उंबरठा (चित्रपट)
उंबरठा हा मराठी भाषेतील एक गाजलेला चित्रपट आहे. या चित्रपटाची पटकथा विजय तेंडुलकर यांनी लिहिली. हा चित्रपट शांता निसाळ यांच्या बेघर या कादंबरीवर आधारित आहे.
पटकथा
[संपादन]उंबरठा' या १९८२ च्या मराठी चित्रपटाचे कथानक सुलभा महाजन स्मिता पाटील या एका महिलेभोवती फिरते, पती गिरीश कर्नाड म्हणून या चित्रपटात आहेत. सुलभा महाजन घराच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून समाजातील शोषित महिलांसाठी काम करण्याचे स्वप्न पाहते. ती एका महिला सुधारगृहाची अधीक्षक म्हणून नोकरी स्वीकारते, जिथे तिला व्यवस्थेतील फसवणूक आणि गुंतागुंत लक्षात येते, आणि तिच्या या नवीन भूमिकेतील आव्हानांना ती सामोरे जाते.
महिला सुधारग्रुहात ती शिस्त आणण्यापासून सुरुवात करते आणि तिथे होणाऱ्या फसवणुकीही तिला कळते. पण स्वार्थी आणि बेफिकीर लोकांनी भरलेल्या व्यवस्थापकीय समितीकडून तिला मदत केली जात नाही. म्हणून ती त्या विरुद्ध पावले उचलण्याचे ठरवते. ती इच्छूक महिलांना शिक्षित करण्यासाठी काही वर्ग सुरू करते. काही स्त्रीयांंच्या आयुष्य नव्याने सुरू करण्यासाठी ती एका स्त्रीचं लग्नही लावून देते. स्थानिक आमदार बने आपल्या लैंगिक गरजा भागवण्यासाठी अनाथालयातील स्त्रियां उपभोगत असतात, सुलभा महाजन अनाथलयातील या अनैतिक गोष्टी बंद करते. सुलभा महाजनवर चुकीचे आरोप करून तिच्यावर चौकशी समिती नेमली जाते. चौकशी समितीत तिच्यावर केलेले आरोप सिद्ध होत नाही, पण ती नौकरीचा राजीनामा देऊन घरी परतते.
जेव्हा ती तिच्या घरी परतते तेव्हा तिच्या वहिनींनी तिचे आनंदाने स्वागत केले परंतु तिची मुलगी आणि सासू तितक्या आत्मियतेने स्वागत करीत नाहीत. त्यानंतर तिला कळले की तिचा पती सुभाष तिच्या गैरहजेरीत दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवतो. त्याच्या विश्वासघाताने तिचे मन बदलले आणि ती पुन्हा तिच्या स्वप्नातील सामाजिक कामासाठी उंबरठा ओलांडते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |