रामविलास पासवान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राम विलास पासवान जि
रामविलास पासवान

मतदारसंघ हाजीपुर

जन्म जुलै ५, इ.स. १९४६
खगरिया, बिहार
मृत्यू ८ ऑक्टोबर, २०२० (वय ७४)
नई दिल्ली
राजकीय पक्ष लोक जनशक्ती पक्ष
पत्नी रीना पासवान
अपत्ये १ मुलगा व ३ मुली.
निवास खगरिया

रामविलास पासवान (जन्म : ५ जुलै १९४६; - ८ ऑक्टोबर २०२०) हे भारतातील हिंदी भाषक राजकारणी होते. ते लोक जनशक्ती पक्षाचे ते संस्थापक, अध्यक्ष होते. भारतातील बिहार राज्यातील एका दलित परिवारात जन्माला आलेले पासवान हे बी.ए. आणि एल.एल.बी.पर्यत शिक्षित होते. पोलीस सेवेत मिळालेल्या नोकरीत रुजू न होता त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला आणि सर्वप्रथम इ.स. १९६९ साली बिहार विधान परिषदेवर निवडून आले.

पुरस्कार[संपादन]

इ.स. २०२०चा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव". एबीपी माझा. Archived from the original on 2021-11-08. ८ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.