समाजवादी पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सपा या पानावरून पुनर्निर्देशित)
समाजवादी पार्टी
पक्षाध्यक्ष अखिलेश यादव
सचिव रामगोपाल यादव
लोकसभेमधील पक्षनेता सैयद तुफ़ैल हसन
राज्यसभेमधील पक्षनेता रामगोपाल यादव
संस्थापक मुलायम सिंह यादव
मुख्यालय नई दिल्ली
विभाजित जनता दल
लोकसभेमधील जागा
संकेतस्थळ समाजवादी पार्टी

समाजवादी पक्ष किंवा तत्सम नाव असलेले अनेक राजकीय पक्ष भारतात आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी समाजवादी पक्ष नावाचा पक्ष हा भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक होता.[ संदर्भ हवा ] (बाकीचे पक्ष - काँग्रेस , हिंदू महासभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मुस्लिम लीग.) पुढे प्रजापक्ष (स्थापना इ.स.१९३०, हा पुढे प्रजा संयुक्त पक्ष झाला) नावाच्या एका समान विचारसरणी असलेल्या पक्षात सामील होऊन तो प्रजासमाजवादी पक्ष तयार झाला. याही पक्षाचे लोहिया समाजवादी (प्रजा सोशालिस्ट पार्टी), संयुक्त समाजवादी, बहुजन समाजवादी, लोकदल वगैरे नावाचे अनेक तुकडे होऊन बरेच राजकीय पक्ष तयार झाले. आजही हिंदुस्थान प्रजापक्ष, भारतीय प्रजापक्ष ता नावाचे काही प्रजापक्ष अस्तित्वात आहेत.[ संदर्भ हवा ]

आचार्य कृपलानींचा 'किसान मजदूर प्रजा पार्टी' नावाचा पक्ष होता. पुढे त्यांनी राममनोहर लोहियांच्या बरोबर 'प्रजा सोशालिस्ट पार्टी'[ संदर्भ हवा ]

जयप्रकाश नारायण यांनी स्थापन केलेला समाजवादी पक्ष हा त्या तुकड्यांपैकीच एक पक्ष. हा आजही उत्तरी भारतातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. मुलायम सिंग यादव हे त्यांच्या मुलाने - अखिलेश यादव याने - पक्षातून हकालपट्टी करेपर्यंत या पक्षाचे अध्यक्ष होते.[ संदर्भ हवा ] अमरसिंग, अबू आझमी हे पक्षातील इतर महत्त्वाच्या व्यक्ती. अनेक चित्रपट अभिनेते व उद्योगपती या पक्षाचे सदस्य आहेत.[ संदर्भ हवा ] उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश या राज्यात या पक्षाचे वर्चस्व आहे. अलीकडच्या काळात मुंबईत या पक्षाने आगमन केले होते. २००८ मध्ये मराठी भाषकांच्या विरोधात या पक्षाने काही प्रक्षोभक भाषणे व भित्तिपत्रके लावल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर या पक्षाची धुमश्चक्री उडाली होती.[ संदर्भ हवा ] मुलायम सिंग यांच्या या समाजवादी पक्षात कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा ‘कौमी एकता दल’ हा पक्ष विलीन झाला आहे. (जून २०१६)[ संदर्भ हवा ]

भारतावर इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांच्या पक्षातूनच जनता पक्षाचा उदय झाला. याही राजकीय पक्षाचे यथावकाश तुकडे होऊन (नीतीशकुमार/शरद यादव यांचा) संयुक्त जनता दल, (लालूप्रसाद यादव यांचा) राष्ट्रीय जनता दल, (ओमप्रकाश चौटाला यांचा) भारतीय राष्ट्रीय लोक दल, (देवेगौडा यांचा) जनता दल (धर्मनिरपेक्ष) , शरद यादव यांचा संयुक्त जनता दल आणि (कमल मोरारका यांचा) समाजवादी जनता पक्ष, जन मोर्चा, समाजवादी पक्ष (अखिलेश यादव गट), समाजवादी पक्ष (मुलायमसिंग यादव), बहुजन समाज पक्ष (मायावती), वगैरे वगैरे अनेक पक्ष निर्माण झाले. यापैकी सहा पक्षांचे विलीनीकरण होऊन एक नवा राजकीय पक्ष उदयास येणार होता , पण ते शक्य झाले नाही.[ संदर्भ हवा ]

रामविलास पासवान, अजित सिंग, नवीन पटनायक अशा काही नेत्यांनी या नव्या पक्षापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याउलट शिवपाल यादव यांनी ‘समाजवादी धर्मनिरपेक्ष मोर्चा’ नावाचा नवाच पक्ष स्थापन केला आहे. शिवपाल यादव यांचे वडील बंधू मुलायम सिंग यादव या पक्षाचे अध्यक्ष असतील.[ संदर्भ हवा ]

पक्षाचे नेते[संपादन]

  • राष्ट्रीय अध्यक्ष- अखिलेश यादव
  • राष्ट्रीय महासचिव- रामगोपाल यादव
  • उत्तर प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष- नरेश उत्तम पटेल[१]
  • महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष- अबू आसिम आझमी

सत्रावीं लोकसभा[संपादन]

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


राज्य मतदारसंघ खासदार टीप
उत्तर प्रदेश मैनपुरी मुलायम सिंह यादव १० अक्टूबर २०२२ को निधन [२]
डिंपल यादव ८ दिसंबर २०२२ को निर्वाचित [३]
आझमगढ़ अखिलेश यादव २२ मार्च २०२२ को पदत्याग [४]
मोरादाबाद डॉ.एस.टी.हसन
रामपुर मोहम्मद आझम ख़ान २२ मार्च २०२२ को पदत्याग [५]
संभल डॉ.शफ़ीकुर रहमान बर्क़

मुख्यमंत्र्यांची यादी[संपादन]

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री[संपादन]

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


क्रम मुख्यमंत्री चित्र कार्यकाल पदावधि विधानसभा
1 मुलायम सिंह यादव 4 दिसंबर 1993 3 जून 1995 &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000181.000000१८१ दिवस बारावीं विधानसभा
2 29 अगस्त 2003 13 मई 2007 &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000257.000000२५७ दिवस चौदावीं विधानसभा
3 अखिलेश यादव 15 मार्च 2012 19 मार्च 2017 &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000004.000000४ दिवस सोलावीं विधानसभा

महाराष्ट्र विधानसभा[संपादन]

विधानसभा निवडणूक वर्ष मतदारसंघ निर्वाचित आमदार टीप
बारावी विधानसभा २००९ मानखुर्द शिवाजीनगर अबू आझमी
भिवंडी पूर्व अबू आझमी पदत्याग
भिवंडी पश्चिम अब्दुल राशिद ताहिर
तेरावी विधानसभा २०१४ मानखुर्द शिवाजीनगर अबू आझमी
चौदावी विधानसभा २०१९ मानखुर्द शिवाजीनगर अबू आझमी
भिवंडी पूर्व रईस शेख

हे सुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]