राज्यामधील एक प्रमुख शहर आहे. हिमालय पर्वतरांगेत बियास नदीच्या काठावर वसलेले मंडी हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलापासून ११५ किमी, मनालीपासून १०७ किमी तर चंदीगढपासून २०० किमी अंतरावर स्थित आहे. १६व्या शतात वसवले गेलेले मंडी शहर मंडी संस्थानाच्या राजधानीचे शहर होते. २०११ साली मंडीची लोकसंख्या सुमारे २६,००० होती.

कुलु येथील भुंतार विमानतळ हा येथील सर्वात जवळचा विमानतळ तर कांगडा खोरे रेल्वेमार्गावरील सर्वात शेवटचे स्थानक जोगिंदरनगर येथील सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे. अमृतसर ते लेहदरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ३ मंडीमार्गे जातो. भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मंडी (आयआयटी मंडी) ही शैक्षणिक संस्था मंडीमध्येच आहे.